प्रेग्नेंसीमध्ये मांसाहाराची इच्छा नाही? मग जाणून घ्या शाकाहाराचे लाभ व ५ खास पदार्थ!

Spread the love

असे म्हणतात की जो व्यक्ती मांसाहारी (non vegetarian) असतो त्याला शाकाहारी (vegetarian) व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात पोषण मिळते. मात्र अजून तरी अशा प्रकारची कोणतीही तुलना सिद्ध झालेली नाही. पण हा गैरसमज समाज मनात इतका खोलवर रुजला आहे की गरोदरपणात सुद्धा शाकाहारी स्त्रियांना सतत भीती वाटत असते की त्यांना व त्यांच्या बाळाला त्यांचा शाकाहार अपूर्ण तर पडणार नाही ना, यामुळे बाळाच्या शारीरिक विकासात तर काही कमतरता राहणार नाही ना?

तर मंडळी त्याचे उत्तर आहे नाही. शाकाहारी आहार हा देखील मांसाहारा इतकाच पौष्टिक असतो आणि शरीरासाठी जास्त सुरक्षित असतो. यामुळे ज्या स्त्रिया शाकाहारी आहेत त्यांनी अजिबात या गोष्टीची भीती मनात बाळगू नये आणि जास्तीत जास्त चांगला आहार घेण्यावर भर द्यावा.

मॉर्निंग सिकनेसपासून सुटका

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त सतावणारी समस्या म्हणजे मॉर्निंग सिकनेस होय. मात्र ही समस्या शाकाहार घेतल्याने बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अनेक संशोधनामधून हे दिसून आले आहे की मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश केल्याने मॉर्निंग सिकनेस अधिक वाढतो. पण त्या उलट जर गरोदर स्त्रीचा आहार शाकाहारी असले तर मात्र मॉर्निंग सिकनेसची हि समस्या कमी होऊ शकते. गरोदरपणात शाकाहारी आहार घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे बाळासाठी हानिकार ठरू शकतील असे मांसाहारी पदार्थ पोटात जात नाहीत आणि बाळ देखील सुरक्षित राहते. या काळात शरीराला शक्य तितकी उर्जा हवी असते आणि तेवढी उर्जा शाकाहारातून सहज मिळते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये फक्त ‘या’ पद्धतीनेच करा पनीरचं सेवन!)

शाकाहार असतो आरोग्यदायी

शाकाहार हा मनुष्याच्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी मनाला जातो. अकेडमी ऑफ न्‍यूट्रिशियन अँड डायटेटिक्‍स यांच्या म्हणण्यानुसार, शाकाहार घेणारी व्यक्ती हृदयाचे रोग, कर्करोग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या शारीरिक समस्यांपासून आणि आजारांपासून दूर असते. त्या व्यक्तीला असे आजार सहसा होत नाहीत. शाकाहारामधून प्रोटीन, फायबर, खनिज पदार्थ यांसारखी पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळेच गरोदरपणात स्त्रीने शाकाहारी अन्न खाण्यापेक्षा मांसाहारी अन्न खाल्ले तर उत्तमच असते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये थायरॉइडची गोळी खाणं योग्य आहे का?)

शाकाहार कोणता घ्यावा?

गरोदरपणात शाकाहार निवडताना स्त्रीने तो काळजीपूर्वक आणि मोजकाच निवडावा. तिने असा आहार निवडावा ज्यातून तिला जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळतील. सोयाबोईन मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. तुम्ही कोणत्याही मांसाहार डिशप्रमाणे सोयाबिनची डिश बनवू शकता. कारण ती दिसायला मांसाहारा सारखीच होईल पण असेल शुद्ध शाकाहारी! स्त्रीने आवर्जुन आपल्या आहारात कडधान्ये, वाटाणे यांचा समावेश करावा. यात जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते. मोड आलेले कडधान्ये सुद्धा गरोदरपणात स्त्रीसाठी चांगली समजली जातात. याशिवाय सुका मेवा खाण्यावर सुद्धा गरोदर स्त्रीने जास्तीत जास्त भर द्यावा.अक्रोड, बदाम यांसारखा सुका मेवा जिभेला चव देईल आणि शरीराला पोषण सुद्धा देईल.

(वाचा :- गर्भावस्थेमध्ये योनीतून सफेद पाणी येत असल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!)

अन्य आहार

धान्य, डाळी यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन आढळते. शिवाय या पदार्थांमधून शरीराला लोह आणि झिंक सुद्धा मिळते. स्त्रीने आपल्या रोजच्या आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करावा. यात असे अनेक पोषक तत्वे असतात जे स्त्री आणि बाळ दोघांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. फोर्टिफाइड फूड घेतल्याने आहारातील पोषकता वाढू शकते. शाकाहाराचे गरोदरपणातील हे फायदे पाहून तुम्हाला सुद्धा आता कळले असेलच कि शाकाहार हा मांसाहारापेक्षा अजिबात कमी नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये टोमॅटो खाल्ल्याने आई व बाळाला मिळतात ‘हे’ खास लाभ!)

खबरदारी घ्यावी

शाकाहार हा जरी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असला तरी स्त्रीने तो खाण्यापूर्वी काही खबरदारी नक्की बाळगावी. जसे की बाजारातून आणलेली भाजी नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. कारण त्यावर जीव जंतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर दुषित अन्न पोटात गेले तर आई प्रमाणे त्याचा धोका बाळालाही पोहचू शकतो. शिवाय प्रत्येक अन्न हे ताजेच खावे, अन्यथा पोटाच्या समस्या बळावू शकतात आणि गरोदरपणातील वेदनेत अधिक भर पडू शकते. तर या काही गोष्टी लक्षात ठेवून शाकाहार घेताना स्त्री ने काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त चांगला आहार घेऊन सुदृढ राहावे.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *