प्रेमात पडण्याआधी स्विकारा नात्याबाबतची ‘ही’ ५ सत्य!

Spread the love

प्रेम आणि रोमांस याविषयी जोडलेल्या भावनांचा आयुष्यात प्रत्येकाने कधी न कधी नक्कीच अनुभवलं असेलच. रोमियो-जूलियट, हिर-रांझा अशा कित्येक प्रेमकहाण्या व प्रेमवीर आहेत ज्यांना कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांनी प्रेमात इतिहास रचलाय. पण हेही तितकंच खरं आहे की, सर्वांचीच प्रेमकहाणी एकसारखी नसते. काहींची प्रेमकहाणी एकदम स्मूद आणि हळूवार असते तर अनेकांना लग्नापर्यंतचा प्रवास पार पाडताना अनेक संकटे व आव्हानांचा सामना करावा लागतो.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्यामुळे घट्ट नात्यासाठी प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे समजून घ्यावं लागतं. काही लोकांना प्रेम म्हणजे कथा-कविता व सिनेमात दाखवलं जातं त्याप्रमाणे वाटतं पण प्रेम म्हणजे हळूवार वारा आणि कधीतरी तुफान वारा असं असतं. त्यामुळे कोणाच्या प्रेमात पडण्याआधी काही सत्य जाणून घेऊन ती स्विकारणं अत्यंत गरजेचं असतं.

सिनेमासारख्या रोमांसची अपेक्षा करणं

भारतीय प्रेक्षकांवर सिनेमाचा प्रभाव खूप प्रमाणात दिसून येतो. बरीच जणं प्रेम मिळवायला फिल्मी फंड्यांचा किंवा डायलॉग्सचा वापर करतात. पण अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे की, आपलीही लव्हस्टोरी पडद्यावर दाखवल्या जाणा-या एखाद्या काल्पनिक कहाणीसारखी सुंदर आणि गोडगुलाबीच असेल. ख-या आयुष्यात कोणत्याच मुलीला कबीर सिंगसारखा मुलगा नको असतो आणि कोणताच मुलगा एका मुलीसाठी आपलं आयुष्य उद्धवस्त करुन घेत नाही. ख-या आयुष्यातील प्रेम कधी अव्यक्त असतं तर कधी निव्वळ काळजीतून दिसणारं!

(वाचा :- लग्नानंतरची दोन वर्षे प्रत्येक जोडप्यासाठी असतात खूप महत्त्वपूर्ण, या गोष्टींची घ्या आवर्जून काळजी!)

वेळेनुसार बदलणारं नातं

जेव्हा नात्याची नवी नवी सुरुवात होते तेव्हा सारं काही गोडगुलाबी आणि एखाद्या परिकथेप्रमाणे सुंदर असतं. तिथे रोमांस, एकमेकांची भरपूर काळजी, २४ तास एकमेकांना वेळ देण्याची तयारी, पैशाला दुय्यम स्थान सारं काही त्या प्रेमात असतं. या काळात ब-याचदा माणूस त्या त्या गोष्टी करतं जातो ज्या त्याला पटत नसतात किंवा त्याच्या स्वभावातच नसतो. वेळेनुसार जोडीदाराची हि बाजू सुद्धा समोर येते. त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच मानसिकरित्या तयार राहावं लागेल की, वैवाहीक आयुष्यात बदल हे होणारच. यामुळे येणा-या समस्या तुम्हाला प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून सोडवाव्या लागतील.

(वाचा :- काजल अग्रवालसारखं हनिमूनचे फोटे शेअर करण्याआधी जाणून घ्या ‘या’ ५ गोष्टी!)

मत बनवून वागू नका

ड्रामा, सिनेमे किंवा मालिकांमधील पात्रांना आइडल मानून आपल्या जोडीदाराकडून त्यांच्यासारखं वागण्याची अपेक्षा ठेऊ नका. आपला जोडीदार आपली अशी पॅम्परिंग करेल, अशी काळजी घेईल, तसा वागेल असं मुळीच मानून चालू नका. नात्यात आल्यानंतर तुम्ही एकमेकांना समजून घ्याल त्या बेसवर तुमचं नातं पुढे सरकेल. ही कहाणी तुमच्या कल्पनेपेक्षा किंवा एखाद्या काल्पनिक कहाणीपेक्षा वेगळी नक्कीच असेल पण त्यात पूर्णत: सत्यता असेल.

(वाचा :- ‘या’ ५ बाबतीत गृहिणी ठरतात इतर सर्वांपेक्षाच उजव्या!)

अति पॅम्परिंग

प्रेमात मिळणारी पॅम्परिंग कोणाला नको असते म्हणा? पण अति पॅम्परिंगची अपेक्षा न ठेवलेलीच बरी. खरं तर आपल्या मनासारखी पॅम्परिंग आपल्या आई-वडीलांशिवाय चांगली या जगात कोणीच करु शकत नाही ना आपल्या गरजा कोणी आपल्याला हव्या त्या प्रमाणात पूर्ण करु शकेल. त्यामुळे अशी अजिबात अपेक्षा ठेऊ नका की तुम्ही एक कॉल केला आणि जोडीदार हजर झाला किंवा अर्ध्या रात्री तुमची आवडता पदार्थ घेऊन घराच्या बाल्कनित पोहचला. जरी सुरुवातीला असं ती व्यक्ती वागली तरी काळानुरुप या सवयीत देखील फरक दिसून येणार.

(वाचा :- हेल्दी रिलेशनशीपसाठी गरजेच्या आहेत ‘या’ ५ गोष्टी!)

व्यक्त होणं

खरं तर काही लोक इमोशनल असतात तर काही लोक प्रॅक्टिकल! इमोशनल असणा-या व्यक्ती जास्त काळ कोणत्या भावना आपल्या मनात लपवून ठेऊ शकत नाहीत पण प्रॅक्टिल असणा-या लोकांना व्यक्त होणं जमतच नाही. म्हणजे एका सागराची दोन टोके असतात अशी नाती व अशा व्यक्ती. त्यामुळे प्रेमात पडण्याआधीच गृहित धरुन चाला की तुम्हाला व्यक्त होणारी व्यक्ती मिळेलच असं नाही. त्यामुळे व्यक्त होऊन आपल्या भावना स्पष्टपणे त्या व्यक्तीकडे पोहचवताना संवाद आटू देऊ नका. भलेही त्याने मन व्यक्त केलं नाही तरी साधारण संवादातून तुम्हाला त्याच्या मनातील सुप्त इच्छा किंवा भावना समजू शकतात.

(वाचा :- बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमुळे कळते लहान वयाची मुलगी का ठरते बेस्ट जोडीदार?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *