दीपिका पादुकोणच्या ‘या’ स्टायलिश लुकवर लोकांनी व्यक्त केली होती नाराजी, म्हणाले…

Spread the love

बॉलिवूडमधील सुपरस्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) नावाचाही समावेश आहे. फिट फ्लेअर्सपासून ते हाय वेस्ट मॉम जीन्स, क्लासिक साडीपासून ते डिझाइनर सूटपर्यंत कित्येक सुंदर-सुंदर आउटफिट (Fashion Tips) दीपिका पादुकोण सहजरित्या कॅरी करते. तिचं स्टाइल स्टेटमेंट अतिशय हटके आहे. इंटरनॅशनल रेड कार्पेट इव्हेंटसाठी व्हॉल्युमिनस गाउनपासून ते ऑल-आउट ड्रामॅटिक गाउन, लिमोसिन ट्युल ड्रेसपर्यंत असे फॅशनेबल आउटफिट तिनं परिधान केले आहेत. पण कधी-कधी अति स्टायलिश दिसणं देखील अभिनेत्रींना महाग पडते, नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरं जावे लागते.

तर कधी अभिनेत्रींवर हॉलिवूडमधील हिरोईन्सची स्टाइल कॉपी करण्याचाही आरोप केला जातो. दीपिका पादुकोणसोबतही अशाच काहीशा घटना कित्येकदा घडल्या आहेत. दीपिका पादुकोणनंही एका हॉलिवूड अभिनेत्रीची स्टाइल कॉपी केल्याचे नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. दीपिकाने नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्स २०२० या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. पण ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी ‘कॉपी लुक’ म्हणत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (Photos-Instagram)
(करीना कपूरला ‘या’ ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल, म्हणाले…)

​स्टायलिश लुक पडला महाग

वर्षाच्या सुरुवातीस नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये दीपिका पादुकोणनं आपली शानदार उपस्थिती दर्शवली होती. इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमासाठी अभिनेत्रीनं मोनोक्रोमॅटिक बोल्ड स्ट्रॅपलेस गाउनची निवड केली होती. तिचा हा गाउन प्रसिद्ध फॅशन डिझाइनरनं तयार केला होता. पण दीपिकाचा हा अवतार पाहून सर्वांना हॉलिवूड सेलिब्रिटी काइली आणि केंडल जेनरची आठवण आली. यापूर्वीही दीपिकाच्या लुकची तुलना काइली जेनरच्या स्टाइलसोबत करण्यात आलीय. दीपिकाने IIFA अवॉर्ड्ससाठी परिधान केलेला झगमगता लाइलॅक गाउन देखील काइलीच्याच स्टाइलची कॉपी असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

​आउटफिट केलं होतं कॉपी?

दीपिका पादुकोणला क्लासिक ब्लॅक गाउन परिधान करणं पसंत आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दरम्यान या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी दीपिकाने पॅरिसमधील फॅशन डिझाइनर यानिना कॉउचरने डिझाइन केलेल्या स्ट्रॅपलेस ब्लॅक गाउनची निवड केली होती. या ड्रेसमुळे दीपिकाला आकर्षक लुक मिळाला होता. प्लंजिंग नेकलाइन आणि अ‍ॅड-ऑन रफल्ड स्लीव्ह्जमुळे दीपिकाचे हे आतापर्यंतचे हटके आउटफिट होतं. या ग्लॅमरस ड्रेसवरील ड्रमॅटिक स्लीव्ह्ज डिझाइन पाहून सर्वांना काइली जेनरच्या ‘मेट गाला’ ड्रेसचे डिझाइन आठवलं.

(ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत; अभिनेत्रींच्या या ५ अतरंगी लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती)

​मेकअपवरून केली टीका

ड्रेसव्यतिरिक्त नेटकऱ्यांनी दीपिका पादुकोणवर मेकअपवरूनही टीकास्त्र सोडलं. या क्लासिक आउटफिटला ग्लॅमरस टच देण्यासाठी दीपिकाने न्यूड मेकअप केला होता. यामध्ये लाइट टोन लिपस्टिक, शिमरी आयशॅडो, मस्कारा, बीमिंग हायलाइटर, बोल्ड कोल्ड आईज आणि वेव्ह हेअर स्टाइल असा पॅटर्नचा मेकअप तिनं केला होता. या ड्रेसवर दीपिकाने हिऱ्यांचा सुंदर व मोहक चोकर नेकलेस परिधान केलं होतं. तिचे ईअररिंग्ज देखील स्टायलिश होते. पण मेकअपमुळे तिचा लुक खराब दिसत होता.

(कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अनन्या पांडेनं परिधान केले इतके स्वस्त कपडे, पाहा फोटो)

​दीपिकाच्या लुकची परदेशी मॉडेलसह केली तुलना

आपला अवतार ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसावा, यासाठी दीपिकाने कोणतीही कसर सोडली नव्हती. पण तरीही लोकांना तिचा ड्रेस पोर्तुगालमधील मॉडेल सारा संपाओच्या स्टाइलची कॉपी असल्याप्रमाणे वाटला. दीपिकाचे या अवतारातील फोटो जसे सोशल मीडियावर व्हायरल झाले तसे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिच्या आउटफिटची तुलना सारा संपाओसह काइलीचा ड्रेस आणि केंडल जेनरच्या स्टाइलसोबत केली. तर काही लोकांनी दीपिकाचा हा लुक देखील नेहमी प्रमाणेच दुसऱ्या सेलिब्रिटींच्या स्टाइलची कॉपी असल्याचंही म्हटलं.

(लग्नासाठी ऑनलाइन खरेदी करताय? मग या १४ गोष्टी नक्की ठेवा लक्षात)

दीपिका पादुकोणचा ‘ऑल इन ब्लॅक’ लुक
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *