स्टायलिश लुक
अनलॉक ५.० मध्ये आता बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी मंडळी देखील हळूहळू आपापल्या कामाकडे वळू लागली आहेत. काही अभिनेते, अभिनेत्रींनी काम करण्यास सुरुवातही केल्याचं दिसत आहे. तर काही सेलिब्रिटी घरामध्येच राहून स्वतःचे स्टायलिश अवतारातील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. तिनं काही दिवसापूर्वी घरातच फोटोशूट केलं. यासाठी दिशानं अतिशय सुंदर ड्रेसची निवड केली होती. आपल्या स्टायलिश लुकने तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(अंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का?)
कसे होतं आउटफिट?

नुकत्याच केलेल्या फोटोशूटसाठी दिशा पटानीने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल मिनी ड्रेसची निवड केली होती. यावरील चमकदार असलेल्या सूर्यफुलाच्या प्रिंटमुळे ड्रेस अधिक आकर्षक दिसत होता. स्कूप्ड नेकलाइन आणि पफी स्लीव्ह्ज असणाऱ्या या पोषाखावर तुम्ही रफल डिझाइन देखील पाहू शकता. यामुळे ड्रेसला सुंदर लुक मिळाला आहे. या ड्रेसमध्ये बॅक कट आउट फीचर आकर्षक हेमलाइनस जोडण्यात आले होतं. महत्त्वाचे म्हणजे हा स्टायलिश ड्रेस परिधान करण्यास कम्फर्टेबल देखील आहे.
(अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडची हटके फॅशन, तिचे स्टायलिश फोटो पाहिले का?)
दिश पटानीचा लुक

दिशाच्या लुकबाबत सांगायचे झाले तर तिनं स्कूप्ड नेकलाइन डिझाइन असणाऱ्या या ड्रेससह कमीत कमी मेकअप केला होता. डॅनी अॅक्सेसरीजमधील हार्ट शेप हुप्स आणि साध्या पेंडेंटची निवड केली होती. तसंच गुलाबी रंगाचं लिपस्टिक लावलं होतं आणि केस मोकळे सोडले होते. या साध्या ड्रेसमध्येही दिशा अतिशय स्टायलिश दिसत होती. दरम्यान दिशाचा हा ड्रेस अतिशय कमी बजेटमधील आहे.
(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)
तुम्हाला आवडला ड्रेस?

दिशाचा हा फ्लोरल मिनी ड्रेस तुम्हाला आवडला आहे का? तुम्ही देखील आपल्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये या ड्रेसचा समावेश करू शकता. या ड्रेसची किंमती ५ हजार रुपये एवढी आहे. दिशाचं हे आउटफिट ऑस्ट्रेलियातील ‘पेटल आणि पुप ब्रँड’चे आहे. या ड्रेसची किंमत जवळपास ५ हजार ८६२ रुपये एवढी आहे. जर तुम्हाला देखील स्टायलिश लुक हवा असल्यास हा फ्लोरल मिनी ड्रेस एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतो.
(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)
फ्लोरल ड्रेसची आवड

दरम्यान दिशा पटानीला फ्लोरल पॅटर्न ड्रेस परिधान करणं पसंत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवर नजर टाकल्यास ही बाब तुमच्याही लक्षात येईल. साधारणतः डेनिम शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्येच बहुतांश वेळा दिसणारी दिशा आता आपल्या वॉर्डरोबमध्ये फ्लोरल आउटफिट्ससाठी खास जागा तयार करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं हाय स्लिट मायक्रो फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील स्टायलिश फोटो पोस्ट केले होते. तर यापूर्वी नूडल स्ट्रॅप्स आणि प्लंजिंग नेकलाइन ड्रेसमध्येही ती दिसली होती.
(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)
Source link
Recent Comments