नाचणीचा पौष्टिक डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Spread the love

How to make: नाचणीचा पौष्टिक डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: बाउलमध्ये नाचणीचे पीठ व पाणी एकत्र घ्या

एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ घ्या. पिठात पाणी घाला आणि नीट मिक्स करा. पिठामध्ये गाठी तयार होऊ नये, यासाठी सामग्री ढवळत राहा. डोशाचं बॅटर पातळ राहील, याची काळजी घ्यावी.

Step 2: डोशाचे पीठ तयार करून घ्या

आता पिठामध्ये बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालावे. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करून घ्या.

डोशाचे बॅटर

Step 3: डोसे तयार करून घ्या

गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर डोशाचे मिश्रण चमच्याच्या मदतीने पसरवा. डोसा पातळ करावा.

डोशाचे मिश्रण

Step 4: नाचणीचा पौष्टिक डोसा

डोशावर तेल किंवा तूप सोडा. दोन्ही बाजूंनी तीन ते चार मिनिटांसाठी डोसा शिजवून घ्या. तयार झाला आहे नाचणीचा डोसा.

नाचणीचा डोसा

Step 5: पाहा संपूर्ण पाककृती

आवडत्या चटणीसोबत डोशाचा आस्वाद घ्यावा.

नाचणीच्या पिठाचे झटपट डोसे


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *