प्रेग्नेंसीमध्ये थायमिनचे सेवन केल्यास बाळाच्या हृदयाचा होतो चांगला विकास! काय असतं थायमिन व किती प्रमाणात घ्यावं?

Spread the love

गरोदरपणात (pregnancy diet tips) स्त्रीने सर्वात चांगला आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. कारण ती जे काही सेवन करते तेच बाळाला मिळते. जी स्त्री उत्तम आहार घेते तिच्या बाळाचा विकास चांगला होतो. जी स्त्री आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही त्या स्त्रीच्या बाळाच्या शारीरिक विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो. या आहारातून बाळाला व्हिटॅमिन मिळणे अत्यंत गरजेचे असते.

व्हिटॅमिन हे बाळाच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. या व्हिटॅमिन पैकी व्हिटॅमिन “बी 1′ अर्थात थायमिन (thiamine) बाळाला मिळणे खूप गरजेचे असते. त्यामुळे स्त्रीने जास्तीत जास्त व्हिटॅमिन ‘बी 1’ युक्त आहार घ्यायला हवा. मात्र सामान्यत: स्त्रियांना याबद्दल जास्त माहिती नसते वा त्यांच्याकडे या विषयी जास्त जागरुकता नसते. आज आपण या लेखातून थायमिन आणि त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

गरोदरपणात का गरजेचे आहे थायमिन?

थायमिन हे असे व्हिटॅमिन आहे जे आई व बाळ दोघांच्या शरीरातील कार्बोहायड्रेटला एनर्जी मध्ये परिवर्तीत करण्याचे काम करतात. हे तंत्रिका तंत्र, स्नायू आणि हृदय यांची यंत्रणा सुरळीत प्रकारे कार्य करावी म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील थायमिन अत्यंत गरजेचे मानले जाते. त्यामुळेच गरोदरपणात स्त्रीने असा आहार घेणे अपेक्षित असते ज्यातून बाळापर्यंत अधिकाधिक थायमिन पोहोचेल आणि बबाळाचा शारीरिक विकास योग्य प्रकारे होऊन बाळ सुदृढ राहील.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्येही ऑफिसला जाताय? मग प्रत्येक महिन्यात फॉलो करा ‘या’ खास टिप्स!)

काय असते थायमिन?

अर्भकाच्या विकासासाठी गरजेचे असणारे थायमिन खाद्य पदार्थांमधूनच प्राप्त होते. हे एक अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन आहे. हे व्हिटॅमिन बी च्या इतर प्रकारांसोबत घेतले जाते. अनेक मल्टी व्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स उत्पादनांमध्ये थायमिन आढळते. याचसाठी डॉक्टर आणि जाणकार सुद्धा अशा प्रकारचा आहार घेण्यास सांगतात ज्यात व्हिटॅमिन बी 1 जास्त प्रमाणात असेल. सध्या आहारासोबतच गोळ्या आणि औषधे सुद्धा अशा प्रकारची दिली जातात ज्यात जास्त प्रमाणात थायमिन असेल आणि जरी आहारातून थायमिनची तुट भरून निघाली नाही तर ती या गोळ्या आणि औषधांमार्फत भरून निघेल.

(वाचा :- पोटात बाळाची स्थिती उलटी झाल्यास काय उपाय करावेत व अशावेळी कोणती काळजी घ्यावी?)

गरोदरपणात किती प्रमाणात थायमिन सेवन करावे?

पदार्थ कोणताही असो त्याचे सेवन हे एका मर्यादित प्रमाणातच करावे लागते. जर त्यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. हि गोष्ट थायमिनला सुद्धा लागू होते. गरोदर स्त्रीने थायमिन एका विशिष्ट प्रमाणातच घेणे अपेक्षित असते, ना कमी ना जास्त. जाणकारांच्या सल्ल्यानुसार गरोदर स्त्रीने दरोरोज 1.4 मिलीग्रॅम थायमिन सेवन करायला हवे. मात्र हे प्रमाण अंतिम नसून गरोदर स्त्रीच्या वयावर ते अवलंबून असते. जर स्त्रीच्या गर्भात जुळे वा तिळे असेल तर जस्त प्रमाणात थायमिनची गरज भासेल कारण ते थायमिन सर्व बाळांमध्ये विभागले जाईल.

(वाचा :- प्रेग्नेंट पत्नीची कशी काळजी घ्यावी? सैफने केलेल्या सपोर्टचा करीनाने केला उलगडा!)

थायमिनची कमतरता

थायमिनची कमतरता अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण देऊ शकते. थायमिनच्या कमतरतेमुळे बेरी-बेरी रोग होऊ शकतो. जर शरीरात थायमिनची खूपच जास्त कमतरता निर्माण झाली तर हा रोग होतो. बेरी-बेरी रोग दोन प्रकारचा असतो. एक असतो सुका बेरी-बेरी आणि दुसरा असतो ओला बेरी-बेरी! सुक्या बेरी-बेरी रोगामध्ये थकवा, उलटी, मळमळ, वेदना, पायाचे स्नायू काम न करणे आणि मुंग्या येणे यांसारखी लक्षणे दिसतात. ओल्या बेरी-बेरी रोगामध्ये कमी भूक लागणे, थकवा, हाता पायाला वदना होणे, पायात सूज निर्माण होणे आणि श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील मळमळ व उलटी रोखण्यासाठी लिंबू सरबत पीत आहात? मग जाणून घ्या हे सुरक्षित आहे की नाही?)

कोणत्या गोष्टीत असते थायमिन

फोर्टिफाइड ब्रेन, धान्य,, कडधान्ये आणि मटार यांसारख्या गोष्टीत चांगल्या प्रमाणात थायमिन असते. शिवाय फळे, भाज्या, दुग्ध उत्पादने यांमध्ये सुद्धा पुरेश्या प्रमाणात थायमिन असते. त्यामुळे या गोष्टींचे गरोदरपणात स्त्रीने अधिकाधिक सेवन करावे आणि स्वत:च्या शरीराला आणि बाळाला थायमिन पुरवावे. मात्र स्त्रीने स्वत:च्या मनानुसार थायमिनचे सेवन करू नये. एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसारच थायमिनचे सेवन करावे, जेणेकरून आई व बाळाच्या जीवाला अतिसेवनामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसी डाएटमध्ये स्प्राऊट्सचा समावेश करण्याआधी ‘ही’ माहिती अवश्य जाणून घ्या!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *