नाश्त्यात केलं ‘या’ ७ पदार्थांपैकी एका जरी पदार्थाचं सेवन तर लठ्ठपणा होईल आपोआप कमी!

Spread the love

नाश्ता (healthy breakfast options) म्हणजेच आपल्या दिवसातील पहिलं मील. या मील मध्ये तुम्ही जितके जास्त पौष्टिक आणि लाईट पदार्थ खाल तितकी जास्त एनर्जी (energy) शरीराला मिळू शकते. काही लोक कॅलरी (calories) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वेळ मिळत नाही, ही कारणं देऊन नाश्ता करणं टाळतात. खरं तर उत्तम आरोग्य हवं असेल आणि वजन आटोक्यात ठेवायचं असेल, तर सकाळच्या हेल्दी नाश्त्याला पर्याय नाही.

सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्यानं आपलं चयापचय किंवा मेटाबोलिझम (metabolism) चांगलं राहातं. यामुळे शरीर उत्साही राहातं. सकाळी काही खाल्लं नाही, तर मेंदूला चुकीची सूचना मिळते आणि शरीर कॅलरी राखून ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे चयापचय दिवसभरासाठी मंदावतं. त्यामुळे पोट साफ राहावं, ताजंतवाणं वाटावं, एनर्जी चांगली राहावी, वजन कमी व्हावं असं वाटत असेल तर आम्ही खाली दिलेल्या नाश्त्याच्या ७ पदार्थांपैकी एक पदार्थ दररोज तुम्ही खाऊ शकता.

रव्याचा उपमा

पचनाच्या हिशोबाने रवा खूपच हलका आणि आरोग्यवर्धक असतो. त्यामुळे दुधयुक्त रव्याचं दलिया किंवा तिखट उपम्याचं आपण नाश्त्यात सेवन केलं पाहिजे. रव्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे सारखं सारखं काही खाण्याची इच्छा होत नाही. म्हणजेच आपण अतिरिक्त कॅलरीज घेण्यापासून वाचतो. अशाप्रकारे रवा आपल्या पोषक तत्वांनी व फॅट फ्री गुणधर्मांमुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

(वाचा :- पपई डाएट प्लॅनमुळे लठ्ठपणा होतो कमी! कशी करावी ‘या’ डाएट प्लॅनची अंमलबजावणी?)

शिजवलेले किंवा भाजलेले चणे

हिवाळ्यामध्ये उकळवून मीठ-मसाल्यात भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला प्रोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यासारख्या पोषक तत्वांची प्राप्ती होते.लाल किंवा काबुली चण्यांचा नाश्त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चणे भिजत घाला. ७ ते ८ तासांत चणे चांगले फुगतात. पुढे, कुकरमध्ये शिट्ट्या देऊन चणे शिजवून घ्या. आता पाणी गाळून चण्यांना धणे पावडर, जिरे, कांदा, लसूण, टोमॅटो व कोथिंबीर घालून तडका द्या.

(वाचा :- लसणात असतात हे खास गुणधर्म, रिकाम्या पोटी सेवन केल्यास होतो ‘या’ गंभीर आजारांपासून बचाव!)

रताळ

रताळ (sweet potato) हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. रताळ शिजवून दुधात साखर घालून किंवा मीठ-मसाला लावून खाल्लं जातं. रताळ्याच्या नाश्ता किंवा सॅलेडचा तुम्ही लिंबू किंवा चाट मसाल्यासोबत आस्वाद घेऊ शकता. रताळ्यातील फायबर बराच काळ आपलं पोटं भरलेलं ठेवतील. तसंच याची चव जिभेवर रेंगाळत राहिल.

(वाचा :- चटपटीत व चविष्ट असण्यासोबतच आरोग्यास अगणित लाभ देते ‘ही’ पालेभाजी! नक्की खाऊन बघा)

गोड-तिखट दलिया

दलिया वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. तुम्ही त्यात दूध-साखर टाकून गोड दलियाच्या रुपात किंवा मग खिचडीसारखं मसाल्यांचा तडका देऊन नमकिन फ्लेवरमध्ये बनवून खाऊ शकता. दलिया एक लो फॅट आणि फायबरयुक्त फुड आहे. दलिया सुपाच्य असण्यासोबतच अॅंटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असतं. त्यामुळे दलिया पचनक्रिया सुरुळीत ठेवण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवतं.

(वाचा :- Jaggery Benefits In Winter : थंडीच्या दिवसांत गुळ खाल्ल्याने ‘हे’ आजार होतात दूर!)

केळ

बहुतांश लोकांना वाटतं केळ वजन वाढवण्यासाठी खाल्लं जातं पण हे अपूर्ण सत्य आहे. फक्त केळाचे सेवन वजन नियंत्रित करतं. पण केळ खाल्ल्यानंतर २५ ते ३० मिनिटांनी जर तुम्ही दुधाचे किंवा पाण्याचे सेवन केले तर यामुळे वजन वाढू शकते. पण तेच जर नाश्त्यामध्ये तुम्ही फ्रुट चाट, चपाती किंवा पराठ्यासोबत पिकलेलं केळ खाल्लं तर ते तुम्हाला अधिक उर्जा प्रदान करेल.

(वाचा :- थंडीच्या महिन्यात वाटाणे खाताय? मग जाणून घ्या ‘ही’ माहिती!)

दोन अंडी

अंड हे प्रोटिनचा मुख्य स्त्रोत असते. जर तुम्ही नाश्त्यामध्ये उकळलेलं अंड किंवा दोन अंड्यांचं ऑमलेट बनवून खाल्लं तर दिवसभरच्या कामात लागणारी उर्जा शरीराला आपोआप मिळू शकते. अंड देखील आपलं पोट बराच काळ भरलेलं ठेवतं शिवाय आपली क्रेविंग नियंत्रित करतं. यामुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच शरीरात अतिरिक्त कॅलरीज जाण्यापासून बचाव करु शकता.

(वाचा :- Air Pollution Safety Tips: डॉक्टरांच्या टिप्सचं पालन केल्यास आरोग्यावर होणार नाही प्रदूषणाचे दुष्परिणाम!)

शिंगाडा व दही

नाश्त्यात शिंगाड्याची (water nut) कचोरी, सॅलेड, हलवा किंवा मग उकळलेले शिंगाडे खाऊ शकता. शिंगाडा हा एक असा पदार्थ आहे जो हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही. साधारणत: हिवाळ्यात आपण इतर दिवसांपेक्षा कमी प्रमाणात पाणी पितो. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, पचनात गडबड व अधिक भूक लागण्याची समस्या निर्माण होते. शिंगाड्याच्या सेवनाने या समस्या दूर होतात व वजनही कमी होते. तसंच नाश्त्यात तुम्ही चपाती, पुरी, पराठा, चणे, दलिया यासोबत दह्याचे सेवन करु शकता. दह्यामुळे पचनक्रिया सुरुळीत होते. तसेच दह्यातील चांगले बॅक्टेरिया शरीरातील अनावश्यक चरबी जाळून टाकतात.

(वाचा :- Ayurvedic Tips For Fitness : खुद्द एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या गंभीरातील गंभीर आजारांना दूर ठेवण्याचे आयुर्वेदिक नियम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *