प्रेग्नेंट महिलांसाठी अमृत आहेत आयरनने परिपूर्ण असलेले ‘हे’ पदार्थ!

Spread the love

लोहाचे दोन प्रकार

सर्वात प्रथम आपण लोहाचे दोन प्रकार जाणून घेऊया. लोहाचा संबंध एनीमल प्रोटीनशी असतो, परंतु गरोदर स्त्री शाकाहारी असेल तर तिने चिंता करू नये कारण अनेक शाकाकाही पदार्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोह मिळते. आयर्नचे दोन प्रकार असतात. एक हेम आयर्न आणि दुसरे नॉन हेम आयर्न! मांस, मच्छी आणि इतर अन्य मांसाहारी पदार्थांमधून मिळणारे लोह हे हेम आयर्न म्हणून ओळखले जाते. हे लोह शरीर सहज पचवू शकते. धान्य, कडधान्य, भाज्या, फळे सुकामेवा आणि कंद मुळे यांमध्ये नॉन हेम आयर्न आढळते. या प्रकारच्या लोहाला पचण्यासाठी खूप वेळ लागतो. पण दोन्ही प्रकारचे लोह हे शरीरासाठी उपयोगीच असतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर का येते महिलांना डिप्रेशन? जाणून घ्या रामबाण घरगुती उपाय!)

लोहाचे विविध स्त्रोत

जर गरोदर स्त्री शाकाहारी असेल तरी ती सहज शरीरातील लोहाची गरज भरून काढू शकते. आपल्या आहारात शक्य तितका जास्त कडधान्ये आणि डाळींचा वापर करावा. यांच्यात फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. एक कप डाळीमध्ये 6.6 मिलीग्रॅम लोह असते. याशिवाय पालक आणि केळी सुद्धा लोहाचा चांगला स्त्रोत म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्यात अँटीऑक्‍सीडेंट, जीवनसत्त्वे आणि लोह विपुल प्रमाणात असते. एक कप पिकलेल्या केळ्यामध्ये 1 मिलीग्राम लोह असते. पालकमध्ये 6.4 मिलीग्राम लोह असते. ब्रोकली खाण्याची आवड असले तर त्यातून सुद्धा गरोदर स्त्री शरीराला लोह देऊ शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते जे लोह शोषून घेण्यात मदत करते.

(वाचा :- बॉलीवूड अभिनेत्रींच्या ‘या’ खास टिप्स वापरून प्रेग्नेंसीमध्ये करा योगाभ्यास!)

मांसाहारी पदार्थातील लोह

जर गरोदर स्त्री मांसाहारी असेल आणि मांसाहार करायला आवडत असेल तर सेल्मन फिश आणि चिकन मधून गरोदर स्त्री हेम आयर्न मिळवू शकते. सेल्मन मध्ये इतर मच्छींच्या तुलनेमध्ये मर्क्युरी कमी असते. त्यामुळेच गरोदर स्त्री हे खाऊ शकते. यामुळे शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. लोहाशिवाय सेल्मनमध्ये ओमेगा 3 फॅटी असिड आणि तर पोषक तत्वे सुद्धा असतात हे गरोदर महिलेला स्वस्थ बनवतात. त्यामुळे जर मांसाहाराला एखाद्या गरोदर स्त्रीच्या आहारात प्राधान्य असेल तर अशा प्रकारच्या लोहयुक्त खाण्यावर तिने जास्तीत जास्त भर द्यायला हवा.

(वाचा :- हाय ब्लड प्रेशरमुळे का करावी लागते सिझेरियन डिलिव्हरी? जाणून घ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपाय!)

गरोदर स्त्रीसाठी लोहाचे महत्त्व

गरोदरपणात रक्तपुरवठा 50 टक्क्याने वाढतो. लोह हे लाल पेशींच्या निर्माणात शरीराला मदत करते. रक्ताचे प्रमाण वाढल्याने शरीरातील रक्ताची मात्र सुद्धा वाढू लागते. गरोदर स्त्री जितके लोह शरीराला देईल तेवढ्या जास्त प्रमाणात शरीर लाल पेशींचे निर्माण करू लागेल. मात्र या उलट जर गरोदर स्त्रीच्या शरीराला लोहाचा योग्य पुरवठा झाला नाही तर एनिमीया आजार होण्याचा धोका असतो. ही गरोदरपणात होणारी एक समस्या आहे. गरोदरपणात एनीमिया आहार झाल्यास आई व बाळ दोघांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय मुदतपूर्व डिलिव्हरी आणि जन्मावेळी बाळाचे वजन कमी असणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर टाक्यांमध्ये होऊ शकतं इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी!)

गरोदर स्त्रीसाठी लोहाची आवश्यकता

गरोदर स्त्रीला दरोरोज 27 मिलीग्राम लोहाची गरज असते. सामान्य स्त्रियांना ज्यांचे वय 19 ते 50 च्या दरम्यान असते त्यांना 18 मिलीग्रॅम लोहाची गरज असते. बहुतांश प्रीनेटल व्हिटामीन्समध्ये पुरेश्या प्रमाणात लोह असते परंतु रक्ताच्या पुरवठ्याची मागणी वाढल्याने गरोदरपणात लोहाची कमतरता निर्माण होऊन एनिमीया आजार होतो. हे रोखायचे असले तर जास्तोत जास्त लोहयुक्त आहार गरोदर स्त्रीने घेणे गरजेचे असते. या शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न सप्लीमेंट सुद्धा घेऊ शकता.

(वाचा :- थंडीत प्रेग्नेंट महिलांनी अशी घ्यावी स्वत:ची काळजी! जाणून घ्या काय करावं व काय टाळावं?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *