प्रेग्नेंसीमध्ये फक्त ‘या’ पद्धतीनेच करा पनीरचं सेवन!

Spread the love

गरोदरपणात पनीर खावे का?

तर याचे उत्तर आहे हो, गरोदरपणात स्त्री पनीर खाऊ शकते. मात्र यासाठी गरोदर स्त्रीला लेक्‍टोज टोलरेंट नसावा. पनीर मध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून पनीर खाल्ल्याने गरोदरपणात रोजच्या रोज कॅल्शियम आणि प्रोटीन यांची गरज भागवली जाते. पनीर जर शिजवून खाल्ले तर सहज पचते. त्यामुळे गरोदरपणात स्त्री जर पनीर खात असेल तर तिने शक्य तितके ते शिजवून खाण्यावरच भर द्यावा.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये थायरॉइडची गोळी खाणं योग्य आहे का?)

कच्चे पनीर सुद्धा खाऊ शकते

पनीर शिजवूनच खाल्ले पाहिजे असे गरजेचे नाही. पनीर शिजवून खाण्याचा सल्ला यासाठी दिला जातो कारण शिजवलेले पनीर पचायला सोपे जाते. गरोदरपणात स्त्री कच्चे पनीर नक्कीच खाऊ शकते मात्र हे खाताना एक धोका असा निर्माण होतो की कच्च्या पनीर मधून जर शरीरात जंतू व विषाणूंनी प्रवेश केला तर त्याचे मोठे नुकसान आरोग्याला होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे आरोग्य धोक्यात घालायचे नसेल, सोबतच बाळाला सुद्धा सुरक्षित ठेवायचे असेल तर गरोदरपणात कच्चे पनीर खाण्याचा विचार टाळलेलाच बरा!

(वाचा :- गर्भावस्थेमध्ये योनीतून पाणी येत असल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!)

गरोदरपणात पनीर खाण्याचे फायदे

पनीर हे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते आणि गरोदरपणात सुद्धा त्याच्या सेवनाने स्त्रीला खूप फायदे मिळतात. पनीर मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप जास्त प्रमाणात असते जे बाळाच्या दात आणि हाडांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यात असलेले खनिज तत्व पेशींच्या विकासात योगदान देते. पनीर मध्ये प्रोटीन सुद्धा खूप असते ज्यामुळे स्टेमिना वाढतो आणि शरीराला उर्जा मिळते. पनीर हे गरोदरपणाची लक्षणे कमी करण्यास मदत करते आणि गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये होणाऱ्या मोर्निंग सिकनेस सुद्धा कमी होते. यातील प्रोटीन शरीराची दरोरोजची प्रोटीनची गरज सहज भरून काढते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये टोमॅटो खाल्ल्याने आई व बाळाला मिळतात ‘हे’ खास लाभ!)

अन्य फायदे

मुख्य फायद्यां व्यतिरिक्त सुद्धा गरोदरपणात पनीर खाण्याचे काही फायदे आहेत. गरोदरपणात पनीर खाल्ल्याने स्त्रीचे पोट नेहमी भरलेले राहते आणि तिचे वजन नियंत्रित राहते. पनीर खाल्ल्याने गरोदरपणाच्या दरम्यान हाय ब्लड शुगर कंट्रोल होते. गरोदर स्त्रीया एक स्नॅक म्हणून सुद्धा पनीर खाऊ शकतात. गरोदरपणात होणाऱ्या अनेक अवयवांच्या शारीरिक वेदना पनीर खाल्ल्याने दूर होऊ शकतात. पनीर मध्ये सूज विरोधी गुण असतात जे गरोदरपणात होणाऱ्या सुजेवर परिणाम करतात आणि आराम मिळवून देतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!)

पनीर खाताना काय खबरदारी बाळगावी?

पनीर हे गरोदरपणात किती फायदेशीर आहे हे आपण पहिलेच. पण गरोदरपणात स्त्रीने कोणतीही गोष्ट खाताना काही खबरदारी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि हि गोष्ट पनीरला सुद्धा लागू होते. पास्चरायझेशनने पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या दुधाचेच पनीर खावे. नेहमी ताजे आणि सर्वोत्तम क्वालिटीचेच पनीर खावे. पनीर स्वस्त मिळतंय म्हणून अजिबात खरेदी करू नये. ते कदाचित हलक्या दर्जाचे असू शकते. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पनीर फ्रीज मध्ये ठेवू नये आणि तसे पनीर अजिबात खाऊ नये. पनीरचे अतिसेवन झाल्यास पोट खराब होणे, अपचन आणि फूड पॉयझनिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. अधिक पनीर खाल्ल्याने वजन वाढण्याचा सर्वाधिक धोका असतो. तर या काही गोष्टी गरोदर स्त्रीने लक्षात ठेवून त्या पद्धतीनेच पनीरचे सेवन करावे.

(वाचा :- आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *