नॉर्मल डिलिव्हरीनंतर किती दिवस आराम करणं आवश्यक असतं?

Spread the love

कधी पर्यंत करावा आराम

जर स्त्रीची डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल तर तिने कमीत कमी चार आठवडे तरी आराम करायलाच हवा. याचा अर्थ हा नाही की पूर्णवेळ बेड रेस्ट वा बिछान्यावरच झोपून राहावे. या काळात हळूहळू छोटे मोठे काम करण्यास सुरुवात करावी. जास्त श्रमाचे काम या काळात करू नये. डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो पहिला आठवडा असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. या आठवड्यामध्ये पूर्ण आराम करावा आणि शक्य तितके कमी काम करावे. दुसऱ्या आठवड्यापासून बाळाची काळजी घेणे, त्याची कामे करणे यांपासून सुरुवात करावी. जर तिसऱ्या आठवड्यापासून स्त्रीला अगदी छान वाटत असले आणि तिला आपल्या शरीरात उर्जा जाणवत असेल तर ती हळूहळू आपली कामे सुरु करू शकते.

(वाचा :- प्रेग्नंसीमध्ये आल्याचं सेवन केल्यास प्रगर्भपात होतो? जाणून घ्या सत्य व असत्य!)

40 दिवसांचा वेळ

40-

असे म्हणतात की नऊ महिन्यांचा गरोदरपणा आणि डिलिव्हरी झाल्यावर स्त्रीला किमान 40 दिवसांचा आराम द्यायलाच हवा. जाणकारांच्या मते स्त्रीचे शरीर रिकव्हर व्हायला वेळ जातो. तिच्या शरीरातील जखमा भरून निघण्यास सुद्धा मोठा काळ लागतो. त्यामुळे किमान 40 दिवस तरी तिला शक्य तितका आराम द्यावा, जेणेकरून या काळात तिचे शरीर पूर्वपदावर येऊ लागेल. लवकरात लवकर बरे होण्यासाठी स्त्रीने जास्तीत जास्त भर हा पौष्टिक आहारावर द्यावा. ती जेवढा पौष्टिक आहार घेईल तेवढी ती सुदृढ होईल आणि लवकर आपले सामान्य आयुष्य जगू शकेल.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या चौथ्या महिन्यात बाळाचा किती विकास होतो व या काळात काय काळजी घ्यावी?)

रिकव्हरीसाठी लागणारा जास्तीत जास्त वेळ

काही स्त्रिया अशा असतात की ज्यांना रिकव्हर व्हायला 40 दिवसांचा काळ सुद्धा लागत नाही. त्या अगदी डिलिव्हरी नंतर काहीच दिवसांत आपली नेहमीची कामे करायला सुरुवात करतात. खास करून ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. अर्थात स्त्रीचे शरीर किती मजबूत आहे आणि किती लवकर ते तिला पुन्हा उर्जा प्रदान करून देऊ शकते आणि मुख्य म्हणजे या काळात स्त्री नेमका किती पौष्टिक आहार घेते यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. ज्या स्त्रीची सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल तिला मात्र रिकव्हर व्हायला 40 दिवसांचा वेळ हवाच.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर मजबूत शरीर व सुदृढ आरोग्य हवे असल्यास करा ‘या’ पदार्थांचे सेवन!)

डिलिव्हरी नंतर होणाऱ्या समस्या

अनेकांना वाटते की डिलिव्हरी झाली अर्थात स्त्रीचा त्रास संपला. पण असे नाही आहे. डिलिव्हरी नंतर सुद्धा स्त्रीला अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. सर्वात जास्त त्रास हा योनी जवळ होतो. प्रसूती वेळी बाळाला बाहेर काढण्यासाठी योनीजवळ छोटा कट जरी केला असेल तर डिलिव्हरी नंतर खूप त्रास होऊ शकतो आणि हा त्रास सहन करण्याच्या पलीकडला असतो. डिलिव्हरी नंतर बद्धकोष्ठतेची समस्या प्रत्येक स्त्रीला सतावतेच. प्रसूती वेळी वेदना शमवण्यासाठी औषधांचा डोस दिल्याने हि समस्या उद्भवते.

(वाचा :- सावधान! गर्भधारणेमध्ये अडथळा येण्यास असू शकतो ‘हा’ आजार कारणीभूत)

मुत्र विसर्जन करण्यास समस्या

डिलिव्हरीनंतर स्त्रीला मुत्र विसर्जन करण्यात सर्वाधिक समस्या येते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मूत्राशय स्ट्रेच होते आणि काही वेळासाठी नसांना आणि स्नायूंना नुकसान पोहचू शकते. यामुळे मुत्र विसर्जन करताना स्त्रीला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय डिलिव्हरीनंतर पहिल्या तीन ते चार दिवसांत ब्रेस्टमध्ये अर्थात स्तनांमध्ये कोलोस्‍ट्रम तयार होते. हे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप गरजेचे असते. स्तनांमध्ये दुध भरत असल्याने सूज येऊ शकते आणि वेदना सुद्धा होऊ शकतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *