प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!

Spread the love

गरोदरपणात चक्कर कधी येतात?

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जवळपास सहा आठवडे उलटून गेले की चक्कर येत असल्याची जाणीव स्त्रीला होऊ लागते. काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या रक्त वाहिन्यांवर दबाव आल्या कारणाने दुसऱ्या वा तिसऱ्या तिमाहीमध्ये चक्कर आल्याची भावना निर्माण होते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये चक्कर येणे हि सामान्य गोष्ट आहे. हे मळमळ वा मोर्निंग सिकनेस मुळे होऊ शकते. या समस्यांमुळे ब्लड शुगर कमी होत जाते आणि भूक अतिशय कमी लागते ज्यामुळे गरोदर स्त्रीला चक्कर येत आहे असे वाटते.

(वाचा :- आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!)

पहिल्या तिमाहीतमध्ये चक्कर येणे

या तिमाहीमध्ये हार्मोनल आणि अन्य बदलांमुळे शरीरातील रक्त वाहिन्या या जास्त अरुंद होतात. यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होते, ज्यामुळे गरोदर स्त्रीला चक्कर आल्यासारखे वाटते. मोर्निंग सिकनेस मध्ये शरीरात अन्न आणि पाणी जास्त वेळ टिकून राहत नाही यामुळे कमजोरी निर्माण होते व चक्कर येऊ लागतात. याशिवाय हाइपरमेसिस ग्रेविडेरिम आणि एक्‍टोपिक प्रेगनेंसी मुळे सुद्धा गरोदर स्त्रीला चक्कर येऊ शकते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का दिला जातो तूप खाण्याचा सल्ला? तूपाने होते का नॉर्मल डिलिव्हरी?)

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत चक्कर येणे

आपण पहिल्या तिमाहीत येणाऱ्या चक्कर बद्दल जाणून घेतलं आता जाणून घेऊया गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये येणाऱ्या चक्कर बद्दल! या काळामध्ये रक्ताचे प्रमाण हे 30 टक्क्यांनी वाढले जाते. यामुळे साहजिक ब्लड प्रेशर वाढतो व त्याचा परिणाम म्हणून स्त्रीला चक्कर येऊ लागते. याशिवाय जेस्टेशनल डायबिटीज, एनीमिया आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने सुद्धा गरोदरपणात चक्कर येऊ लागते. यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये स्त्रीने अधिकाधिक स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये थायमिनचे सेवन केल्यास बाळाच्या हृदयाचा होतो चांगला विकास! काय असतं थायमिन व किती प्रमाणात घ्यावं?)

चक्कर आल्यावर काय करावे?

जेव्हा जेव्हा गरोदर स्त्रीला वाटेल की तिला चक्कर येते आहे तेव्हा तिने पुढे देत आहोत त्यातल्या काही टिप्स नक्की वापरून पहाव्यात. गरोदर स्त्रीने खिडकी आणि दरवाजे उघडावेत जेणेकरून खोलीमध्ये शुद्ध हवा येईल. हळू हळू खाली बसावे आणि मान जास्त वेगाने इकडे तिकडे फिरवू नये. शक्य असल्यास डोके हे गुडघ्यांमध्ये घट्ट दाबून ठेवावे.या स्थितीत स्त्रीने अचानक उठू नये किंवा अचानक खाली बसू नये/ शक्य असल्यास उजव्या बाजूस कूस करून झोपावे. यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि फ्रेश वाटू लागेल. एनर्जी वाढवण्यासाठी हलके फुलके स्नॅक्स खावे वा फळाचा रस प्यावा. जर रक्तातील साखर कमी होत असल्याने चक्कर येत असेल तर यामुळे बरे वाटू लागेल. शक्य तितके पाणी प्यावे. जर डोके फिरत असेल तर थंड पाण्याने अंघोळ करून पहावी.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्येही ऑफिसला जाताय? मग प्रत्येक महिन्यात फॉलो करा ‘या’ खास टिप्स!)

चक्कर येणे कसे टाळावे?

काही महत्त्वाची खबरदारी गरोदरपणात घेतल्यास चक्कर टाळता येऊ शकते. जास्त वेळ गरोदर स्त्रीने उभे राहू नये. थोड्या थोड्या वेळाने बसल्या जागेवरून उठून काही पाउले चालावे जेणेकरून रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम सुरु राहील. बसलेल्या वा झोपलेल्या स्थिती असताना स्त्रीने अचानक उठू नये यामुळे डोक्यावर ताण पडू शकतो. थोड्या थोड्या वेळाने काही न काही खात राहावे यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहील. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीच्या मध्यात कमरेवर झोपणे बंद करावे आणि गरम पाण्याने अंघोळ करू नये. या स्थितीत सैल कपडेच परिधान करावे जेणेकरून रक्ताचा प्रवाह नीट सुरु राहील.

(वाचा :- पोटात बाळाची स्थिती उलटी झाल्यास काय उपाय करावेत व अशावेळी कोणती काळजी घ्यावी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *