धोका दिल्यानंतर रणबीरला असा करावा लागला होता पश्चाताप, नात्याला खेळ समजणा-यांनी घ्यावा धडा!

Spread the love

रणबीर कपूर (ranbir kapoor) याचं नाव इतक्या मुलींसोबत जोडलं गेलंय की एक काळ असा आला की त्याला बॉलीवूडचा ‘प्लेबॉय’ देखील म्हटलं जात होतं. रणबीर कपूरचं सर्वात जास्त चर्चेत आलेलं नातं दीपिका पदुकोण (deepika padukon) हिच्यासोबतचं होतं. भले नंतर ते दोघे चांगले मित्र-मैत्रीण झाले पण ब्रेकअप नंतरचा जो फेज होता त्याने अतिशय वाईट वळण घेतलं होतं. खास करुन तेव्हा जेव्हा दीपिकाने अप्रत्यक्षपणे कॉमेंट्स करुन रणबीरवर निशाणा साधला होता.

त्यानंतर रणबीरने देखील मान्य केलं की त्याने धोका दिला होता. पण यातून त्याने मोठा धडा देखील घेतला. ज्यामुळे त्याची नात्याबाबतचे विचार देखील बदलले आहेत. रणबीरने जसं एका प्रसंगातून पश्चाताप करत स्वत:ला इतकं ट्रान्सफॉर्म केलंय ते पाहता ज्या व्यक्ती नात्याला फक्त एका खेळाच्या किंवा मनोरंजनाच्या दृष्टीने बघतात त्यांच्यासाठी हा एक मोठा धडाच म्हणावा लागेल.

हो, मी धोका दिला

दीपिका पदुकोणने अप्रत्यक्षपणे म्हणजेच नाव न घेता बहुतांश वेळा हे जाहिर केलंय की नात्यात असून देखील रणबीरने धोका तिला दिलाय. इतकंच नव्हे तर दुसरी संधी देऊनही तिच्या नशीबी धोकाच आला हे देखील ती वेळोवेळी सांगते. एका मुलाखतीमध्ये रणबीरला याविषयी जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने आपली चूक कबुल करण्यासोबतच त्यातून मिळालेल्या धड्याविषयी सुद्धा सांगितलं. रणबीर म्हणाला की, “हो, मी धोका दिला. ही एक अशी कृती होती जी माझ्याकडून अनुभवा अभावी आणि बालिशपणामुळे घडली.” असभ्य वागणुकीमुळे मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकलो नाही. अशा परिस्थितीत असं वाटतं की जर आपल्या मनात नाही तर का आपण त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहावं? पण नंतर मात्र आपल्याला त्या कृतीचा पश्चाताप आणि चुकीची जाणीव होते.

(वाचा :- का केली नीता अंबानी यांनी श्लोका मेहताची सून म्हणून निवड?)

चांगला जोडीदार गमावून बसतो

असे कितीतरी लोक तुम्हाला भेटतील किंवा अशी कित्येक लोक आपल्या आजुबाजूला असतात ज्यांनी आपल्या जोडीदाराला धोका दिला आणि नातं तुटल्यानंतर त्यांना समजलं की आपण किती चांगल्या व्यक्तीला कायमचं गमावून बसलो आहोत किंवा आपण एका चांगल्या व्यक्तीला धोका देऊन वाईट वागलो आहोत. एक काळ असा असतो जेव्हा आपल्याला वाटतं माझ्या आयुष्यात खूप लोक आहेत मला गरज नाही कोणाची! पण एकदा का मॅच्योरनेस आला की आपल्याला समजतं की आयुष्यात खूप नाही तर एका ख-या आणि प्रेम करणा-या व्यक्तीची गरज असते.

(वाचा :- मैं अपनी फेव्हरेट हूँ…असं म्हणून तर बघा, स्वत:वर प्रेम करुन तर पाहा!)

धोका सगळं संपवतो

रणबीरने हे देखील मान्य केलं की जेव्हा नात्यात धोका येतो तिथेच त्या नात्याचा पाया ढासळतो. त्याने यातून होणा-या नुकसानाविषयी देखील मत मांडलं होतं. एकदा का नात्यात धोका आला की नात्यातील एकमेकांविषयीचा आदर आणि विश्वासाची भावना कायमची संपून जाते. कारण हे दोन नात्याचे असे स्तंभ आहेत ज्यावर नात्याची गुढी उभारली जाते. त्यामुळे या स्तंभांसोबत कोणताही खेळ करणं म्हणजे नात्याला आगीत ढकलण्यासारखं असतं.

(वाचा :- मुली देतात जोडीदार निवडताना मुलांमधील ‘या’ ५ गुणांना प्राधान्य!)

धोक्यानंतर नातं पूर्ववत होत नाही

धोका देणारा व्यक्ती त्यातून धडा घेऊन बदलला तरी पुढे जाऊन त्याचं नातं पुन्हा कधीच पूर्ववत होत नाही. कारण धोका दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वास तर संपतोच पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. ती व्यक्ती धोका देणा-या व्यक्तीला ना पहिल्यासारखा आदर देऊ शकत नाही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकू शकत. तो भलेही बोलून दाखवत नसेल पण त्याच्या मनात संशयाची पाल कायम चुकचुकत राहते आणि पुन्हा धोका मिळण्याची भीतीही दाटलेली असते. हेच कारण आहे की संधी दिल्यावर, माफ केल्यानंतरही धोका दिलेली नाती ही तुटतातच.

(वाचा :- म्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड, ही आहे अंबानीच्या जावयाची खासियत!)

नातं सांभाळायचं कसं हे शिकलो

एका मुलाखतीत रणबीर कपूरने मान्य केले होते की आता तो सिरियसरी नात्यांवर भर देऊ लागला आहे. आता त्याचं ध्येय हेच आहे की असं नातं जपणारी मुलगी शोधायची आणि तिच्यावर इतकं प्रेम करायचं की आयुष्याच्या प्रत्येक उतार-चढावामध्ये ती साथ देईल. आता तो शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म रिलेशनशीपच्या विचारात आहे. इतंकत नव्हे तर तो हे देखील म्हणाला की, आता तो त्याची वैयक्तिक आयुष्य वैयक्तिकच ठेवू इच्छितो जेणे करुन नको त्या अफवांची झळ सुंदरश्या नात्याला पोहचू नये. तर मंडळी, नात्यात चूक होणं सामान्य आहे पण त्यातून धडा घेणं अत्यंत गरजेचं असतं. असं केल्यासच माणूस आयुष्यात एक क्वालिटी रिलेशनशीप जगू शकतो.

(वाचा :- प्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु नका ‘या’ चूका!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *