नखांवर सरी बरसू द्या!

Spread the love

वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ

सध्या लॉकडाउनमुळे हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे तुम्ही वेळ घालवण्यासाठी नेलआर्टचा पर्याय आजमावून पाहू शकता. सध्या नेलआर्टमध्येही अनेक पॅटर्न आणि डिझाइनचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. पावसाळ्याला साजेसे आणि ट्रेंडमध्ये असेलेले नेलआर्टचे डिझाइन्स खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पाऊस आणि फॅशन

पावसानं दमदार हजेरी लावली आहे. व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसाचा हा प्रभाव फॅशनवरही पडलाय बरं का! नेल आर्ट करतानासुद्धा तुम्ही काही मन्सून स्पेशल डिझाइन्स करून पाहू शकता. यात तुम्ही छत्री, पाऊस, ढग अशा पद्धतीचं नेल आर्ट करू शकता.

हट के अंदाज

तरुणांसाठी सोशल मीडिया म्हणजे मूलभूत गरज झाली आहे. तर अशा तमाम सोशल मीडियाप्रेमींसाठी जे सतत इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, स्नॅपचॅटवर सेल्फी पोस्ट करत असतात. अशांसाठी सोशल मीडिया नेलआर्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामध्ये युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टावरचे लाइक, शेअर, कमेंटची चिन्ह किंवा एमोजीस काढल्या जातात.

नखांवर चहा-मक्याचे दाणे

पावसाची पहिली सर बरसली की आपल्याला मक्याचं कणीस आणि वाफाळलेला चहा आठवतो. याच मनातल्या भावना फॅशनमध्येही दिसत आहेत. मक्याच्या दाण्याचं डिझाइन नखांवर साकारण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याच्या जोडीला वाफाळलेल्या चहाचा कपदेखील डिझाइन केला जातो.

फळं-भाज्यांची क्रेझ

विविध डिझाइन्ससोबत अनेक जण फळ-भाज्यांचे नेलआर्ट डिझाइन्स फॉलो करताना दिसत आहेत. या डिझाइन्समध्ये विविध भाज्यांची डिझाइन्स नखांवर काढली जातात. तुम्ही भाज्यांसोबतच चेरी, अननस यांसारख्या अनेकविध फळांची चित्र देखील साकारु शकता.

करोनाचा फॅशन ट्रेंड

सध्या जगभर करोना थैमान घालत असतानाच या विषाणूनं फॅशन क्षेत्रदेखील सोडलेलं नाही. करोना निगडित जनजागृती करण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश देणारं नेलआर्ट ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे नेल आर्टच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा हट के प्रयत्न तुम्ही देखील करू शकता.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *