नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक

Spread the love

​फ्राइड चिकन

नाश्त्यामध्ये चिकन खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू नये यासाठी नाश्त्यामध्ये कधीही तेलकट, तिखट चिकन खाऊ नये. चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. पण या सर्व गोष्टी चिकन तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काही जण चिकन रेसिपी करताना यामध्ये जास्त प्रमाणात फॅट्सयुक्त सामग्री किंवा मिठाचा वापर करतात.

(अपचनामुळे त्रस्त आहात? समस्या दूर करण्यासाठी वाचा ही फायद्याची माहिती)

नाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ नको

उदाहरणार्थ काही जण फ्राइड चिकन आवडीने खातात. या रेसिपीमध्ये तेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचाही जास्त प्रमाणात वापर केला जातो. या रेसिपीमध्ये मीठ आणि चरबीयुक्त सामग्रीचा जास्त प्रमाणात समावेश असतो. नाश्त्यामध्ये तेलकट आणि खारट पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही. या उलट आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती असते.

(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)

​पिझ्झा

हॉटेलमध्ये मिळणारा पिझ्झा हा पौष्टिक पदार्थ नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये याचा समावेश करणं टाळा. यातही नॉनव्हेज पिझ्झा खाल्ल्यास शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण वाढते. अशा प्रकारच्या पिझ्झामध्ये चीज, बटर इत्यादी चरबीयुक्त पदार्थांचा उपयोग केला जातो. या सर्व सामग्रीमुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. शिवाय आपल्या पचन प्रक्रियेवरही वाईट परिणाम होतो. दिवसभरात तुम्ही अन्य कोणत्याही वेळेमध्ये पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये पिझ्झा खाऊ नये.

(पोटावर झोपण्याची सवय आहे? या ६ समस्या उद्भवण्याची शक्यता)

​बीएमटी

तुम्हाला आरोग्याची काळजी असेल तर नाश्त्यामध्ये या पदार्थाचा समावेश करू नका. ‘बिग मीट थिंग’ तयार करताना जास्त प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. शिवाय यामध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते. हे दोन्ही घटक आरोग्यासाठी अपायकारक आहेत. त्यातही हा पदार्थ खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करत असाल तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे. कारण बीएमटीमुळे शरीराला पोषण तत्त्वाचा पुरवठा देखील होत नाही.

(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)

​चॉकलेट ड्रिंक

तुमच्या नाश्त्यामध्ये बाहेरील पदार्थांचाच समावेश असतो का? आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. सकाळी- सकाळी चॉकलेट ड्रिंक पिण्याऐवजी तुम्ही साधी कॉफी किंवा एखादे हेल्दी ड्रिंक प्यावे. कारण चॉकलेट ड्रिंकमध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण अधिक असते. तसंच या ड्रिंकमुळे तुम्हाला वारंवार भूक लागते. या समस्येमुळे तुमचे खाण्याचे प्रमाण वाढते. परिणामी वजन वाढीसह अन्य त्रास निर्माण होण्याची शक्यता असते.

(Fox Nuts Benefits वजन घटवण्यापासून ते त्वचा निरोगी राहण्यापर्यंत मखाण्यांमुळे मिळतील हे लाभ)

​चीज बर्गर

चीज बर्गर नाव घेताच तोंडाला पाणी सुटले असेल. आहारामध्ये बदल म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरच तुम्ही दोन- तीन महिन्यातून एकदा बर्ग खाऊ शकता. पण नाश्त्यामध्ये बर्गर खाणे टाळले पाहिजे. यामुळे तुमच्या आरोग्याला पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. उलट शरीरामध्ये फॅट्स आणि साखर जास्त प्रमाणात जाते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

Note : आपल्या आहारामध्ये कसे आणि कोणत्या प्रकारे बदल करावे, यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *