How to make: पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी Palak Paratha Recipe
सर्व प्रथम पालक स्वच्छ करून पाण्यामध्ये धुऊन घ्या. आता पालकची ताजी पाने मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
Step 2: पराठ्याचे पीठ मिळून घ्या
आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ, दोन चमचे ओवा (Carom Seeds), एक चमचा तूप आणि वाटलेली पालकची पेस्ट घालावी. सर्व सामग्री नीट मिक्स करा आणि पीठ मिळून घ्यावे. यामध्ये आता दूध मिक्स करा म्हणजे पीठ मऊ होईल.

Step 3: पराठ्याच्या पिठाचे गोळे तयार करून घ्या
आता मळलेल्या पिठाचे लहान- लहान आकारात गोळे तयार करा.

Step 4: पराठे लाटून घ्या
मळलेल्या पिठाच्या गोळ्याला थोडेस सुके पीठ व तूप लावा आणि पराठे लाटून घ्यावे.

Step 5: लाटलेले पराठे शेकून घ्या
गॅसवर तवा गरम होण्यास ठेवून द्या. तवा गरम झाल्यानंतर त्यावर पराठ शेकून घ्यावा. दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीने पराठा शेका. त्यावर थोडेसे तूप देखील लावा. तूप लावल्याने पराठे नरम राहतील.

Step 6: दह्यासोबत पराठा करा सर्व्ह
तयार झाला आहे आपला पालक पराठा. दही, लोणचे किंवा चटणीसोबत पराठ्याचा आस्वाद घ्या.

Step 7: पालक पराठा रेसिपी : पाहा VIDEO
पौष्टिक पालक पराठ्याची पाककृती

Source link
Recent Comments