नववधूने फॉलो केला दीपिका पादुकोणचा वेडिंग लुक, सोशल मीडियावर होतंय कौतुक

Spread the love

​दीपिकासारखा लेहंगा आणि ड्रेपिंग स्टाइल

‘ब्राइड्स ऑफ सब्यसाची’ या इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार,फोटोमध्ये दिसणाऱ्या या नववधूचं नाव सिमरत बोपाराए असे आहे. या नववधूनं आपल्या आयुष्याच्या खास क्षणासाठी दीपिका पादुकोणच्या लेहंग्याशी (Bridal Lehenga Collection) मिळत्याजुळत्या डिझाइनची निवड केली. या लेहंग्यावरील वर्कपासून फॉल आणि डिझाइन सुद्धा हुबेहुब दीपिकाच्या लेहंग्याप्रमाणे ठेवण्यात आलं होतं. डोके आणि खांद्यावर ओढणी घेण्याचीही स्टाइल सुद्धा दीपिका पादुकोणप्रमाणेच होती.

(दीपिका पादुकोणच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी दिसतील ‘या’ फॅशन ब्रँडचे सुंदर आउटफिट्स)

​दागदागिन्यांची स्टाइल होती वेगळी

नववधू सिमरतने आपल्या लग्नसोहळ्यासाठी वेगळ्या स्वरुपातील दागिन्यांची निवड केली होती. दीपिका पादुकोणनं स्वतःच्या लग्नामध्ये प्रचंड वजनदार चोकर नेकलेस घातला होता, तर नववधूने कमी वजनाचे नेकलेस निवडलं होतं.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

तिने आपल्या काही दागिन्यांची निवड प्रियंका चोप्राच्या वेडिंग लुक प्रमाणे केल्याचे आपण पाहू शकता. सिमरतने ब्रायडल लेहंग्यावर मल्टी लेअर नेकलेस घातले होते.

(दीपिका पादुकोणच्या ‘या’ स्टायलिश लुकवर लोकांनी व्यक्त केली होती नाराजी, म्हणाले…)

​आणखी एका तरुणीनं केलेली होती याच लुकची निवड

दीपिका पादुकोणचा ब्रायडल लुक तरुणींमध्ये जबरदस्त हिट आहे. सिमरतच नव्हे तर यापूर्वीही कित्येक तरुणींना हा लुक फॉलो करताना पाहिलं गेलं आहे. यातील काही जणींनी आपल्या आवडीनुसार ब्लाउज आणि लेहंग्याच्या डिझाइनमध्ये काही बदल देखील घडवून आणले.

(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)

तसंच त्यांच्या दागिन्यांचे आणि मेकअपचे सिलेक्शन देखील निराळं होते. दरम्यान प्रत्येकीमध्ये एका गोष्टीचं साम्य होते, ते म्हणजे या नववधूंच्या लुकमध्ये सौंदर्य आणि मोहकतेचं परफेक्ट मिश्रण पाहायला मिळालं.

(दीपिका पादुकोणच्या स्टाइलवर भारी पडली २ मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीची ‘ही’ फॅशन)

​दीपिका पादुकोणचा ब्रायडल लेहंगा होता प्रचंड महाग

दीपिका पादुकोणचा परफेक्ट ब्रायडल लेहंगा प्रचंड महागडा होता. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्रीने हे डिझाइनर आउटफिट तयार करण्यासाठी जवळपास १२ लाख रुपये खर्च केले होते.

(प्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दीपिकाने करीनाची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)

या माहितीवरूनच दीपिका पादुकोणचे दागिने किती महाग असतील, याचाही आपण अंदाज बांधू शकता. लेहंगा आणि दागिन्यांची किंमत कितीही असो, पण दीपिकाचा ब्रायडल लुक मात्र मोठ्या प्रमाणात हिट झाला आहे, यात काहीच शंका नाही.

(‘जोधा अकबर’मधील एकही दागिना नव्हता खोटा, ऐश्वर्या रायसाठी घडवले होते २०० किलो सोन्याचे दागिने)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *