नवजात बाळाच्या डोक्याला गोल आकार द्यायचा आहे? मग ट्राय करा ‘या’ टिप्स!

Spread the love

बाळाच्या डोक्याचा आकार बिघडण्याचे कारण

डिलिव्हरीच्या वेळेस जन्म नलिकेमधून जाताना बाळाचे डोके मोल्ड होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये डोक्याच्या मागे दबाव पडल्याने किंवा पाठीवर झोपल्याने बाळाच्या डोक्याच्या आकारामध्ये बदल दिसून येऊ शकतो. प्रीमेच्युर बेबीच्या डोक्याच्या आकारात सुद्धा बदल होऊ शकतो. अशा बाळांचे शरीर मुलायम असते आणि हाडे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. जन्म नलिकेमधून बाहेर येताना बाळाच्या डोक्याचा आकार बदल्याची शक्यता सर्वाधिक असते. तसेच गर्भामध्ये एम्‍निओटिक फ्लूईड कमी असल्याने सुद्धा बाळाच्या डोक्याचा आकार बिघडतो. जुळे वा तिळे झाल्यास सुद्धा बाळांना गर्भात हालचाल करण्यास पुरेशी जागा न मिळाल्याने डोक्याचा आकार बदलतो.

(वाचा :- मुलांना टायफॉइड झाल्यास ही आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार!)

नवजात बाळाचे डोके कधी होते विकसित

नवजात बाळाच्या डोक्यामध्ये दोन स्पॉट असतात. एक वरच्या बाजूस आणि एक खालच्या बाजूस! डोक्याच्या मागचा स्पॉट सहा आठवड्यांनी बंद होतो आणि वरचा स्पॉट तुम्ही सहजपणे पाहू शकता. हा स्पॉट जवळपास 9 ते 18 महिन्यांच्या काळात अर्थात नवजात बाळाला तेवढे महिने झाल्यास बंद होतो. हे दोन्ही स्पॉट बंद झाल्यावर बाळच्या डोक्याचा विकास पूर्ण झाल्याचे समजावे. कधी बाळांना त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार हे स्पॉट बंद होण्यास वेळही लागू शकतो.

(वाचा :- बाळाला बिस्किट खाऊ घालण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम!)

डोके गोलाकार करण्याचे उपाय

बाळाला जास्त काळ एकाच पोझिशन मध्ये झोपायला देऊ नये. जर बाळ एकाच स्थितीमध्ये जास्त वेळ झोपत असले तर त्याच्या दुसऱ्या बाजूस एखादे खेळणे ठेवावे जेणेकरून त्याचे लक्ष तिकडे आकर्षित होऊन तो आपली स्थिती बदलेल. बाळाला जास्त वेळ सपाट पृष्ठभागावर झोपवू नये. दिवसा जेव्हा बाळ झोपते तेव्हा त्याची कूस सारखी बदलता राहावी. यामुळे डोक्याचा आकार गोलाकारच राहतो व त्यात बिघाड होत नाही. बाळच्या मानेचे स्नायू मजबूत होत असतात त्यामुळे त्याला काही काळ पोटावर झोपवावे. यासाठी रोज बाळाला किमान 30 मिनिटे तरी पोटावर झोपवावे. बाळाच्या डोक्याचा आकार नीट ठेवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी स्त्री कडून त्याच्या संपूर्ण शरीराची आणि डोक्याची मालिश करून घेणे.

(वाचा :- या ५ लसी नवजात बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी असतात अत्यंत आवश्यक!)

मालिश करताना काय काळजी घ्यावी?

बाळाच्या डोक्याची मालिश करताना त्याच्या डोक्यावर जास्त दबाव देऊ नये. बाळाचे पूर्ण शरीर हे अजूनही सक्षम नसते आणि खूप लवचिक असते. यामुळे त्याला वेदना तर होतातच पण त्याच्या आकारात अजून फरक पडू शकतो. शक्य तितक्या हलक्या हाताने त्याला त्रास होणार नाही इतका जोर लावूनच मालिश करावी. या काही गोष्टी माहित असल्यास अनुभवी स्त्रीचा शोध घ्यावा. पण त्या आधी तिची माहिती सुद्धा काढून घ्यावी आणि सुरक्षित हातातच मालिश साठी बाळाला सोपवावे. घरातीलच कोणी स्त्री असेल तर अधिक उत्तम!

(वाचा :- सोहा अली खान आपल्या लाडक्या लेकीसोबत अशी लुटते आहे गणेशोत्सवाचा आनंद!)

बाळाला हेल्मेटची गरज कधी पडते?

जर बाळाच्या डोक्याचा आकार गोलाकार नसेल आणि वर सांगितलेले उपाय करून सुद्धा आकार योग्य होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुम्हाला त्यावर त्यांच्या पद्धतीने योग्य उपाय सांगू शकतात. बाळाच्या डोक्याचा आकार नीट करण्यासाठी तुम्ही हेल्मेटचा वापर करू शकता. सहा किंवा आठ महिन्यापेक्षा जास्त वयाच्या बाळासाठी हा उपाय वापरला जातो. मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा उपाय करणे गरजेचे आहे.

(वाचा :- पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर घाबरलेल्या मुलीला याविषयी अशी द्या योग्य माहिती!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *