नियमित या वेळेस हळदीचं पाणी प्या, मिळतील भरपूर आरोग्यदायी लाभ

Spread the love

​गरम पाणी आणि हळदीचे फायदे

हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिड चे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. हळदीमुळे एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.

(मासिक पाळीतील रक्तस्त्रावावरून तुमच्या प्रकृतीबद्दल काय कळतं?)

​वजन कमी होते

हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हळदीचे पाणी प्या. वजन घटण्यास नक्कीच मदत होईल. वजन वाढीमुळे हृदय रोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

(मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी पेन किलर खाण्यापेक्षा करा ‘ही’ ५ योगासने)

​चिंता आणि तणावाचा त्रास होतो कमी

चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटी चे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच यातील अँटी-ऑक्सिडेंट चे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

मासिक पाळी

काही महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटी पोट, पाठ आणि पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.

(जेवणानंतर ‘हे’ एकमेव आसन तुम्ही करू शकता, पोट होईल हलके)

​कधी प्यायचे हळदीचे पाणी?

जर तुम्हाला भरपूर प्रमाणात आरोग्यदायी लाभ हवे असतील तर रोज सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन करा. सकाळच्या सुमारास या पाण्याचे सेवन करणं लाभदायक ठरते.

कसे तयार करायचे हळदीचे पाणी?

एक ग्लास गरम पाणी घ्या आणि एका पॅनमध्ये ते उकळत ठेवा. या पाण्यामध्ये आता एक छोटा चमचा हळद पावडर टाका आणि चांगल्या प्रकारे पाणी ढवळत राहा. तुम्हाला हवे असल्यास यामध्ये मधाचा समावेश करू शकता. नियमित सकाळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता.

(Food and Mood : तुम्ही खात असलेल्या पदार्थांमुळेही मूडवर होतो परिणाम)

​या गोष्टी ठेवा लक्षात

हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असेल तरीही हा उपाय करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पित्त किंवा मूतखड्याचा त्रास असल्यास हा उपाय करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कर्क्युमिनमुळे रक्तातील शर्करा अतिशय कमी होते. हळदीमुळे शरीरातील लोह देखील शोषून घेतले जाते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असेल तर हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे.

(Weight Loss at Night : रात्री झोपण्यापूर्वी प्या हे ड्रिंक, पोटावरील चरबी होईल कमी)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *