प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट

Spread the love

​ब्लॅक रफल ड्रेस

विराट आणि अनुष्काने आपली गोड बातमी अतिशय हटके स्टाइलमध्ये चाहत्यांसोबत शेअर केली होती. अनुष्काने सुंदर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले होतं की,’लवकर आम्ही दोनाचे तीन होणार आहोत…’ ही गुड न्यूज शेअर करण्यासाठी अनुष्काने काळ्या रंगाच्या पोल्का डॉट डिझाइनच्या ड्रेसची निवड केली होती. या फोटोमध्ये अनुष्काने रफल डिझाइनचा साधा पण स्टायलिश प्लोका डॉट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या ड्रेसच्या स्लीव्ह्ज आणि बॉर्डरवर फ्रिल्ससह रफल डिझाइन तुम्ही पाहू शकता. सुप्रसिद्ध फॅशन लेबल Nicholas ने हा ड्रेस डिझाइन केला आहे.

(Shilpa Shetty शिल्पा शेट्टीची बुट आणि जीन्सची अनोखी स्टाइल, पाहा फोटो)

​फ्लोरल मिनी ड्रेस

यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने दुबईमध्ये जाऊन सेलिब्रेशन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळेस अनुष्काने V शेपमधील फ्लोरल मिनी ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस फॅशन लेबल ‘जारा’ने डिझाइन केला आहे. कमीत कमी मेकअपसह मिडिल पार्टेड हेअर स्टाइल आणि ग्लॉसी लिप्स अशा अवतारात अनुष्का खूपच मोहक दिसत होती.

(Fashion Tips को-ऑर्ड ड्रेसची क्रेझ! का वाढतेय या स्टायलिश पॅटर्नची मागणी?)

​ब्लॅक मोनोकिनी

यानंतर काही दिवसांनी अनुष्का शर्मानं स्विमिंग पुलमधील अतिशय स्टायलिश फोटो शेअर केला होता. तिनं काळ्या रंगाचा सुंदर मोनोकिनी ड्रेस परिधान केल्याचे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकतो. ASOS फॅशन लेबलने हा ड्रेस डिझाइन केला आहे. अनुष्काच्या संपूर्ण लुकबाबत सांगायचे झाले तर या ऑफ शोल्डर मोनोकिनीमध्ये वरील बाजूस रफल डिझाइन होतं. या हटके डिझाइनमुळे अनुष्काचा लुक आकर्षक दिसतोय.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

​सॅल्मन पिंक जंपसूट

अनुष्का शर्मा सोशल मीडियावर एका मागोमाग एक क्युट फोटो शेअर करत आहे. मोनोकिनी ड्रेसनंतर फिकट गुलाबी रंगाच्या आरामदायक जंपसूटमधील अनुष्काचा कूल लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. या जंपसूटचं डिझाइन StFrock फॅशन लेबलचे आहे. या जंपसूटच्या पुढील बाजूस बटणच्या डिझाइनसह साइड पॉकेट्स असल्यानं हे आउटफिटला कूल लुक मिळाला आहे. यावर अनुष्काने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते.

(मेटॅलिक लुक ठरतोय हिट! तरुणींमध्ये ‘या’ पॅटर्नची का आहे इतकी क्रेझ)

​ऑफ-शोल्डर फ्लोरल ड्रेस

अनुष्काला स्टाइलसह कम्फर्टेबल लुक कॅरी करणं पसंत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं ऑफ-शोल्डर नेकलाइन असणारा सुंदर फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर अनुष्काने सोन्याची नाजूक चेन आणि मॅचिंग हुप ईअररिंग्स अशी ज्वेलरी परिधान केली होती. या लुकसाठीही तिनं कमीत कमी मेकअप केला होता.

(Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *