प्रेग्नेंसीमध्ये थायरॉइडची गोळी खाणं योग्य आहे का?

Spread the love

थायरॉइडचे तोटे

गरोदरपणात थायरॉइडची समस्या निर्माण झाल्यास त्याचे मोठे तोटे स्त्रीला सहन करावे लागू शकतात. आधीच गरोदरपणामुळे अनेक शारीरिक समस्यांनी ती त्रस्त असते आणि त्यातच थायरॉइडच्या समस्या अधिक भर घालतात. थायरॉइड मुळे निर्माण होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याचा प्रभाव गर्भातील बाळावर सुद्धा होऊ शकतो. तसेच हार्मोनल असंतुलनामुळे स्त्रीचा संपूर्ण दिवस बिघडतो. गरोदरपणा आधी स्त्रीला थायरॉइडची समस्या निर्माण झाल्यास स्त्रीला गरोदर राहण्यास अडथळा उत्पन्न होऊ शकतो.

(वाचा :- गर्भावस्थेमध्ये योनीतून पाणी येत असल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!)

गरोदरपणात थायरॉइडची गोळी खावी का?

हाच तो प्रश्न आहे जो थायरॉइडचीच्या समस्येने झुंज देणाऱ्या प्रत्येक गरोदर स्त्रीला भोगावा लागतो आणि याचे उत्तर आहे हो ती स्त्री थायरॉइडची गोळी खाऊ शकते. मात्र यासाठी तज्ञांची आणि डॉक्टरांची मदत जरून घ्यावी. त्यांच्या सल्ल्यानुसारच दिवसाला किती गोळ्या खाव्यात ते ठरवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असते. मर्यादित प्रमाणात कोणत्याही गोष्टीचे सेवन केले तर त्यामुळे शरीराला हानी पोहोचत नाही. पण त्यापेक्षा जास्त प्रमाण झाले तर मात्र शरीराला हानी पोहचू शकते. हायपोथायराइडिज्‍म (थायरॉइड ग्रंथीची कमी कार्यक्षमता) किंवा हायपरथायरॉइडिज्‍म (थायरॉइड ग्रंथि अधिक सक्रीय असणे) या दोन्ही स्थितींमध्ये स्त्रीला थायरॉइडची गोळी खावी लागते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये टोमॅटो खाल्ल्याने आई व बाळाला मिळतात ‘हे’ खास लाभ!)

गोळी कधी घ्यावी?

गरोदरपणात थायरॉइडची गोळी घेणे गरजेचे आहे हे जरी खरे असले तरी ती गोळी कधी घ्यावी हे माहित असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. गरोदरपणात हायपोथायरॉइडच्या स्थितीमध्ये थायरॉइडची गोळी घेणे आवश्यक असते. यात थायरॉइडची ग्रंथी पुरेश्या प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनवू शकत नाही. लेवोथायरोक्सिन नावाच्या औषधाने थायरॉइड हार्मोन सिंथेटिक रुपात शरीरात तयार होत जे बाळासाठी सुरक्षित मानले जाते. यामुळे बाळाच्या विकासावर आणि आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!)

गरोदरपणात थायरॉइड हार्मोन

गरोदरपणात थायरॉइड ग्रंथीला पहिल्या पेक्षा जास्त म्हणजे 40% जास्त थायरॉइड हार्मोन तयार करावे लागतात. हे बाळ आणि आई दोघांसाठी अत्यंत गरजेचे असते. ज्या स्त्रियांना गरोदरपणात योग्य प्रमाणात थायरॉइड हार्मोन मिळत नाही त्यांना मिसकॅरेज, प्रिक्ललेंप्सिया आणि प्रीटर्म डिलिव्हरी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर काही संशोधनातून हे सुद्धा समोर आले आहे की ज्या स्त्रियांच्या शरीरात गरोदरपणावेळी कमी थायरॉइड हार्मोन बनवते त्यांच्या बाळाचा आयक्यू लेव्हल कमी असतो.

(वाचा :- आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!)

गरोदरपणातील थायरॉइड केयर

अमेरिकन थायरॉइड असोसिएशन मधील जाणकारांच्या मते गरोदरपणात स्त्रियांनी काही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. लेवोथायरोक्सिन घेणाऱ्या जास्तीत जास्त स्त्रियांना गरोदरपणात आपल्या डोसचे प्रमाण वाढवण्याची गरज असते. डॉक्टर याबबत योग्य मार्गदर्शन करू शकतात. शरीरातील टीएसएच लेव्हल नुसार डोस ठरवला जातो. याच लेव्हल वर समजते की गरोदर स्त्रीला पुरेश्या प्रमाणात थायरॉइड हार्मोन मिळते आहे. एक साधी ब्लड टेस्ट करून सुद्धा याबाबत जाणून घेता यते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये दर चार आठवड्याने टीएसएच लेव्हल चेक केली पाहिजे. यानंतर शेवटच्या महिन्यांमध्ये 26 वा 32 व्या आठवड्यांमध्ये किमान एकदा टेस्ट केलीच पाहिजे.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का दिला जातो तूप खाण्याचा सल्ला? तूपाने होते का नॉर्मल डिलिव्हरी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *