प्रेग्नेंट नसतानाही तशी लक्षणे दिसण्यामागे काय कारण असतं व फॉल्स प्रेग्नेंसीची लक्षणे कोणती?

Spread the love

फॉल्स प्रेग्नेंसी म्हणजे काय?

फॉल्स प्रेग्नेंसी ही एक अशी स्थिती असते ज्यात स्त्रीला आपण गरोदर असल्याचा भास होतो. अर्थात ही स्थिती मनोविकाराशी निगडीत नसून तशी लक्षणे स्त्रीला दिसून येत असल्याने तिचा गैरसमज होऊ शकतो. अशावेळी गरोदर नसतानाही स्त्रीला आपण गरोदर असल्याचे सारखे वाटू शकते. ही एक सामान्य स्थिती असून वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीला या स्थितीला सामोरे जावे लागू शकते. हा एखादा आजार सुद्धा नाही. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्त्रीने फॉल्स प्रेग्नन्सीमधून बाहेर येणे उत्तम!

(वाचा :- कोणत्या महिलांना असतो प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका व यावर उपाय काय?)

फॉल्स प्रेग्नेंसीची कारणे

स्त्री गरोदर नसताना सुद्धा तिच्यामध्ये गरोदरपणाची लक्षणे का दिसतात यावर अजून तरी ठोस कारण कळलेले नाही. मात्र या मागे प्रमुख तीन थेअरीज सांगितल्या जातात. काही मानसिक हेल्थ प्रोफेशनल्सचे म्हणणे आहे की याचा संबंध गरोदर न राहण्याच्या भीतीशी निगडीत आहे. असे होऊ शकते की याचा परिणाम स्त्रीच्या एंडोक्राइन सिस्‍टम वर पडत असेल आणि ज्यामुळे गरोदरपणाची लक्षणे दिसून येत असतील. दुसरी थेअरी गरोदर राहण्याच्या इच्छेशी निगडीत आहे. जेव्हा एखादी स्त्री आई होण्याची तीव्र इच्छा राखून असेल पण ती आई होत नसेल तर काही सामान्य लक्षणे दिसल्यास सुद्धा त्या स्त्रीला गरोदर राहिल्याचा भास होऊ लागतो. तिसऱ्या थेअरीचा संबंध नर्व्हस सिस्टम मधील काही केमिकल बदलांशी निगडीत आहे जे डिप्रेशनशी संबंधित असतात. जाणकारांच्या मते या कारणामुळेच फॉल्स प्रेग्नन्सी अनेकदा दिसून येते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ हेल्दी व एनर्जी ड्रिंक्सनी करा शरीरातील पाण्याची कमतरता दूर!)

फॉल्स प्रेग्नेंसीची लक्षणे

फॉल्स प्रेग्नेंसीची लक्षणे अनेक प्रकारे गरोदरपणाच्या लक्षणांसारखीच असतात. फक्त यात एकच फरक असतो तो म्हणजे गर्भात बाळ नसते. यात सर्व प्रकरणांमध्ये स्त्रियांना सतत वाटत असते की त्या गरोदर आहेत. याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे पोट फुगणे. यामुळे बाळाऐवजी गॅस, मेद आणि विष्ठा किंवा मुत्र जमा होते. अनियमित मासिक पाळी हे फॉल्स प्रेग्नन्सीचे दुसरे महत्त्वाचे लक्षण आहे. फॉल्स प्रेग्नन्सी होणाऱ्या स्त्रियांपैकी अर्ध्या स्त्रिया याच कारणामुळे आपण गरोदर असल्याचे समजतात. अनेक स्त्रिया तर बाळाची किक फील होत असल्याचेही सांगतात. अन्य लक्षणांमध्ये मोर्निंग सिकनेस, उलटी, स्तनांजवळ वेदना होणे, स्तनांमधून दूध येणे, वजन वाढणे, प्रसूती कळा, भूक जास्त लागणे, गर्भाशय वाढणे यांचा समावेश होतो.

(वाचा :- नॉर्मल डिलिव्हरी हवी असल्यास ९व्या महिन्यात जरुर खा ‘हे’ पदार्थ!)

फॉल्स प्रेग्नेंसीवर उपचार

जेव्हा फॉल्स प्रेग्नन्सीची स्थिती निर्माण होईल तेव्हा मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी स्त्रीने अल्ट्रासाउंडची मदत घ्यावी. यातून स्पष्ट होईल की ती गरोदर नाही. मात्र जर गरोदर स्त्रीला अनियमित मासिक पाळीची लक्षणे दिसत असतील तर तिला औषधाची गरज भासू शकते. फॉल्स प्रेग्नन्सीमुळे ज्या स्त्रीला आई व्हायचे आहे तिच्या मनावर सत्यता कळल्यास मानसिक आघात होऊ शकतो किंवा ज्या स्त्रीला सतत गरोदर असल्याचा भास होत असेल तर तिने मानसोपचारतज्ञाची भेट घ्यायला हवी.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का व कधी येते स्तनांवर खाज? जाणून घ्या यावरील उपाय!)

काय करावे?

जेव्हा स्त्रीला गरोदर असल्याची लक्षणे दिसून येतील तेव्हा सर्वात प्रथम तिने आसपासच्या जेष्ठ आणि अनुभवी महिलेचा सल्ला घ्यावा. या सल्ल्यानंतर आपल्या पतीशी चर्चा करून मग डॉक्टरांशी भेट घ्यावी. डॉक्टर याबाबत तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतात. मात्र जर अजूनही शंका असेल तर मात्र अल्ट्रासाउंडची मदत घ्यावी. यातून मिळणारे निष्कर्ष चुकीचे असू शकत नाहीत. त्यामुळे जर फॉल्स प्रेग्नन्सी असेल तर लगेच कळेल नसेल तर गरोदरपणाच्या दृष्टीने उपचार सुरु करावेत.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये मांसाहाराची इच्छा नाही? मग जाणून घ्या शाकाहाराचे लाभ व ५ खास पदार्थ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *