पावसाळ्यात जिभेचे चोचलेही पुरवा आणि फिट सुद्धा राहा ‘या’ खास पदार्थांसह!

Spread the love

तुम्ही सुद्धा ही गोष्ट अनेकदा ऐकली असेल की सकाळचा नाश्ता हा भरपेट करावा जेणेकरून दिवसभराची उर्जा शरीराला मिळते आणि शरीर सुदृढ राहते. सामान्यत: आपण नाश्ता हा अतिशय कमी करतो आणि दुपार व रात्रीच्या जेवणावर लक्ष केंद्रित करतो, जेवण जितकं पोटात जाईल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे असा आपला गैरसमज असतो. अनेक जाणकार सुद्धा सतत आवाहन करत असतात की सुदृढ राहायचे असेल आणि रोगमुक्त आयुष्य जगायचे असेल तर ही आहारशैली आपल्याला बदलायला हवी आणि पौष्टिक व भरपेट नाश्ता करण्यावर भर द्यायला हवा.

आज आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देणार आहोत. सध्या पावसाळा सुरु आहे आणि या काळात सकाळचा नाश्ता तुम्ही जितका चांगला कराल त्याचा शरीराला फायदाच होईल. चला तर आज आपण या लेखातून जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचा नाश्ता केल्याने आणि कोणते पदार्थ सकाळच्या वेळेस खाल्ल्याने आपल्याला फायदा होतो.

दुध दलिया

जर तुम्हाला दूध आवडत असेल तर आणि गोड खायला आवडत असेल तर तुम्ही नाश्तामध्ये दुध दलिया बनवून खाऊ शकता. ही दलिया बनवायला 20 ते 25 मिनिटांचाच वेळ लागतो आणि याची पौष्टिकता शरीरासाठी लाभदायक असते. गोड दलिया बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दलियाला देशी तूप, ओलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलामध्ये भाजून घ्यावे लागेल. यानंतर हिरवी वेलची आणि दुध टाकून मध्यम आचेवर ते मिश्रण शिजू द्या. जेव्हा हे योग्य प्रकारे शिजेल तेव्हा यात साखर टाकून दोन मिनिटे झाकून ठेवा आणि मग गरमागरम सर्व्ह करा. दलिया मध्ये फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच हे पचायला सोपे असते आणि शरीराला उर्जा सुद्धा देते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांचे पोट साफ ठेवण्यात दलियाचा उपयोग होतो.

(वाचा :- केसगळती, दातदुखी व हाडांच्या दुखण्याने त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ करतील वेदनेतून सुटका!)

चटपटीत दलिया

जर तुम्ही डायटिंग करत असाल आणि गोड खाण्यास तुम्हाला मनाई करण्यात आली असेल तर तुम्ही नाश्तामध्ये दुधाच्या गोड दलिया व्यतिरिक्त चटपटीत दलियाचा पर्याय निवडू शकता. चटपटीत दलिया बनवण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा सुद्धा वापर करू शकता. ज्या प्रकारे खिचडी शिजवली जाते त्याचं प्रकारे टॉमेटो, कांदा आणि भाजीची फोडणी देऊन दलिया तयार करा. हा पदार्थ तुम्हाला दिवसभर काम करण्याची उर्जा देईल आणि तुमचे पोट देखील जास्त जड होणार नाही. जर तुम्ही नाश्त्यामध्ये चटपटीत दलिया खात असाल तर दूध व दुधापासून तयार झालेला कोणताही दुसरा पदार्थ खाऊ नका. नाहीतर पोटात गडबड होईल.

(वाचा :- दुधाचे आठवडाभर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करा सेवन, दिसतील आश्चर्यकारक फायदे!)

खिचडी

आपल्या देशात खिचडी हा पदार्थ कोणाला माहित नाही असे होणे नाही. आठवड्यातून किमान एकदा तरी प्रत्येक घरात खिचडी व तत्सम पदार्थ बनतोच. खिचडी ही पौष्टिक असतेच पण शिवाय ती काही मिनिटांत तयार होते हे विशेष! नाश्त्यामध्ये तुम्ही मुग डाळ, साबुदाणा, ड्रायफ्रुट्स यांची खिचडी बनवू शकता. मुग डाळ आणि साबुदाणा खिचडी कशी तयार करतात हे तुम्हालाही माहित असेलच. आता आपण जाणून घेऊया ड्रायफ्रुट्स खिचडी हा काय प्रकार आहे. मखाना, काजू, बदाम आणि सुकामेवा यांच्यापासून ड्रायफ्रुट्स खिचडी बनवली जाते. मखाना, काजू, बदाम आणि सुकामेवा हे पदर्थ एक चमचा तुपामध्ये भाजून घ्या मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून त्यावर जीरा आणि मोहरी टाकत सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत भाजून घ्यावे. तुमच्या स्वादानुसार यात तुम्ही मीठ टाकावे. झाली तुमची पौष्टिक ड्रायफ्रुट्स खिचडी तयार!

(वाचा :- उतारवयापर्यंत निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय? मग बहुगुणी कडुलिंबाचा असा वापर करुन बघाच!)

शिळी चपाती आणि दूध

हा सर्वात पौष्टिक नाश्त्याचा प्रकार होय आणि मुख्य म्हणजे सर्वात झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे. चला जाणून घेऊया कशा प्रकारे हा पदार्थ तयार होतो. सर्वप्रथम दूध घ्या. दूध गरम नसेल तरी चालेल. रात्रीची किंवा आदल्या दिवसाची शिळी चपाती घ्या. त्याचे लहान तुकडे करून दुधामध्ये भिजवा. झाला तयार तुमचा नाश्ता! या पदार्थाला थोडी गोड चव पहिल्यापासून असते पण तुम्हाला ती कमी वाटत असले तर तुम्ही त्यात थोडी साखर टाकू शकता. साखर नसले तर मधाचा वापर करा.

(वाचा :- विडाल टेस्ट कोणत्या आजारासाठी व कशी केली जाते?)

ओट्स

ओट्स तर आजच्या पिढीचा प्रमुख नाश्ता झाला आहे आणि आता तर मार्केटमध्ये साधे ओट्स, मसाला ओट्स, टॉमेटो ओट्ससारखे विविध फ्लेवर्सचे ओट्स सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे साहजिकच ग्राहक सुद्धा ओट्सना सध्या पसंती देत आहेत. इतर अनेक नाश्ताच्या पदार्थांपैकी ओट्स देखील एक असा नाश्ता आहे जो झटपट तयार होतो. तुम्ही जे पॅकेट खरेदी करता त्यात आधीपासून सगळी कृती सविस्तर दिली असती. त्यामुळे तुम्हाला कसली अडचण येणार नाही. चला तर यापैकी तुमचा एक नाश्ता निवड आणि रोज भरपेट खाऊन सुदृढ राहा!

(वाचा :- लघुशंकेवेळी होणा-या जळजळ-वेदनांची कारणे आणि रामबाण घरगुती उपचार!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *