दीपिका पादुकोणच्या स्टाइलवर भारी पडली २ मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीची ‘ही’ फॅशन

Spread the love

​ऑल ब्लॅक लुकमध्ये शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचे स्टायलिश अवतारातील फोटो नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले. शिल्पा पती राज कुंद्रासोबत डिनरपार्टीसाठी गेली होती. तेव्हा तिचा मोहक व फॅशनेबल लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. या अभिनेत्रीनं ऑल ब्लॅक स्टाइल कॅरी केली होती. लेदर मेड स्ट्रेट कट पँटमध्ये शिल्पा सुंदर दिसतेय. अँकल लेंथ इन बॉटम्ससह तिनं स्किनफिट हाई नेक टॉप घातलं होतं. या टॉपमध्ये कटआउट डिझाइन आपण पाहू शकता. या आउटफिटमुळे शिल्पाला स्टायलिश लुक मिळालाय.

(हिना खानच्या ‘या’ स्वस्त ड्रेससमोर फिका पडला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक)

​शिल्पा शेट्टीचा स्टायलिश लुक

स्टायलिश लुक मिळावा यासाठी शिल्पाने एका-एका अ‍ॅक्सेसरीजची अतिशय बारकाईनं निवड केली होती. काळ्या रंगाच्या टॉप आणि पँट्ससह या अभिनेत्रीनं काळ्या रंगाचे स्ट्रॅप हील्स परिधान केले होते. तर दुसरीकडे तिनं लाल रंगाची स्लिंग बॅग कॅरी केली होती. या बॅगवर सोनेरी रंगाची चेन आपण पाहू शकता. शिल्पाने ज्वेलरी म्हणून केवळ मोठे हूप्स ईअररिंग्स घातले होते. तिनं लाइट टोन मेकअपसह आणि वेव्स हेअर स्टाइल केली होती.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

​स्टायलिश कपल जेनेलिया आणि रितेश

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रासह जेनेलिया डिसुझा व रितेश देशमुख देखील डिनरसाठी पोहोचले होते. या डिनर पार्टीसाठी जेनेलिया आणि रितेशनं कॅजुअल लुकची निवड केली होती. रितेशनं लायनिंग पॅटर्नचं हाफ स्लीव्ह्ज शर्ट घातलं होतं, ज्यावर अ‍ॅप्लीके वर्क देखील होतं. या आउटफिटवर त्यानं फिकट रंगाची जीन्स आणि राखाडी रंगाचे शूज मॅच केले होते. तर जेनेलियाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे डायमंड चेकर्ड पॅटर्न शॉर्ट्स आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलं होते. यावर तिनं आकर्षक पॅटर्नमधील काळ्या रंगाचे हील्स मॅच केले होते.

(कांजीवरमपासून ते गोल्ड जरीपर्यंत, रेखा यांच्या ‘या’ सुंदर साड्यांसमोर फिके पडतील महागडे लेहंगे)

​दीपिकाचे प्लंजिंग नेकलाइन टॉप

दीपिका पादुकोण सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण यादरम्यान तिचा एकापेक्षा एक स्टायलिश अवतार चाहत्यांना पाहायला मिळत आहे. नुकतेच तिचा लेटेस्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये दीपिकाने फिकट निळ्या रंगाची बॅगी जीन्स घातल्याचे आपण पाहू शकता. यावर तिने स्किन फिट ब्लॅक स्लीव्हलेस टॉप घातलं होतं. या टॉपच्या प्लंजिंग नेकलाइन डिझाइनमुळे दीपिकाला ग्लॅमरस लुक मिळाला आहे. दीपिकाने या लुकवर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते.

(सारा अली खानने परिधान केला होता ‘हा’ वजनदार लेहंगा, नेटकऱ्यांनी म्हटलं…)

​विद्याचे साडीवरील विशेष प्रेम

विद्या बालनचं साडीवरील विशेष प्रेम जगजाहीर आहे. ही अभिनेत्री बहुतांश वेळा पारंपरिक वेशभूषेमध्येच दिसते. नुकतेच तिचे गडद राखाडी आणि गुलाबी रंगाच्या गिंगम पॅटर्न साडीमधील फोटो पाहायला मिळाले. तिच्या साडीच्या बॉर्डरवर गुलाबी रंगाची लेस जोडण्यात आली होती. सिल्क फॅब्रिकच्या ब्लाउजवर साडीशी मॅचिंग असलेल्या धाग्यांनी आकर्षक वर्क देखील करण्यात आलं होते. या साडीचे पॅटर्न साधं पण अतिशय मोहक आहे.

(ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत; अभिनेत्रींच्या या ५ अतरंगी लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *