तेलकट त्वचा असणाऱ्यांनी असे तयार घरगुती क्लींझर, चेहऱ्यावर दिसेल आश्चर्यकारक बदल

Spread the love

​क्लींझर काय असते काम​ ?

आपली त्वचा नियमित सूर्याची हानिकारक किरणे आणि धूळ- माती, प्रदूषणाच्या संपर्कात येते. यामुळे त्वचा हळूहळू खराब होऊ लागते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. चांगले क्लींझर त्वचेवरील घाण स्वच्छ करण्याचे काम करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

चेहऱ्यावरील ओपन पोअर्समध्ये जमा झालेली घाण आणि तेल स्वच्छ करण्याचे कार्य क्लींझर करते. बाजारात मिळणाऱ्या क्लींझर ऐवजी तुम्ही घरामध्येच क्लींझर तयार करा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार घरामध्ये नैसर्गिक क्लींझर तयार करा.

(Cucumber For Skin: नितळ त्वचा हवीय? मग असे तयार काकडीच्या सालीपासून फेस पॅक)

​काकडी आणि टोमॅटो क्लींझर

या दोन्ही सामग्री आपल्या त्वचेवर जादू प्रमाणे काम करतात. टोमॅटोमधील औषधी गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करण्याचे काम करतात. सनटॅन, काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळेल. तर काकडीच्या रसामुळे त्वचा उजळण्यास मदत मिळते. यासाठी अर्धी काकडी आणि एक छोटा टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.

(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)

​गुलाब पाणी क्लींझर

गुलाब पाण्याने त्वचा टोनिंग देखील करू शकतो. ज्यामुळे त्वचा पूर्णपणे मऊ आणि नितळ होण्यास मदत मिळेल. गुलाबी आपल्या त्वचेवरील दुर्गंध स्वच्छ करण्याचे कार्य करते. त्वचेचं पीएच लेव्हल संतुलित ठेवते.

क्लींझर वापरण्याची पद्धत – कापसाच्या मदतीने गुलाब पाणी आपल्या चेहऱ्यावर लावा. हवे असल्यास तुम्ही आपला चेहरा पाण्याने धुऊ शकता आणि यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावू शकता.

(Hair Care घनदाट, लांबसडक केसांसाठी वापरा बेसन आणि दही हेअर मास्क)

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर आपल्या चेहऱ्यावरील सीबमचा अतिरिक्त स्त्राव नियंत्रित करण्याचे कार्य करतात. यातील पोषण तत्त्वांमुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसतो. मृत त्वचेची समस्या करण्यासाठी, चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता.

क्लींझर वापरण्याची पद्धत – पाणी आणि अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पण अॅपल सायडर व्हिनेगर कधीही थेट त्वचेवर लावण्याची चूक करू नका. हे मिश्रण तीन मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि यानंतर थंड पाण्याने चेहरा पाण्याने धुऊन घ्या.

(Skin Care चमकदार त्वचेसाठी आंघोळ करण्यापूर्वी ५ मिनिटे लावा बेसन फेस स्क्रब)

​​बेसन आणि हळद

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बेसन हे रामबाण उपाय आहे. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. बेसन चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे काम करते. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत मिळते. बेसनमध्ये हळद मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतात.

क्लींझर वापरण्याची पद्धत – एक चमचा बेसनसह अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे आपला चेहरा मऊ आणि नितळ होण्यास मदत मिळेल. बेसनमुळे त्वचेला ओलावा मिळतो. तसंच चेहऱ्याचा रंग देखील उजळण्यास मदत मिळते.

(Skin Care Tips तेलकट त्वचेसाठी बेस्ट आहेत टोमॅटोचे ३ उपाय, असा करा वापर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *