थंडीत खा ‘हे’ ८ पदार्थ, शरीराला उष्णता देण्यासोबतच वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!

Spread the love

अंग अंग गोठवणारी कडाक्याची थंडी आता सर्वत्र सुरु झाली आहे. हिवाळ्यामध्ये उबदार कपडे आणि हिटर भलेही आपल्याला बाहेरुन म्हणजेच शरीराच्या बाहेरील अवयवांना ऊब देण्याचं काम अगदी चोख करत असतील पण शरीराच्या आतील अवयवांना उष्णता प्रदान करण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं. हिवाळा म्हणजे साथीच्या रोगांचा काळ असं म्हटलं जातं.

त्यामुळे कडाक्याच्या थंडीत फक्त सर्दी-पडसं, खोकला, ताप अशाच समस्या उद्भवत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती कमी (tips for improve immune system) झाल्यामुळे इतर गंभीर आजारही शरीराला विळखा घालतात. पण जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला व यथायोग्य काळजी घेतली तर सर्दी-पडसंच काय तर इतर गंभीर आजारांपासूनही तुम्ही दूर राहू शकता. चला तर जाणून घेऊया खास थंडीत खाल्ले जाणारे व उष्णता प्रदान करणारे पदार्थ कोणते? जे शरीराला आतून गरम ठेवतील.

मध

मध हे अनेक पोषक तत्व व नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण असते. मध शरीराला भरपूर लवकर उर्जा प्रदान करण्यास मदत करते. मध आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यापासून बचाव करण्यासोबतच ती मजबूत बनवू शकते. मध घशातील खवखव दूर करते आणि शरीराला आतून उष्ण ठेवते. मधात अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे इतर गंभीर आजार शरीरापासून कोसो दूर राहतात. मधुमेह असणा-या लोकांनी मधाचे प्रमाणात सेवन करावे. मध घातलेला काढा घेणं थंडीच्या दिवसांत अत्यंत लाभदायक असतं.

(वाचा :- नियमित करा सर्वांगासन! मेंदू व हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करण्यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स करते दूर!)

साजूक तूप

हिवाळ्यात साजूक तूपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक व लाभदायक असते. तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. कारण तूपात फॅटी अॅसिड असतं. हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू, हलवा, शिरा, उपमा असे पदार्थ खाणं लाभदायक ठरु शकतं. तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी तूप फायदेशीर ठरते.

(वाचा :- मीठाच्या पाण्यात रोज बुडवून बसा पाय! थकवा, वेदना दूर होण्यासोबतच मिळतील आरोग्यवर्धक फायदे)

गुळ

गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. गोड पदार्थ व कॅफिनयुक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करुन त्याचे सेवन केले जाऊ शकते. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते. ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार उद्भवतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे. गुळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही जीवनसत्वे असल्यामुळे थकवा दुर होतो. घसा आणि फुफ्फुसातील संक्रमाणापासून वाचण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते ते लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकतात. कारण गुळ हा नैसर्गिक साखर आहे. तसेच गुळाच्या सेवनामुळे पचनक्रियासुध्दा चांगली राहते.

(वाचा :- डिप्रेशनमध्ये आहात? मग मेंदू हेल्दी ठेवणा-या ‘या’ डाएट प्लानने करु शकता समस्येवर मात!)

दालचिनी

हिवाळ्यामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी घातल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जेव्हा स्किन ड्राय होते तेव्हा दालचिनी पावडर गुलाबजलमध्ये मिसळून तुम्ही त्वचेवर लावू शकता. दालचिनीचे पाणी प्यायल्याने खोकला व लठ्ठपणावर मात करता येते.

(वाचा :- Food To Boost Your Mood : मन उदास असल्यास खालीलपैकी एक पदार्थ खा, मूड होईल लगेच बूस्ट!)

केसर

केसरचा सुगंध व स्वाद एखाद्या स्ट्रेसबस्टरचे काम करते. एक कप दुधात ४ ते ५ केसरच्या कांड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते. तसंच केसर त्वचेसाठी खूप फायदेशीर असते आणि याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो. जर तुम्हाला स्वच्छ आणि चमकती त्वचा हवी असेल तर केसरचा वापर जरुर करा. केसर आणि दूध योग्य प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. तुम्ही ही पेस्ट फेसपॅक प्रमाणे रोज किंवा दर आठवड्याला दोन वेळा लावू शकता. तसंच याच्या सेवनाने त्वचेची पोतही सुधारते.

(वाचा :- छोटी-मोठी कामं केल्यानंतरही धाप लागते आहे? मग जाणून घ्या त्यामागील कारणे व उपाय!)

मोहरीचं तेल

मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतो. सफेद व काळ्या रंगाच्या मोहरीमध्ये एलिल आइसोथियोसाइनेट नामक घटक आढळतो. जो आपल्या शरीराचं तापमान योग्य पद्धतीने वाढवतं.

(वाचा :- करोनानंतरचं जीवन सुरु करताना मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असा करा दिनक्रम सेट!)

तीळ

तीळाचा वापर चिक्की व इतर हिवाळ्यातील मिठाईंमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो. तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात.

(वाचा :- यावेळी खा ‘वेज पनीर भुर्जी’, लठ्ठपणा कमी करण्यास मदत करेल ही लो फॅट रेसिपी!)

आलं

आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी औषधांच्या स्वरुपात देखील वापरलं जातं. आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतं. ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात. खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं.

(वाचा :- पोट सतत खराब होतं? मग जाणून घ्या तुमचा इटिंग पॅटर्न किती योग्य आहे?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *