प्रेग्नेंसीमधील लघुशंका समस्यांवर करिना कपूरच्या डाएटिशियनने सांगितले घरगुती उपाय!

Spread the love

गरोदरपणात असे का होते?

पेल्विक हाडांच्या वरच्या बाजुस मुत्राशय असते आणि याला पेल्विक फ्लोरचा सपोर्ट मिळत असतो. गरोदरपणा आणि डिलिव्हरी वेळी पेल्विकच्या भागांतील स्नायू कमजोर होतात. खोकल्यावर, शिंक आल्यावर, व्यायाम केल्यावर किंवा जोरात हसल्यावर मुत्र या स्थितीत बाहेर येते. कारण या क्रियांमुळे मुत्राशयावर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे लघुशंका रोखणे कठीण होऊन बसते. सोबतच बाळाच्या वजनाचा भार सुद्धा यावर पडतच असतो. याशिवाय हार्मोनल बदलांमुळे मूत्राशय आणि मुत्र नळीच्या लाईनिंगवर प्रभाव पडू शकतो. मधुमेह, मल्‍टीपल स्‍केलेरोसिस, एंग्‍जायटीची औषधे किंवा पूर्वी येऊन गेलेल्या स्ट्रोकमुळे लघुशंका रोखणे कठीण होऊन बसते. या व्यतिरिक्त मुत्रामार्गात संक्रमण झालेले असल्यास सुद्धा ही समस्या जाणवू शकते.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?)

आहार

या समस्येवर योग्य आहारशैलीने मात करता येऊ शकते असे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे मत आहे. त्यांच्या मते हा त्रास जर रोखायचा असेल तर रोज सकाळी खजूर खावेत. मुग डाळीचे स्प्राऊट्स बनवून खाणे सुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकते. शिवाय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये अवश्य एक चमचा तूप टाकवे. अशा प्रकारचे काही बदल लघुशंकेमधील अनियमितता दूर करून ह्या त्रासावर नियंत्रण मिळवून देऊ शकतात.

(वाचा :- बॉलीवूडमधील या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्ये योगाभ्यास केल्याने झाले होते भरपूर लाभ!)

व्यायाम करावा

आहारातील काही बदलासोबत योग्य प्रकारचे व्यायाम केल्यास सुद्धा या त्रासावर मात करता येते व हा त्रास कमी करता येतो असे आहारतज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात. व्यायाम हा आपल्या आयुष्यातील आतिशय महत्त्वाचा भाग असून तो नियमितपणे केल्यास अनेक शारीरिक आजारांपासून आपण सहज मुक्तता मिळवू शकते असे त्यांचे मत आहे. पण सध्याच्या काळात व्यायामाला लोकं फार गंभीरपणे घेत नाहीत अशी खंत सुद्धा त्या व्यक्त करतात. पण गरोदर स्त्रियांनो तुम्हाला खरंच या त्रासातून सुटका हवी असेल तर आवर्जून ऋतुजा दिवेकर यांनी शिफारस केलेले व्यायाम करा.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या प्रत्येक आठवड्यात किती टक्के असतो गर्भपाताचा धोका?)

किगेल एक्सरसाईज आणि स्‍ट्रेंथ ट्रेनिंग

किगेल एक्सरसाईज केल्याने पेल्विक भागाचे स्नायू अतिशय मजबूत होतात. हे स्नायू गर्भाशय, मुत्राशय, छोटे आतडे आणि अन्य भागांना सपोर्ट देतात. म्हणूनच हा व्यायाम या त्रासावर मात्र करण्यासाठी उपयोगी सिद्ध होतो. याशिवाय स्‍ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने पेल्विक सोबतच इतर भागांच्या स्नायुंना सुद्धा मजबुती मिळते. मात्र हा व्यायाम डॉक्टरांच्याच सल्ल्याने करावा कारण हा व्यायाम हेवी प्रकारात मोडणारा आहे आणि गरोदरपणात हेवी व्यायाम करणे धोक्याचे ठरू शकते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये चालण्याचे लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा ‘या’ गोष्टींचं तंतोतंत पालन कराल!)

योग

हो अगदी बरोबर वाचलंत, या त्रासातून मुक्तता देण्यासाठी योग तुमची मदत नक्की करेल. ऋजुजा दिवेकर सुद्धा इतर व्यायामांपेक्षा योगची मदत घेण्याचाच सल्ला देतात. विशेष करून ताडासन हा प्रकार करावा. यामुळे मूत्राशयाचे स्नायू मजबूत होण्यास सहाय्य मिळते. याशिवाय योग हा गरोदर स्त्रीने केलाच पाहिजे असेही जाणकार सांगतात. यामुळे आई व बाळ दोन्ही सुदृढ राहतात. त्यामुळे नक्की योग करा आणि या त्रासातून मुक्तता मिळवण्यासोबत सुदृढ सुद्धा राहा.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये शारीरिक उष्णतेची समस्या भेडसावते आहे? मग ट्राय करा ‘हे’ घरगुती उपचार!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *