नवव्या महिन्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, योग्य वेळी उघडेल गर्भाशयाचे तोंड!

Spread the love

संतुलित आहार

गरोदरपणाच्या वेळीच नाही तर गरोदर होण्याच्या आधी काही दिवसांपासूनच स्त्रीने आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हेव. जर शरीर निरोगी आणि सक्षम असेल आणि शरीरात गरोदरपणा आणि बाळासाठी योग्य हार्मोन्स तयार झाले तर स्त्रीची डिलिव्हरी नॉर्मल होते. पण काही स्त्रिया अशा असतात ज्यांना धुम्रपान व मद्यपानाचे व्यसन असते, पण त्या स्त्रियांनी वेळीच ओळखून हि व्यसने सोडायला हवीत कारण हि व्यसने बाळासाठी हानिकारक ठरतात,. नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूर्ण नऊ महिने संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. या आहारात प्रोटीन व व्हिटॅमिनने भरपूर पदार्थांचा समावेश करावा. जंक फूड व तेलकट पदार्थांपासून दूर राहावे.

(वाचा :- जाणून घ्या प्रेग्नेंसीत योनीमध्ये होणा-या वेदनांमागील कारणे व घरगुती उपाय!)

ओव्याचे लाडू

सकाळी रोज उपाशी पोटी एक ग्लास गरम दुधासोबत एक ओव्याचा लाडू खावा. ओवा हा गरम असतो आणि याचे लाडू गरम दुधासह खाल्ल्याने बाळ लवकर योनीच्या दिशेने सरकते आणि हीच स्थिती नॉर्मल डिलिव्हरीसाठी आदर्श मानली जाते. नवव्या महिन्यात गरम पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. गरम गोष्टी खाल्ल्याने गर्भाशय आणि पेल्विक अंगाचे स्नायू अधिक मजबूत राहतात आणि नॉर्मल डिलिव्हरी वेळी कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर प्या हर्बल होममेड ड्रिंक्स, कमजोरी दूर होण्यासोबतच ब्रेस्ट मिल्क वाढेल!)

तिळाचे लाडू

ओव्याप्रमाणे तिळाचे लाडू सुद्धा नॉर्मल डिलिव्हरीसाठी चांगले समजले जातात. कारण तिळाचे लाडू सुद्धा गरम असतात. यामुळे बाळ योनीच्या दिशेने सरकण्यास मदत होते आणि हि स्थिती नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूरक मानली जाते. अनेक स्त्रिया असतात ज्यांना ओव्याचे लाडू खाण्यास आवडत नसतात अशा स्त्रियांनी तिळांच्या लाडूचा पर्याय स्वीकारावा. हे लाडू घरगुती पद्धतीने बनवलेले असल्यास उत्तम, तुम्ही बाहेरून दुकानातून सुद्धा खरेदी करू शकता. पण कोरोना संकटाच्या या काळात सुरक्षिततेसाठी घरातच योग्य सुरक्षा बाळगून लाडू बनवावेत.

(वाचा :- प्रेग्नेंट महिलांसाठी अमृत आहेत आयर्नने परिपूर्ण असलेले ‘हे’ पदार्थ!)

कोमट पाणी

उकळवून मग थोडे थंड केलेलं पाणी अर्थात कोमट पाणी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये सहाय्य करू शकते. नवव्या महिन्यात कोमट पाणी प्यायल्याने स्नायूंवरचा तणाव कमी होतो. जर तुम्ही कोमट पाणी पीत नसाल तर थंड पाणी अजिबातच पिऊ नका. थंड पाण्याने स्नायू आकुंचन पावतात आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी हा बदल अजिबात योग्य नाही. स्नायू हे प्रसरण पावले पाहिजेत जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी मध्ये सहाय्य होईल आणि हे स्नायू कोमट पाणी प्याल्याने मोकळे राहू शकतात. स्नायू जर आकुंचन पावले असतील आणि त्यात नॉर्मल डिलिव्हरी करायची झाली तर वेदना भयंकर होतात आणि प्रसूती कळाही लवकर सुरु होतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर का येते महिलांना डिप्रेशन? जाणून घ्या रामबाण घरगुती उपाय!)

खजूर

अनेकांना खजुराचा हा उपयोग माहित नाही, पण हो खजूर सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये सहाय्य करू शकतं. नववा महिना सुरु होण्या आधी रोज 3-4 खजूर गरोदर स्त्रीने खायला हवेत. यामुळे योनी आणि आसपासच्या अंगात बदल होऊन नॉर्मल डिलिव्हरी साठी पोषक अशी स्थिती निर्माण होते. शिवाय खजूर गरम असल्याने बाळ देखील हळूहळू योनीच्या दिशेने सरकू लागते. त्यामुळे जाणकार सुद्धा नवावा महिना सुरु होण्याआधी गरोदर स्त्रीला आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात.

(वाचा :- बॉलीवूड अभिनेत्रींच्या ‘या’ खास टिप्स वापरून प्रेग्नेंसीमध्ये करा योगाभ्यास!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *