प्रेग्नेंसीमध्ये केल्यास ‘या’ खास बियांचं सेवन, आई व बाळाला होतील अनेक आरोग्यवर्धक लाभ!

Spread the love

गरोदरपणात (pregnancy) स्त्रीचे एकच ध्येय असते ते म्हणजे आपली आणि आपल्या बाळाची सुरक्षा! तिला सतत वाटत असते की आपले बाळ सुरक्षित राहावे, ते एकदम सुदृढ जन्माला यावे. मात्र हे तेव्हाच शक्य असते जेव्हा आई सुद्धा तितकी स्वतःची काळजी घेते आणि योग्य नियोजन करते. या नियोजनामध्ये आहाराचे नियोजन अत्यंत गरजेचे असते.

गरोदर स्त्री जे खाते ते तिच्या शरीराला मिळते आणि तेच पुढे बाळाला मिळते. मात्र गरोदर स्त्रीला माहीत असायला हवे की तिने नक्की कोणत्या गोष्टी खाल्ल्या तर तिला आणि बाळाला फायदा होईल. आज आम्ही या लेखातून अशाच एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्यास गरोदर स्त्रीला आणि बाळाला खूप फायदा होतो.

गरोदरपणात सुर्यफुलाच्या बिया खाव्यात का?

एक गट असा आहे ज्यांच्या मते सुर्यफुलाच्या बिया गरोदर स्त्रीने खाऊ नयेत. परंतु त्यांच्या या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही कारण अनेक वेळा हे सिद्ध झालंय मी सुर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने गरोदर स्त्रीला फायदा होतो आणि त्यातील पोषक घटक बाळासाठी सुद्धा लाभदायक ठरतात. सुर्यफुलांच्या बियांमध्ये फॉलिक अ‍ॅंसिड मोठ्या प्रमाणावर असते जे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला हातभार लावते. जर बाळाच्या शरीरात फॉलिक अ‍ॅंसिडची कमतरता निर्माण झाली तर क्लेफ्ट लिप आणि स्पाईना बिफिडा सारखे आजार उद्भवू शकतात. म्हणून गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात शक्य तितके फॉलिक अ‍ॅंसिड युक्त आहाराचे सेवन करावे आणि बाळाला सुरक्षित ठेवावे.

(वाचा :- जर प्रेग्नेंसीआधीच शरीराला केली ‘या’ व्हिटॅमिन्सची पूर्ती, तर आई बनण्यात येणार नाही बाधा!)

सुर्यफुलांच्या बिया खाण्याचे फायदे

सूर्यफुलांच्या बियांमध्ये जवळपास 90% व्हिटॅमिन, प्रोटीन, फाइटोकेमिकल्स, खनिज पदार्थ, अ‍ॅंटीऑक्सीडेंट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटची मात्रा असते. सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सुद्धा असते आणि यात अ‍ॅंटीऑक्सीडेंट असल्याने शरीराचे बॅक्टेरिया पासून देखील संरक्षण होते. याशिवाय सुद्धा अनेक फायदे सूर्यफुलांच्या बियांचे सेवन केल्याने गरोदर स्त्रीला व तिच्या बाळाला मिळतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर शिल्पा शेट्टीसारखी आकर्षक फिगर हवी असल्यास फॉलो करा तिच्याच डाएट टिप्स!)

हाडांचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती

सूर्यफुलांच्या बियांमध्ये फॉस्फरस आणि अन्य प्रकारचे खनिज पदार्थ सुद्धा आढळतात जे गर्भातील बाळाच्या हाडांच्या विकासासाठी उपयोगी असतात. या बियांमध्ये फाइटोकेमिकल्स असतात जे रोगांशी लढण्यात मदत करतात. गरोदरपणात स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असते अशावेळी या बियांच्या सेवनाने तिची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि तिचे व बाळाचे दोघांचे रोगांपासून रक्षण होते.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर हार्मोन्स संतुलित होण्यासाठी किती वेळ लागतो व संतुलित झाले नाही तर काय करावं?)

सुर्यफुलांच्या बिया आणि फॉलिक अ‍ॅसिड

सुर्यफुलांमध्ये विविध प्रकारचे खनिज पदार्थ जसे की फोलेट आणि आयरन, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम आणि कॉपर यांचा समावेश असतो. सुर्यफुलांच्या बियांमध्ये आढळणारे फॉलिक अ‍ॅसिड लाल रक्त पेशींच्या निर्माणात मोलाचे योगदान देते आणि फुफ्फुसांद्वारे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करतात. गरोदरपणात स्त्रियांच्या शरीराला फॉलिक अ‍ॅसिडची खूप गरज असते आणि ती गरज सुर्यफुलांच्या बियांमार्फत पूर्ण होऊ शकते.

(वाचा :- Karwa chauth and pregnancy : एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या प्रेग्नेंट महिला करवा चौथचं व्रत ठेऊ शकतात की नाही?)

सुर्यफुलांच्या बियांमधील पोषक तत्वांचे प्रमाण

२८ ग्रॅम सुर्यफुलांच्या बियांमध्ये १६५ कॅलरी, १४ ग्रॅम फॅट, 3 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, ९ ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, १ मिलीग्रॅम सोडियम, 7 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, ३ ग्रॅम फायबर, प्रोटीन ५.५ ग्रॅम, व्हिटॅमिन ए २.५ आईयू, व्हिटॅमिन सी 0.५ मिलीग्रॅम, कॅल्शियम २० मिलीग्रॅम, आयरन १ मिलीग्रॅम असते. ही माहिती तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरुन गरोदर असणाऱ्या स्त्रियांना फायदा होईल.

(वाचा :- वयाच्या चाळीशीत करीना कपूर बनते आहे आई! या वयात प्रेग्नेंट राहिल्यास काय धोके उद्भवतात?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *