प्रेग्नेंसीमध्येही ऑफिसला जाताय? मग प्रत्येक महिन्यात फॉलो करा ‘या’ खास टिप्स!

Spread the love

गरोदरपणात स्त्रीचे शरीर हे सामान्य स्थितीमध्ये नसते. शरीरावर खूप भार असतो आणि सतत आळस येतो आणि आराम करावासा वाटतो. मुळात स्त्रीला गरोदरपणात काहीच करावेस वाटत नाही. पण सध्याच्या स्त्रिया या आधुनिक विचारांच्या आहेत आणि आपल्या करियर बाबत जास्त सतर्क आहेत. त्यामुळेच गरोदरपणात सुद्धा स्त्रिया आपल्या कामाला जाताना दिसतात वा काम करताना दिसतात. बॉलीवूडची बेबो करीना कपूर (kareena kapoor) सुद्धा याला अपवाद नाही.

दुसऱ्या वेळेस गरोदर असताना सुद्धा तिने आपल्या कामात अजिबात खंड पडू दिलेला नाही. जे जे प्रोजेक्ट्स तिने हाती घेतले होते, जी जी कामे करण्याचे अश्वासन दिले होते ती ती कामे ती पूर्ण करत आहे. गरोदरपणात ऑफिसला जाऊ इच्छीणाऱ्या स्त्रियांसाठी ती आदर्श आहे. आज आपण तिच्याकडून अशा काही प्रेरणादायी गोष्टी जाणून घेऊया ज्या गरोदर स्त्रिया काम सांभाळताना टिप्स म्हणून वापरू शकतात.

पहिल्या तिमाहीमध्ये ऑफिस

गरोदरपणाची पहिली तिमाही शरीरासाठी अत्यंत क्लेशदायक असते. या काळात खूप थकवा जाणवतो, उलट्या होतात, मळमळ होते आणि त्यामुळे एकंदर दिवस खराब जातो. या तिमाहीमध्ये स्त्रीने शक्य तितके पौष्टिक पदार्थ खावेत. तेलकट, तुपकट पदार्थांपासून दूर राहावे. ऑफिस मध्ये आपण एकदाच लंच घेतो, पण सोबत चटर पटर गोष्टी सुद्धा खातो. तर या अशा पदार्थां ऐवजी स्त्रीने पौष्टिक पदार्थ खायला हवे. सकाळी उठल्यावर खूप पाणी प्यावे आणि शरीराला हायड्रेटेड ठेवावे. सोबत नेहमी पाण्याची बाटली ठेवावी. मळमळ रोखण्यासाठी केमोमेल चहा प्यावा. रात्रीची लवकर झोप घ्यावी. कारण जेवढी जास्त झोप मिळेल तेवढा दुसऱ्या दिवशी कमी थकवा जाणवेल.

(वाचा :- पोटात बाळाची स्थिती उलटी झाल्यास काय उपाय करावेत व अशावेळी कोणती काळजी घ्यावी?)

दुसऱ्या तिमाहीमध्ये ऑफिस

गरोदरपणाची दुसरी तिमाही पहिल्या तिमाही पेक्षा चांगली असते. यात स्त्रीला शारीरिक उर्जा परत मिळते. मात्र हे तीन महिने संपल्यावर पुन्हा एकदा गरोदरपणाच्या समस्या सुरु होतात. अशावेळी स्त्रीने मॅटरनीटी कपडे परिधान करण्यास सुरुवात करावी. ऑफिस मध्ये सुद्धा घट्ट जीन्स परिधान करण्याऐवजी मॅटरनीटी कपडे परिधान करावेत. ऑफिस मध्ये जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहू नये. प्रत्येक तासाला उठून पाच मिनिटे चालावे. यामुळे पायात द्रव जमणार नाही आणि पाय सुजणार नाहीत.

(वाचा :- प्रेग्नेंट पत्नीची कशी काळजी घ्यावी? सैफने केलेल्या सपोर्टचा करीनाने केला उलगडा!)

तिसऱ्या तिमाहीमध्ये ऑफिस

या काळात स्त्रीला वारंवार नियमितपणे चेकअप साठी डॉक्टर कडे जावे लागते. जर स्त्रीला शेवटच्या महिन्यात जास्त थकवा जाणवत असेल तर अशावेळी काम करण्याचा अट्टाहास करू नये आणि सुट्टी घेऊन आराम करावा. या काळात शारीरिक उर्जा शक्य तितकी राखून ठेवण्यावर भर द्यावा. या काळात भूक जास्त लागते, मात्र सेवन हे केवळ पौष्टीक पदार्थांचेच करावे. नवव्या महिन्याआधी तुमची मॅटरनीटी लिव्ह सुरु होते, या काळात शक्य तितका आराम करावा.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील मळमळ व उलटी रोखण्यासाठी लिंबू सरबत पीत आहात? मग जाणून घ्या हे सुरक्षित आहे की नाही?)

करीनाने घेतली शक्य तितकी काळजी

गरोदरपणात स्त्री कामाला जात असेल तर तिने सर्वाधिक भर हा स्वत:ची काळजी घेण्यावर द्यावा. गरोदरपणा हा असा काळ आहे जो अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात एक चुकीची गोष्ट आई व बाळ दोघांना धोक्यात आणू शकते आणि अधिकाधिक गरोदरपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. करीना गरोदर असताना जेव्हा बाहेर जायची तेव्हा तिचे कामात लक्ष असायचे पण सर्वाधिक प्राधान्य ती स्वत:ला द्यायची कारण जर तुम्ही सुरक्षित राहाल तर बाळ सुरक्षित राहील.

(वाचा :- प्रेग्नेंसी डाएटमध्ये स्प्राऊट्सचा समावेश करण्याआधी ‘ही’ माहिती अवश्य जाणून घ्या!)

जास्त ताण घेऊ नये

काम म्हटलं की ताण हा आलाच, मात्र गरोदरपणात शक्य तितका कमी ताण घ्यावा. स्वत:ला जमेल तेवढेच काम करावे. जर वाटत असेल की हे काम करणे शक्य होत नाही तर सरळ सुट्टी टाकावी वा ऑफिसला न जाता घरून काम सुरु करावे. अनेक स्त्रिया या काळात घरूनच काम करतात. घरात स्त्रीची काळजी घेणारी माणसे असतात, त्यामुळे ती निश्चिंत राहू शकते. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही गरोदरपणात ऑफिसला जाताना पाळल्या तर तुम्ही गरोदरपणा आणि कामाचा बॅलेन्स सहज पेलू शकता.

(वाचा :- Low birth weight baby : प्रेग्नेंसीतील ‘या’ चुकांमुळे जन्मावेळी बाळाचे वजन असते अत्यंत कमी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *