नीता अंबानींची सून श्लोका मेहताचे ‘या’ दागिन्यांवर आहे अत्यंत प्रेम, पाहा फोटो

Spread the love

लग्नाचा खास क्षण

लग्न हा आयुष्यातील खास क्षण असतो. या दिवसाच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी कित्येक महिन्यांपासून प्रत्येकाची तयारी सुरू असते. नववधूसाठी पोषाखासह दागिने देखील खास असतात. प्रत्येक तरुणीला स्वतःच्या लग्नामध्ये एखाद्या राजकुमारीसारखे दिसण्याची इच्छा असते. यासाठी ती महागडे – सुंदर दागिने आणि लेहंगा खरेदी करते. सर्वसामान्य महिलेसाठी तर तिच्या लग्नातील दागदागिने अत्यंत खास असतात. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यासाठी ती आपल्या लग्नाचे दागिने घालून मिरवते. आपल्या देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी घराण्याची सून श्लोका मेहतालाही तिच्या लग्नातील दागिने अतिशय प्रिय आहेत.

( डेनिम है ना! नव्या आणि ट्रेंडिंग फॅशनची माहिती)

​श्लोका मेहताचे खास दागिने

नीता अंबानी (Nita Ambani) यांची सून श्लोका मेहतानेही (Shloka Mehta) तिच्या लग्नासाठी अतिशय सुंदर दागिने घातले होते. तिच्यासाठी सोन्याऐवजी कुंदन-मोती आणि हिऱ्यांपासून दागिने तयार करण्यात आले होते. आपला लुक सुंदर आणि आकर्षक दिसावा यासाठी श्लोकाने लाल व सोनेरी रंगाच्या लेहंग्यासोबत एमरॅल्ड (पन्ना) – अनकट डायमंडपासून तयार करण्यात आलेला राणी हार, पोल्की चोकर परिधान केला होता. यासह तिनं नाकामध्ये सोन्याची नथ, मांग टिका आणि मॅचिंग कानातले देखील घातले होते.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)

​ब्रायडल ज्वेलरी

श्लोकाच्या लेहंग्यासोबत तिचे दागिने देखील डिझाइनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केले होते. आजही वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी श्लोका आपल्या लग्नातील दागिने परिधान करते.

(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)

अरमान जैन आणि अनीशा मल्होत्राच्या लग्नामध्ये श्लोका मेहतानेही हजेरी लावली होती. यावेळेस तिने सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला jewel-toned लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर तिनं आपल्या लग्नातील दागदागिने घातले होते.

​वजनदार दागिने

लग्नातील वजनदार दागिने एखाद्या सोहळ्यासाठी घालून मिरवणे कठीण असते, असे म्हणतात. परंतु अंबानी कुटुंबातील महिलांनी ही बाब पूर्णपणे चुकीची असल्याचे सिद्ध केले. अरमान जैन आणि अनीशा मल्होत्राच्या लग्नामध्ये श्लोका मेहतानं आपल्या लग्नाच्या दागिन्यांमधील चोकर परिधान केलं होतं. श्लोकानं आपला लुक पूर्णपणे साधा ठेवला होता. कमीत कमी मेकअपमध्ये ती सुंदर आणि मोहक दिसत होती. तर या लेहंग्यावर तिनं मोत्यांचे कानातले, मांग टिका आणि बांगड्या असे दागिने तिनं घातले होते.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

​श्लोकाचा मोहक लुक

या लग्नसोहळ्यासाठी श्लोकानं हिरव्या रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता. नेहमी प्रमाणे तिच्या आउटफिट आणि दागिन्यांची भरपूर चर्चा झाली होती. दरम्यान दागिने, पोषाख आणि मेकअप हे महिलांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. या गोष्टींवरील महिलावर्गाचे प्रेम कधीही कमी होणार नाही. श्लोकालाही सामान्य मुलींप्रमाणेच लग्नाचे दागिने अतिशय प्रिय आहेत.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

एवढंच नव्हे तर हे दागिने ती पुन्हा- पुन्हा देखील परिधान करते.

(अंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *