प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ हेल्दी व एनर्जी ड्रिंक्सनी करा शरीरातील पाण्याची कमतरता दूर!

Spread the love

लिंबू पाणी

लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि कमी झालेल्या इलेक्ट्रॉलला पूर्ण करते. यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरात लाल पेशी बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोहाच्या अवशोषणात मदत करते. लिंबू पाणी मॉर्निंग सिकनेसला सुद्धा दूर करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू पाणी रक्तदाबाला देखील नियंत्रित करते. त्यामुळे गरोदर स्त्री ने जास्तीत जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायला हवे.

(वाचा :- नॉर्मल डिलिव्हरी हवी असल्यास ९व्या महिन्यात जरुर खा ‘हे’ पदार्थ!)

नारळ पाणी

नारळ पाण्यात इलेक्ट्रॉलाईट्स, पॉटेशियम, क्लोराईड आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळते. सोबतच यात कॅल्शिअम, डायट्री फायबर, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी देखील असते. हे सर्व घटक शरीराला मोठया प्रमाणावर पोषण देतात आणि हायड्रेटेड ठेवतात. त्यामुळे गरोदर स्त्रीने आठवड्यातून 2-3 वेळा तरी नारळ पाण्याचे सेवन करायलाच हवे. जाणकार सुद्धा आवर्जून नारळ पाणी पिण्याचा सल्ला गरोदर स्त्रीला देतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का व कधी येते स्तनांवर खाज? जाणून घ्या यावरील उपाय!)

ताक

ताक हे अनेकांचे आवडते पेय. जेवण झाले की ताक पिण्याची सवय खूप जणांना असते. तर असे हे ताक गरोदर स्त्रीसाठी सुद्धा एक चांगला पोषण पर्याय मानले जाते. यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळते. उन्हाळ्याच्या काळात गरोदर स्त्रीने न चुकता ताक प्यायला हवे, कारण ताक हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते आणि पाण्याचे संतुलन कायम राखते. बाहेरचे ताक पिण्यापेक्षा स्त्रीने घरच्या घरी ताक बनवून पिणे उत्तम!

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये मांसाहाराची इच्छा नाही? मग जाणून घ्या शाकाहाराचे लाभ व ५ खास पदार्थ!)

गाजर ज्यूस

गाजराचा ज्यूस शरीराला केवळ हायड्रेटेडच ठेवत नाही तर शरीराला हव्या असलेल्या अनेक व्हिटॅमिन्सची आणि खनिज पदार्थांची पूर्तता करतो. त्यामुळेच स्त्रीने रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस प्यायल्यास तिला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. मात्र गाजर ज्यूसचे सेवन हे मर्यादित प्रमाणातच व्हायला हवे. कारण अति गाजराचे प्रमाण गरोदरपणात चांगले मानले जात नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये फक्त ‘या’ पद्धतीनेच करा पनीरचं सेवन!)

व्हेजिटेबल ज्यूस

हा आधुनिक ज्यूस सध्या पूर्ण जगात प्रसिद्ध झाला आहे. यात जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणावर आढळते. मुख्य म्हणजे हा ज्यूस तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या घेऊन बनवू शकता. तुमच्या मनाप्रमाणे यात स्वाद टाकू शकता. तज्ज्ञांच्या मते रोज एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस पिण्याने स्त्रीचे आरोग्य उत्तम राहते आणि तिला व बाळाला मोठ्या प्रमाणावर पोषण मिळते.

(वाचा :-प्रेग्नेंसीमध्ये थायरॉइडची गोळी खाणं योग्य आहे का?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *