दुधाचे आठवडाभर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करा सेवन, दिसतील आश्चर्यकारक फायदे!

Spread the love

मखाना मिल्क

तुम्ही पहिल्या दिवशी ट्राय करू शकता मखाना फ्लेवर दूध! मखाना फ्लेवर दूध बनवण्यासाठी प्रथम हवं तितकंच दूध घ्या. नंतर त्यात एक मुठभर मखाना टाकून ते मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. एकदा मिक्सरचं काम झालं की यात चवीप्रमाणे साखर टाका. झालं तुमचं मखाना फ्लेवर दूध तयार! मखानामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘ड’ आणि लोह असते तर दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हा फ्लेवर पौष्टिक देखील मानला जातो.

(वाचा :- उतारवयापर्यंत निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय? मग बहुगुणी कडुलिंबाचा असा वापर करुन बघाच!)

केसर फ्लेवर

केसरयुक्त दूध तर तुम्ही अनेकदा प्यायला सुद्धा असाल व पीत सुद्धा असाल. पण तुम्हाला हे कसे बनवतात ते माहित नसेल तर चला जाणून घेऊया. यासाठी एक ग्लास दूध भांड्यात मंद आचेवर उकळवायला ठेवा. दूध गरम होत असतानाच यात केसर टाका. एकदा का केसर त्यात चांगली मिक्स झालं की त्यात साखर सुद्धा टाकून दोन ते तीन मिनिट तसेच ठेवा. बस्स नंतर छानपैकी केसर फ्लेवर मिल्कचा आस्वाद घ्या.

(वाचा :- उतारवयापर्यंत निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय? मग बहुगुणी कडुलिंबाचा असा वापर करुन बघाच!)

हिरवी वेलची

हिरवी वेलची फ्लेवर एक स्वादिष्ट पर्याय आहे. हे दूध तयार करण्यासाठी सव्वा ग्लास दूध घ्या. हे दूध गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि एक हिरवी वेलची वाटून या गरम होणाऱ्या दुधामध्ये टाका. जेव्हा दुधाला उकळ्या येतील तेव्हा ते आचेवरून उतरवून गाळून घ्या. आता तुम्ही यात तुमच्या मनाप्रमाणे चवीसाठी साखर टाकू शकता. साखर चांगली एकजीव होऊ द्या आणि घरगुती वेलची फ्लेवर मिल्क मिटक्या मारत संपवा.

(वाचा :- लघुशंकेवेळी होणा-या जळजळ-वेदनांची कारणे आणि रामबाण घरगुती उपचार!)

मध आणि दुध

असा मनुष्य सापडणे फार कठीण ज्याला मध आवडत नाही. तुम्हालाही आवडत असेलच ना? मग त्याचा वापर दुधामध्ये करून दूध अधिक चविष्ट करा ना! या स्पेशल फ्लेवरचे दूध बनवण्यासाठी सामान्य तापमानावर दूध गरम करायला ठेवा. मग दूध थोडे कोमट होऊ द्या. आता यामध्ये मध मिसळा आणि चांगले मिक्स होऊ द्या. अशा पद्धतीने तुमचे हनी फ्लेवर मिल्क तयार झाले. मधामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैर्सगिक साखरेचा समावेश असतो. त्यामुळे हे दूध खूप पौष्टिक सुद्धा असते.

(वाचा :- मृत्युनंतर कोणत्या अवयवात किती तास जीव असतो?)

ड्राईफ्रूट्स मिल्क

सगळ्या फ्लेवर मध्ये बेस्ट म्हणजे ड्राईफ्रूट्स मिल्क होय पण सावधान! एकदा का या दुधाची चटक लागली तर तुम्ही दुसरे फ्लेवर्स स्वीकारणारच नाही. काजू, बदाम , मनुका जे जे ड्राईफ्रूट्स तुमच्याकडे उपलब्ध असतील ते वापरून तुम्ही हे भन्नाट दूध बनवू शकता. एका ग्लास मध्ये दूध घ्या आणि ते मंद आचेवर गरम करायला ठेवा आता यामध्ये तुमचे ड्राईफ्रूट्स टाका आणि दूध गरम झाले की मस्त त्याचा आस्वाद घ्या. जर तुम्हाला कच्चे ड्राईफ्रूट्स आवडत असतील तर दूध गरम होत असताना त्यात ड्राईफ्रूट्स टाकू नका. दूध गरम झाल्यावर मग ते आचेवरून उतरवल्यावर त्यात ड्राईफ्रूट्स टाका. तर मंडळी असे आहेत हे दुधाचे विविध फ्लेवर्स! या शिवाय तुम्ही सुद्धा नवनवीन प्रयोग करून स्वत:चे फ्लेवर्स बनवू शकता. काहीही करा पण रोज दूध अवश्य प्या आणि मस्त सुदृढ राहा!

(वाचा :- बॉडी बनवण्याच्या नादात घेऊ नका प्रोटीनचे ओव्हरडोस नाहीतर…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *