त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय? यावर कोणते उपचार करावते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Spread the love

डॉ. प्रणाम सदावर्ते, प्लास्टिक सर्जन, नागपूर
त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वांत मोठा अवयव आहे. त्वचेमुळे शरीर आणि वातावरण यादरम्यान एक भिंत तयार होते. त्यामुळे बाहेरील घटक तसेच जीवाणू-विषाणू इत्यादी शरीरात थेट प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे आतील जीवनावश्यक द्रव्य सुरक्षित राहते.

सर्वप्रथम आपण भाजतो म्हणजे काय याबद्दल सविस्तर बघूया. भाजण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘निक्रोसिस’ असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर त्वचेवरील आणि अगदी खोलवर असलेल्या पेशीसमूह नष्ट होणे किंवा मृत पावणे. यासाठी अग्नी अथवा वर विशद केलेले घटक कारणीभूत असतात. त्यामुळे त्वचा व त्याखाली उतींची (सॉफ्ट टिश्यू) हानी होते व त्वचेवरील ‘प्रोटिन’ या घटकाचा नाश होतो. शरीराचे बाह्य वातावरणापासून रक्षण करणाऱ्या शरीराच्या थराला हानी पोहोचल्याने बाहेरील निरुपद्रवी घटक, प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत घटक थेट शरीरात प्रवेश करू शकतील, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शरीरातील पाणी, जीवनावश्यक घटक, सोडियम, पोटॅशियम यांचीही हानी होते.

​प्रमुख कारणे

दिवाळी सुरू असल्याने फटाक्यांमुळे आग लागून जळण्याचे प्रमाण वाढलेले असते. विशेष म्हणजे अशा वेळी टेरीकॉट किंवा अन्य ज्वलनास पूरक कपडे परिधान केल्याने भाजण्याची तीव्रता वाढत असते. याशिवाय घरगुती वापरामध्ये असलेला केरोसिनचा वापर, उद्योगांमधील अपघात, इलेक्ट्रिकची उपकरणे, अशी भाजण्याची कारणे आहेत.

(क्रीम-लोशनची गरज भासणार नाही, सतेज त्वचेसाठी जाणून घ्या आयुर्वेदिक ब्युटी टिप्‍स)

​मोजण्याचे एकक

भाजल्यावर डॉक्टर असे म्हणतात २० टक्के भाजले आहे. म्हणजे नेमके काय, तर तळवा म्हणजे एक टक्के असे प्रमाण मानून शरीराचा किती भाग भाजला आहे, हे सांगणारे ते एकक असते. त्या अनुषंगाने चेहऱ्याचा भाग भाजला तर ९ टक्के, हात, पाय, छातीच्या वरील भाग, छातीच्या खालील भाग, पाठीच्या वरील भाग, पाठीच्या खालील भाग हे प्रत्येकी ९ टक्के असतात. गुप्तांग हे १ टक्का असते. अशा प्रकारे जळण्याची टक्केवारी काढली जाते. लहानग्यांमध्ये हे प्रमाण थोडे वेगळे असते.

(करीना-अनुष्‍कासह अन्य सेलिब्रिटीही करतात मुरुमांचा सामना, करतात हे नैसर्गिक उपाय)

​अधिक गुंतागुंत

त्वचा ही शरीराच्या बाहेरील वातावरणापासून रक्षण करते. त्यामुळे भाजल्यानंतर जंतूसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. हृदय, मूत्रपिंड या अवयवांवरही प्रभाव पडू शकतो. सेप्सिससारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पन्नास-साठ टक्क्याहून जळालेले असेल तर मृत्यू संभवतो. वेळेत उपचार मिळाले आणि मूत्रपिंड, हृदयावर होणारे बदल थांबवले तर मृत्यू टळू शकतो.

(त्वचेवरील डागांपासून हवीय सुटका? जाणून घ्या मध-दुधापासून फेस वॉश व फेस पॅक तयार करण्याची पद्धत)

​नेमके काय करावे?

भाजणे ही वैद्यकीय आणिबाणीची परिस्थिती आहे. त्यामुळे व्यक्तीला तातडीने इस्पितळात न्यावे. भाजल्यामुळे झालेली जखम सौम्य असेल तर त्यास शुद्ध व थंड पाण्याने स्वच्छ करू शकता. व्यक्तीला हवेशीर ठेवावे. कमी तीव्रता असेल तर डॉक्टर सिल्व्हर सल्फायडायजिनसारखे ऑइनमेन्ट देखील सुचवितात. मात्र व्यक्तीला तातडीने इस्पितळात न्यावे.

(चेहऱ्यावर हवंय नैसर्गिक तेज? जाणून घ्या ग्वा-शा मसाजचं तंत्र आणि फायदे)

​उपचार पद्धती

जळालेल्या व्यक्तींवर बहुआयामी उपचार पद्धती वापरली जाते. त्वचेशी संबंध असल्याने प्लास्टिक सर्जनची भूमिका फार महत्त्वाची असते. त्वचेचे प्रत्यारोपण करणे, त्यासाठी स्कीन बँक अथवा शरीरातील अन्य अवयवांतील त्वचेचे सहाय्य घेणे व शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. भाजल्यामुळे आतील स्नायू, तंतू, हाडे बाहेर दिसत असतील तर जाड त्वचेचे रोपण करण्यासारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. चेहरा, डोळा, कान वगैरे भाजल्यास त्यावर पूनःर्निमाण शस्त्रक्रिया करावी लागते. हे सगळे प्लास्टिक सर्जनद्वारे केले जाते.

(चेहऱ्यावर या २ गोष्टी लावल्याशिवाय ऐश्वर्या राय पडत नाही घराबाहेर)

​हे देखील लक्षात ठेवा

भाजल्यानंतर हात, पाय, मान यात अकडण निर्माण होते. त्याला ‘कॉन्ट्रॅक्चर’ असे म्हणतात. ती दूर करण्यासाठी फिजिओथेरपीचे सहाय्य घ्यावे लागते. करोनामुळे आपण सॅनिटायजेशन करीत असतो. त्यात अल्कोहोलचे प्रमाण असते. हातावर सॅनिटायजर घेतले व त्याच वेळी आगीच्या संपर्कात आला तर हात जळू शकतो. त्यामुळे सॅनिटायजर वापरताना काळजी घ्यावी.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *