प्रेग्नेंसीमध्ये टोमॅटो खाल्ल्याने आई व बाळाला मिळतात ‘हे’ खास लाभ!

Spread the love

टोमॅटोमधील पोषक तत्वे

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘के’, फोलेट आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते 100 ग्रॅम टोमॅटो मध्ये 0.76 ग्रॅम प्रोटीन, 1.58 ग्रॅम फायबर, 3.2 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 0 ग्रॅम कोलेस्ट्रोज, 25 मिलीग्रॅम विटामिन सी 8.9 मिलीग्रॅम कॅल्शियम, 167 मिलीग्रॅम पोटेशियम, 15.4 मिलीग्रॅम फास्फोरस आणि 252 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ‘ए’ असते. या शिवाय या लालभडक फळभाजीत लाइकोपिन, बीटा-कॅरोटीन, नॅनिंगजेनिन आणि क्लोरोजेनिक एसिड देखील आढळते.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!)

गरोदरपणात टोमॅटो खावे का?

हो मंडळी, गरोदर स्त्रीने आपल्या आहारातून टोमॅटोचे सेवन करणे चांगले मानले जाते. वरील पौष्टिक तत्वांकडे पाहता तुम्हालाही कळले असेल की टोमॅटोमुळे गरोदर स्त्रीला आणि नंतर तिच्या बाळाला किती प्रमाणात पोषण मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की टोमॅटोचे अतिसेवन करू नये. कोणतीही गोष्ट एका मर्यादित प्रमाणात खाल्ली तरच त्याचा फायदा मिळतो पण जर अतिसेवन झाले तर मात्र शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला वेळ लागत नाही आणि ही गोष्ट टोमॅटोला देखील लागू होते.

(वाचा :- आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!)

गरोदरपणात टोमॅटो सेवनाचे फायदे

टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि व्हिटॅमिन ‘ए’ खूप जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ‘सी’ हे लोहाचे अवशोषण वाढवते आणि व्हिटॅमिन ‘ए’ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. शिवाय संक्रमणापासून सुद्धा बचाव करते. शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ ची मुबलक मात्रा असल्यास डिलिव्हरी नंतर स्त्री लवकर रिकव्हर होते. उन्हात सुकलेल्या टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन ‘के’ असते जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. यात असलेलं लायकोपिन हे शक्तिशाली अँटीऑक्सीडेंट असून पेशींचे संरक्षण करते. यामुळे बाळाला कोणत्याही जन्मजात विकाराचा धोका राहत नाही. टोमॅटो मधील निकोटेनिक ऍसिड बॅड कोलेस्टेरॉलला कमी करते आणि गरोदरपणात हृदय निरोगी राखते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का दिला जातो तूप खाण्याचा सल्ला? तूपाने होते का नॉर्मल डिलिव्हरी?)

अन्य फायदे

टोमॅटो सेवनाने रक्त शुद्ध होते. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया देखील प्रभावीपणे कार्य करू लागते. यात असणारे लायकोपिन कॅन्सर निर्माण करणाऱ्या रेडिकल्सना सुद्धा नष्ट करतात. यामुळे गरोदरस्त्री आणि तिच्या बाळाला कॅन्सरचा कोणताही धोका राहत नाही. रोज टोमॅटो खाल्ल्याने ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस कमी होतो. आणि यामुळे जेस्टेनेशल डायबेटीसचा धोका टळतो. टोमॅटो मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते जे बाळाची त्वचा, हाडे अन्य अवयव मजबूत करण्याचे काम करते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये थायमिनचे सेवन केल्यास बाळाच्या हृदयाचा होतो चांगला विकास! काय असतं थायमिन व किती प्रमाणात घ्यावं?)

टोमॅटो अतिसेवनाचे दुष्परिणाम

जसं की आपण आधीच पाहिलं की पदार्थ कितीही चांगला असो जर त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तरच फायदे मिळतात अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतात हीच गोष्ट पौष्टिक टोमॅटोला सुद्धा लागू होते. गरोदरपणात जास्त टोमॅटो खाल्ल्याने हृदयात जळजळ होऊ शकते. पोटात गॅस निर्माण होऊन पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे टोमॅटो नक्की खा पण मर्यादित प्रमाणातच! हा लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांना सुद्धा टोमॅटोचे फायदे सांगा.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्येही ऑफिसला जाताय? मग प्रत्येक महिन्यात फॉलो करा ‘या’ खास टिप्स!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *