दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

​अवॉर्ड शोसाठी परिधान केला होता ड्रेस

दीपिकाने (Deepika Padukone Fashion) एक अवॉर्ड शोसाठी कस्टम मेड ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस विशेष स्वरुपात स्टाइल आणि डिझाइन करण्यात आला होता. फॅशन डिझाइनर गौरी आणि नैनिका यांनी हा ड्रेस डिझाइन केला होता.

(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

बॉडीकॉन फिटिंग असणाऱ्या आउटफिटमध्ये दीपिका सुंदर दिसत होती. पण नेटकऱ्यांना दीपिकाचा हा ग्लॅमरस लुक अजिबात आवडला नाही.

(Bridal Look ‘या’ नववधूने संगीत सोहळ्यासाठी फॉलो केली अनुष्का शर्माची स्टाइल, पाहा फोटो)

​बिग फ्लॉवर आणि फ्रिल्सचे डिझाइन

दीपिकाच्या या ड्रेसमध्ये सॅटन मेड फ्रिल्स होते, ज्याचे डिझाइन पूर्णतः लेअर्समध्ये विभागण्यात आलं होतं. तसंच आउटफिटला टेल डिझाइन देखील देण्यात आलं होतं. या ड्रेसमध्ये स्लिट डिझाइन देऊन त्यावर न्यूड रंगाचे मटेरिअल देखील जोडण्यात आलं होतं. पण हे डिझाइन आउटफिटवर चांगलं दिसत नव्हतं.

(बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?)

तर दुसरीकडे वन शोल्डर गाउनच्या एका बाजूला मोठ्या आकाराच्या फुलाचंही डिझाइन देण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता. यामुळे दीपिकाचा चेहरा पूर्णपणे झाकला जात होता.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

​नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

दीपिका पादुकोणचे (Deepika Padukone) या ग्लॅमरस अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी दीपिकाचा आतापर्यंत सर्वांत घाणेरडा ड्रेस अशीही प्रतिक्रिया दिली.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

तर काहींनी तिच्या आउटफिटची तुलना पडद्यांसोबतही केली होती. या आउटफिटमुळे दीपिका पादुकोणचा लुक पूर्णपणे खराब झाला होता, याकडे तिच्या चाहत्यांनीही लक्ष वेधलं. अशा पद्धतीने दीपिकाच्या लुकवर लोकांनी जाहिररित्या नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

(ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली)

​स्टायलिस्टलाही रागाचा सामना करावा लागला

दीपिकाच्या (Deepika Padukone Style) या ब्लॅक ड्रेस लुकसाठी लोकांनी तिची स्टायलिस्ट शालिना नथानीला जबाबदार ठरवलं. लोकांनी शालिनावर देखील भरपूर टीका केली. दीपिकानं आपली स्टायलिस्ट बदलून घ्यावी, असा सल्ला देखील लोकांनी दिला.

(स्टायलिश ड्रेसवरून नेटिझन्सनी अभिनेत्री मौनी रॉयला केलं होतं ट्रोल, म्हणाले…)

एवढंच नव्हे तर शालिनाने अशा प्रकारे नॅचरल ब्युटी दीपिकाचा लुक पुन्हा कधीही खराब करू नये, यासाठी दुसऱ्या स्टायलिस्टकडून काही गोष्टी शिकाव्यात, असं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *