थंडीच्या महिन्यात वाटाणे खाताय? मग जाणून घ्या ‘ही’ माहिती!

Spread the love

तुम्ही कधी मटार (Green peas) अर्थात वाटण्याची कचोरी खाल्ली आहे का हो? नाही? तर मग तुम्ही एकदा तरी नक्कीच हि डिश ट्राय करायला हवी. आपल्या महाराष्ट्रात हा पदार्थ फार बनवला जात नाही. उत्तर भारतात मात्र हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. खासकरून राजस्थान, दिल्ली या भागात मटर कचोरी सर्वाधिक प्रमाणात खाल्ली जाते.

तुम्हाला वाटत असले की केवळ टेस्टला हा पदार्थ चांगला म्हणून प्रसिद्ध असले तर असे नाही, उलट या पदार्थाचे फायदे सुद्धा आहेत. म्हणूनच हा पदार्थ प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल कचोरीचे फायदे? ते सुद्धा आरोग्यासाठी? तर हो मंडळी या मटर कचोरीचे आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत, खास करून थंडीच्या वातावरणामध्ये. चला तर आज या लेखातून आपण मटर कचोरी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

मटार कचोरी

अनेकांना हि गोष्ट माहित नाही पण वाटाणे हे नैसर्गिकरीत्या कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करतात. म्हणून थंडीच्या दिवसांत दर दिवशी वाटाण्याचे सेवन हे करायलाच हवे आणि हे सेवन करणे सोप्पे सुद्धा आहे कारण वाटाण्याचे कोणतेही पदार्थ बनवणे अतिशय सोप्पे आहे. भाजी, उसळ तुम्ही काहीही बनवू शकता आणि त्याचे सेवन करू शकता. कचोरी कोणतीही असो वाटाण्याची किंवा अन्य कसलीही, ती तयार करण्यासाठी कचोरी डीप फ्राय करावी लागते. यामुळे त्यात फॅटची मात्र वाढू शकते. परंतु जर फ्राय करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर केला तर मात्र ती मात्र वाढणार नाही.

(वाचा :- Air Pollution Safety Tips: डॉक्टरांच्या टिप्सचं पालन केल्यास आरोग्यावर होणार नाही प्रदूषणाचे दुष्परिणाम!)

वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयोगी

वाटाण्यामध्ये कॅलरी अतिशय कमी असते. जर वाटाण्याची कचोरी बनवण्यासाठी तुम्ही मल्टी ग्रेन आटा किंवा डायबेटीक आटाचा वापर केला तर त्या माध्यमातून शरीरात जास्त मेद जमा होणार नाही आणि तुम्ही मनसोक्तपणे कचोरीचा आनंद घेऊ शकता. वाटाण्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. या कारणामुळे पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही. म्हणूनच वाटाण्याचे सेवन केल्याने भूक लगेच शांत होते. याचा परिणाम असा होतो की कमी अन्न खाल्ल्याने अधिक कॅलरी सुद्धा शरीरात जमा होत नाही. यामुळे वाढते वजन नियंत्रित होते आणि वाढले वजन कमी होण्यास सुद्धा मदत मिळते.

(वाचा :- Ayurvedic Tips For Fitness : खुद्द एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या गंभीरातील गंभीर आजारांना दूर ठेवण्याचे आयुर्वेदिक नियम!)

वाटाण्याची वैशिष्ट्ये

ताज्या वाटाण्यामध्ये झिंक, कॉपर, लोह, मँग्नीज सारखे गुण आढळतात. जर तुम्ही नाश्त्यामध्ये वाटाण्याची कचोरी दही सोबत खाल्लीत तर तुम्हाला जेवणातून मिळणारे गुण प्राप्त होतील. अनेकांना हि गोष्ट माहित नाही मात्र वाटाण्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्हाला रक्तदाबाशी निगडीत समस्या असेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये आवर्जून वाटाणे खाल्ले पाहिजे. कारण यामुळे रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते आणि हार्ट स्ट्रोकचा धोका सुद्धा कमी होतो.

(वाचा :- पपई डाएट प्लॅनमुळे लठ्ठपणा होतो कमी! कशी करावी ‘या’ डाएट प्लॅनची अंमलबजावणी?)

ऑस्टियोपोरोसिस पासून बचाव

वाटाण्याचा अजून एक फायदा म्हणजे वाटाणे हे तुमची हाडे खिळखिळी होण्यापासून बचाव करतात. कारण हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन ‘क’ मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुमची हाडे कमजोर असतील तर तुम्ही थंडीच्या वातावरणात वाटाण्याचे सेवन नियमित केले पाहिजे. जाणकारांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून ज्यांना अशी समस्या असेल त्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वाटाणे खावेत असा सल्ला सुद्धा दिला जातो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हि समस्या असले तर आवर्जून वाटाण्याचे सेवन करून पहा.

(वाचा :- लसणात असतात हे खास गुणधर्म, रिकाम्या पोटी सेवन केल्यास होतो ‘या’ गंभीर आजारांपासून बचाव!)

वाटण्याचे जास्त सेवन

कोणतीही गोष्ट असो तिचे तुम्ही अतिसेवन केले तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. प्रत्येक गोष्ट मर्यादित प्रमाणात घेतली तरच त्याचे फायदे मिळतात. वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. जर तुम्ही वाटाण्याचे अतिसेवन केले तर शरीरातील फायबरचे प्रमाण सुद्धा वाढून अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा त्रास जर ओढवून घ्यायचा नसेल आणि वाटणे व इतर अन्य उत्तम पद्धतीने पचावे असे वाटत असेल तर वाटण्याचे मर्यादित प्रमाणात नियमित सेवन करा आणि निरोगी राहा. तर मंडळी आता थंडीचा काल सुरु झाला आहे आणि या काळात जास्त भूक लागते मात्र जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते. ते वाढू द्यायचे नसेल तर वाटाण्याच्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करा.

(वाचा :- वेट लॉससोबतच प्रदूषित हवेपासून फुफ्फुसांचं संरक्षण करतो ‘हा’ खास चहा, घरच्या घरी कसा बनवावा?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *