प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन!

Spread the love

कच्चे मांस

गरोदरपणात कच्चे मांस अजिबात खाऊ नये. यात कोलाई आणि साल्‍मोनेला नावाचे बॅक्टेरिया असतात. जे की फूड पॉइजनिंगचा त्रास निर्माण करू शकतात. पण गरोदर स्त्रीला मांस खायची खूपच तीव्र इच्छा होत असेल तर तिने ते योग्य पद्धतीने शिजवूनच खायला हवे. ते तोवर शिजवावे जोवर त्यात गुलाबी आणि रक्ताचा कोणताही डाग दिसणार नाही. गरोदर स्त्रीने कच्च्या मांसाला हात लावल्यावर हात आवर्जून धुवावेत. पण शक्य असल्यास गरोदरपणात मांसापासून दूरच राहावे कारण त्याचे दुष्परिणाम झाल्यास आई व बाळ दोघांना भोगावे लागू शकतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमधील लघुशंका समस्यांवर करिना कपूरच्या डाएटिशियनने सांगितले घरगुती उपाय!)

सीफूड

मांसाप्रमाणे मच्छी आणि अन्य सीफूड हे गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. शार्क, किंग मॅकरेल आणि टिलफिश सारख्या माशांमध्ये मोठ्या प्रमाणार मर्क्युरी असते. जास्त प्रमाणात मर्क्युरीचे सेवन केल्यास गर्भातील बाळाचा विकास संथ गतीने होऊ शकतो आणि त्याच्या मेंदूच्या वाढीत अडथळा निर्माण होऊ शकतो. सीफूड मुळे अॅलर्जी, रॅशेस, उलटी आणि अतिसार सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण तरी गरोदरपणात सीफूड खाण्याची इच्छा झाल्यास ते चांगल्या पद्धतीने शिजवून खावे. कधीच शिळी वा कच्च्ची मच्छी खाऊ नये.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?)

कच्ची पपई

तुम्ही अनेकांना हा सल्ला देताना ऐकले सुद्धा असेल की गरोदर स्त्रीने या काळात पपई अजिबात खाऊ नये आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे. यामध्ये लॅटेक्‍टस असते जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करू शकते. शिवाय पपई मध्ये पपेइन आणि पेप्सिन नामक घातक असतात जे बाळाच्या विकासावर मोठा परिणाम करू शकतात. म्हणून गरोदर स्त्रीने पपई पासून शक्य तितके दूर राहावे. जेणेकरून स्वत:च्या आरोग्यासोबत बाळाचे आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील.

(वाचा :- बॉलीवूडमधील या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्ये योगाभ्यास केल्याने झाले होते भरपूर लाभ!)

अननस

पपई नंतर अननस एक असे फळ आहे जे गरोदर स्त्रीला न खाण्याचा सल्ला दिला जातो हे. अननस हे पौष्टिक आणि उपयुक्त फळ असले तरी खास करून गरोदरपाणाच्या सुरुवातीच्या काळात सावध राहून अननस चुकूनही खाऊ नये. यामध्ये ब्रोमलिन एंजाइम असते जे गर्भाशय ग्रीवाला नरम करून थेट प्रसूती कळा सुरु करू शकते. म्हणूनच गरोदरपणाच्या सुरुवातीला किंवा गरोदर होऊ इच्छीण्याच्या काळापासूनच अननसा पासून दूर राहावे.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या प्रत्येक आठवड्यात किती टक्के असतो गर्भपाताचा धोका?)

मेथीदाणे, बडीशेप आणि तीळ

बडीशेप आणि मेथीदाण्याचे सेवन केल्यास गर्भाशयामध्ये आकुंचन निर्माण होऊन मुदतपूर्व प्रसूती कळा सुरु होऊ शकतात किंवा गर्भपात सुद्धा होऊ शकतो. याशिवाय तिळाचे सेवन केल्यास सुद्धा गर्भपाताचा धोका उद्भवू शकतो. जाणकारांच्या तीळ खाऊ नयेत कारण गर्भपात करण्यासाठी तिळाच्या बियांचे सेवन केले जाते. आयुर्वेदात सुद्धा मासिक पाळी नियमित करण्यासाठी तिळाच्या बिजांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच कारणामुळे गरोदरपणात तीळापासून दूर राहावे. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये तीळयुक्त कोणताही पदार्थ खाऊ नये, कारण या काळात गर्भपाताचा धोका सर्वाधिक असतो. तर या काही गोष्टी लक्षात ठावून या पदार्थांचे सेवन टाळावे. ही माहिती शक्य तितकी शेअर करा. जेणेकरून गरोदर स्त्रिया आधीपासुनच सावध राहतील आणि सुरक्षित राहतील.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये चालण्याचे लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा ‘या’ गोष्टींचं तंतोतंत पालन कराल!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *