तैमूरपासून ते सुहानापर्यंत,या स्टारकिड्सचे कपडे आहेत करीना-कतरिनाच्या स्टाइलपेक्षाही महागडे

Spread the love

​तैमूर अली खान

करीना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमूर अली खान लहान वयातच सेलिब्रिटी झाला आहे. तैमूरशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. तैमूर काय खातो? काय करतो? कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तर त्याचे चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तैमूरचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये त्याने अतिशय महागड्या स्वेटर घातल्याचे पाहायला मिळालं. धर्मशाळा भेटीदरम्यान तैमूरने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर राल्फ लॉरेनने डिझाइन केलेले राखाडी रंगाचे स्वेटशर्ट घातले होते. या आउटफिटची किंमत सुमारे १२ हजार ८३९ रूपये एवढी होती.

(चोकर्सची चलती! ट्रेंडनुसार निवडा स्टायलिश नेकलेस)

इनाया खेमू

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची लाडकी लेक इनाया देखील आपला भाऊ तैमूर अली खानप्रमाणेच लोकप्रिय आहे. एकीकडे तैमूरचं वॉर्डरोब ब्रँडेड वस्तूंनी भरलेले आहे तर फॅशनच्या बाबतीत इनाया देखील स्टायलिश स्टारकिड म्हणून प्रसिद्ध आहे. कारण जेव्हा-जेव्हा इनाया आई सोहा अली खानसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते, तेव्हा-तेव्हा ती आपल्या फॅशनेबल लुक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी इनायाने ‘Pure Tribe India’ फॅशन लेबलने डिझाइन केलेलं बोहो ड्रेस आणि मॅचिंग मास्क घातलं होतं. या ड्रेसवर हातांनी अतिशय बारीक स्वरुपात एम्ब्रॉयडरी करण्यात आल्याचे आपण पाहू शकता. इनायाच्या ड्रेसची किंमत जवळपास ७ हजार रूपये आणि फेस मास्कची किंमत २ हजार ५४७ रूपये एवढी आहे.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

​आराध्या बच्चन

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन देखील पालकांप्रमाणेच फॅशनेबल आहे. आराध्याने आपल्या स्टायलिश लुकने अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. असेच काहीसे तिच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्तानेही पाहायला मिळालं. वाढदिवसासाठी तिनं प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला क्लासिक प्रिंसेस ड्रेस परिधान केला होता. या गुलाबी रंगाच्या बॉलरूम गाउनमध्ये आराध्या सुंदर दिसत होती. आराध्याच्या या ड्रेसची किंमत जवळपास ६० हजार रूपये एवढी आहे .

(रंग खुलवतील सौंदर्य! आउटफिट व अ‍ॅक्सेसरीजची अशी करा निवड)

​सुहाना खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचे सोशल मीडियावर स्टायलिश अवतारातील कित्येक फोटो पाहायला मिळतात. सुहाना खान आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. महागडे आउटफिट परिधान करणारी स्टारकिड, अशीही सुहानाची ओळख आहे. गेल्या वर्षी न्यू ईअर पार्टीसाठी सुहानाने काळ्या रंगाचा बाल्मेन मिनी ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

(आलिया भटने या स्टायलिश लुकसाठी केला तब्बल सात लाख रुपयांचा खर्च)

पार्टीसाठी सुहानाने एसिमेट्रिक नेकलाइन आणि वन शोल्डर डिझाइन असणाऱ्या बाल्मेन मिनी ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसवर तुम्ही ड्रॅगन प्रिंट डिझाइन पाहू शकता. या सुपरस्टायलिश ड्रेसमध्ये सुहाना सुंदर दिसत होती. या लुकसाठी सुहानाने स्मोकी आईज, लाइट टोन लिपस्टिक, आणि सुंदर हेअर स्टाइल केली होती. सुहानाच्या या ड्रेसची किंमत तब्बल २ लाख ७० हजार रूपये एवढी आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *