पती-पत्नीचे हे गुण एकमेकांसाठी असतात चांगली शिकवण!

Spread the love

गैरसमजाला जागा नाही

एक गैरसमज कित्येक वर्षापासून आनंदी व घट्ट असलेलं नातं तोडण्यास पुरेसा असतो. जर तुम्ही गैरसमजाला दुर्लक्षित केलं तर समस्या कधीच सुटू शकत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम हे जाणून घ्या की, गैरसमजाचं कारण नक्की काय आहे? ते कारण समजल्यावर आपल्या जोडीदारासोबत त्यावर मनमोकळेपणाने संवाद साधा. यामुळे फक्त नातंच चिरतरुण राहणार नाही तर दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत कळेल. त्यामुळे नातं कोणतंही असो, गैरसमज या गोष्टीपासून चार हात दूरच राहा.

(वाचा :- ईशा देओल म्हणते, लग्नानंतरही ‘या’ ३ गोष्टींचा करु नये मुलींनी त्याग!)

विश्वास ठेवा

एका मजबूत नात्याचा पाया हा विश्वास असतो. त्यामुळे जर तुमच्या नात्यातील विश्वासाचा महत्त्वाचा पायाच डळमळीत असेल तर मात्र तुम्ही एका कमजोर नात्यात आहात. तुम्ही आपल्या जोडीदारावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तो तुम्हाला कधीच धोका देण्याचा विचार देखील करणार नाही. जर तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर येणारी प्रत्येक समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. त्यामुळे जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचाही प्रयत्न करा व त्याच्यावरही विश्वास ठेवा.

(वाचा :- नात्यातील ‘या’ ५ गोष्टी डोकेदुखीपेक्षा कमी नाहीत!)

एकमेकांना प्रोत्साहित करणं

एका चांगल्या व निरोगी नात्यात पती-पत्नी एकमेकांना पुढे जाण्यासाठी व स्वत:त सकारात्मक बदल करण्यासाठी प्रोत्साहन देतात. जर तुम्हाला नोकरी सोडून नवीन काही शिक्षण घ्यायचं असेल तर जोडीदाराने प्रोत्साहित केलं पाहिजे. असं यासाठी कारण तुम्ही नात्यासोबतच काही नवीन ट्राय करु इच्छित असाल किंवा जुन्या एखाद्या गोष्टीवर पुन्हा काम करायचं असेल तर सर्वात जास्त तुम्हाला जोडीदाराची गरज असते. एकमेकांना दिलेलं प्रोत्साहन कोणा एकाचं नाही तर नात्याचं यश सोबत घेऊन येतं.

(वाचा :- रुबीना दिलैक घेणार होती नव-याकडून घटस्फोट, टोकाला गेलेल्या वादातून नातं कसं वाचवावं?)

एकमेकांना सहकार्य करणं

जर तुम्हालाही एक आदर्श व स्ट्रॉंग नातं जगायचं असेल तर गंभीर नातं बनवण्याआधी नात्यातील कमजोरींकडे लक्ष द्या व त्या जाणून घ्या. जेव्हा तुम्ही आपल्या पसंत-नापंसत याविषयी मनमोकळेपणे जोडीदाराशी संवाद साधाल तेव्हा तो तुमच्या छोट्या-मोठ्या आवडी-निवडीवर आवर्जून लक्ष देईल. यामुळे तुम्हाला थोडाही मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार नाही. एकमेकांना सहकार्य केल्याने अनेक समस्या येण्याआधीच सुटतील व तुम्ही एक आनंदी नातं जगू शकाल. व जोडीदाराला दुस-या कोणा परक्या व्यक्तीची मदत घेण्याची वेळ येणार नाही.

(वाचा :- आनंदी नात्याचे ५ खास पैलू!)

एकत्र वेळ घालवा

एकत्र वेळ घालवणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही कितीही व्यस्त असा पण सुखी आयुष्य हवं असेल तर आपल्या जोडीदारासोबत हक्काचा वेळ नक्की घालवा. आपल्या समाधानी व आनंदी असण्याचा सकारात्मक परिणाम नातं व कुटुंबीयांवर देखील पडतो. असं हसतं-खेळतं व समाधानी आयुष्य जगण्यासाठी एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं जे फक्त एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवल्यास शक्य आहे.

(वाचा :- मैत्रीची ‘न्यू नॉर्मल रुपं’ म्हणजे नेमकं काय? यातील एखादा अनुभव तुम्हीही घेतला आहे का?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *