गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करण्याचे फायदे
गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास आपल्या त्वचेचं हानिकारक गोष्टींपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. यामुळे तुमच्या नैसर्गिक सौंदर्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्वचा निर्जीव होणे, त्वचेवर सूज येणे, त्वचा कोरडी व रूक्ष होणे इत्यादी समस्या दूर होण्यात मदत मिळते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुलाबाच्या पाकळ्यांचा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यास उपयोग केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.
(Foot Care ‘या’ दगडच्या मदतीने दूर करा टाचांच्या भेगा व दुर्गंध, जाणून घ्या योग्य पद्धत)
गुलाबाच्या पाकळ्यांमुळे त्वचा होते सुंदर
- गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यातील पोषक घटक तुमच्या त्वचेच्या पेशींचे हानिकारक घटक आणि संसर्गापासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.
- आपली त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी गुलाब पाण्यासह तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचाही आहारामध्ये समावेश करू शकता.
(चेहऱ्याचंच नव्हे तर अंडरआर्म्स-पोट व शरीराच्या या भागांवरही फेशिअल करणं आवश्यक)
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असतात हे व्हिटॅमिन

गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांमध्ये आरोग्यासाठी लाभदायक व्हिटॅमिनचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामध्ये त्वचा सुंदर आणि मऊ होण्यास फायदेशीर असणारे कित्येक घटकही आहेत. उदाहरणार्थ…
- व्हिटॅमिन ए
- व्हिटॅमिन सी
- व्हिटॅमिन ई
- लोह
- कॅल्शिअम
(सॅनिटायझरचे त्वचेवरील दुष्परिणाम, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ उपाय)
हे जीवनसत्त्व आहेत सुंदर त्वचेचे रहस्य

- त्वचा निरोगी आणि सुंदर राहण्यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर लाभदायक मानले जातात. या व्हिटॅमिनचा आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास त्वचा सुंदर राहण्यास मदत मिळते.
- कारण हे व्हिटॅमिन आपल्या त्वचेच्या नवीन पेशींची निर्मित करण्यापासून ते त्वचेवरील डाग, संसर्ग आणि अॅलर्जीपासून त्वचेचं संरक्षण करण्यापर्यंत; इत्यादी समस्याही दूर करण्याचे कार्य करतात.
(अनुष्का शर्माच्या सौंदर्याचं सीक्रेट, फॉलो करतेय ‘या’ स्किन केअर टिप्स)
गुलकंद

आपल्यापैकी बहुतांश जणांनी गुलकंदची चव चाखली असावी. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये साखर किंवा मध मिक्स करून गुलकंद तयार केलं जातं. जर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या खाणे आवडत नसल्यास आपण गुलकंदाचंही सेवन करू शकता.
(लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट करायचीय? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे)
नितळ सौंदर्यासाठी रोझ टी

त्वचा डिटॉक्स करण्यासाठी आपण गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेल्या चहाचंही सेवन करू शकता. बाजारामध्येही तुम्हाला रोझ टी सहजरित्या मिळेल. हवे असल्यास आपण घरच्या घरी देखील रोझ टी तयार करून पिऊ शकता. पण यासाठी गुलाबाच्या ताज्या पाकळ्यांचा उपयोग करावा.
(त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक आहे मसूर डाळ, घरच्या घरी असे तयार करा नॅचरल फेस पॅक)
कसा करावा गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा?

- त्वचा नितळ आणि डागविरहित राहण्यासाठी रोझ टीचं सेवन करावं. हा चहा तयार करण्यासाठी एक कप पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि तीन ते चार मिनिटांसाठी पाणी उकळू द्या.
- दोन ते तीन मिनिटांसाठी चहावर झाकण ठेवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मधाचा उपयोग करू नये.
(हिवाळ्यामध्ये त्वचा निरोगी व मऊ राहण्यासाठी ‘या’ ब्युटी फेस पॅकचा करा उपयोग)
Source link
Recent Comments