दम आलू रेसिपी

Spread the love

How to make: दम आलू रेसिपी

Step 1: टोमॅटो व काजूची पेस्ट

मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेले टोमॅटो आणि चार ते पाच काजू एकत्र वाटून घ्या. यानंतर एक हिरवी मिरची आणि आल्याचा छोटा तुकडा एकत्र कुटून घ्यावा.

Step 2: बटाटे सोलून घ्या

एका बाउलमध्ये सहा ते सात मध्यम आकाराचे बटाटे घ्या आणि फोर्कच्या मदतीने बटाट्यांमध्ये छिद्रे करून घ्यावेत. यामुळे बटाट्यांमध्ये भाजीचा रस्सा योग्य पद्धतीने मिक्स होईल.

Potato

Step 3: मसाल्यांमध्ये बटाटे मिक्स करा

आता बाउलमध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. बटाटे सर्व मसाल्यांमध्ये योग्य पद्धतीने मिक्स करून घ्या.

Saute the potatoes with the masalas

Step 4: तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्या

यानंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर बटाटे दोन मिनिटे फ्राय करा. फ्राय केलेले बटाटे वेगळे ठेवा.

Fry Potatoes For 2 Minutes

Step 5: गरम मसाले करा फ्राय

आता पॅनमध्ये आणखी थोडं आणखी तेल ओता. तेलात चिमूटभर हिंग, एक चमचा जिरे, एक मोठा वेलदोडा, दोन ते तीन काळी मिरी, एक लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा फ्राय करा. यानंतर मिरची आणि आल्याची पेस्ट देखील घालावी. मिश्रण एक ते दोन मिनिटे शिजू द्या. यानंतर मिश्रणात टोमॅटोची पेस्ट मिक्स करावी.

garam masala

Step 6: भाजीचा रस्सा घट्ट होईपर्यंत सामग्री शिजवा

चार ते पाच मिनिटांनंतर मिश्रणात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे धणे पूड आणि कसूरी मेथी पावडर मिक्स करावी. चवीनुसार मीठ घालून सामग्री नीट शिजवून घ्या. यानंतर बटाट्याचे मिश्रणाचाही त्यात समावेश करावा. आता दोन चमचे गरम मसाला घालून रस्सा घट्ट होईपर्यंत सामग्री शिजू द्यावी.

potato gravy

Step 7: स्वादिष्ट भाजी आहे तयार

बटाट्याच्या खमंग रस्सा भाजीचा पोळीसोबत आस्वाद घ्या.

Dum Aloo

Step 8: दम आलू रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण व्हिडीओ

खमंग बटाटा रस्सा भाजी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *