फेसबुक सीईओ व मोठ मोठ्या कलाकरांनी सुद्धा घेतली होती पॅटर्निटी लिव्ह! का गरजेची असते ही गोष्ट?

Spread the love

शाहीद कपूर

बॉलीवूडच्या या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या गरोदरपणाच्या काळात सहा महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. शाहीदची पत्नी मीरा हिची डिलिव्हरी जेव्हा जवळ आली तेव्हा त्याने हातातील सगळी कामं पूर्ण करून पुढील सहा महिने केवळ आणि केवळ आपल्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी देण्याचे ठरवले. पहिल्या मुलावेळी त्याने सहा महिन्यांची तर दुसऱ्या मुलावेळी त्याने एक महिन्याची सुट्टी घेतली होती. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, “पॅटर्निटी लिव्ह प्रत्येक पुरुषाने घेतली पाहिजे, कारण मुलाची जबाबदारी त्याची सुद्धा असते.”

(वाचा :- मुलीला पहिल्यांदा पिरीयड्स येण्याआधी आईला मिळतात ‘हे’ संकेत व मुलीमध्ये दिसून येतात काही बदल!)

सैफ अली खान

सैफ अली खान याने सुद्धा करीना कपूरच्या पहिल्या बाळंतपणावेळी 1-2 महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेतली होती व पूर्ण वेळ हा करीनाची काळजी घेण्यात आणि जन्माला आलेल्या तैमुरचे लाड करण्यात घालवला होता. एक वडील म्हणून जे जे करावं लागेल ते सर्व त्याने केलं. हाताशी नोकर असुन सुद्धा अनेक गोष्टी तो स्वत:च करायचा. आता करीना दुसऱ्यांदा गरोदर आहे आणि तिचा डिलिव्हरीचा काळ जवळ येताच तो पुन्हा आपलं सगळं काम थांबवून करीना आणि आपल्या होणाऱ्या मुलाला संपूर्ण वेळ देईल.

(वाचा :- मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा व बुद्धी तल्लख व्हावी म्हणून घरच्या घरी बनवा हेल्दी व टेस्टी ड्रिंक्स!)

रितेश देशमुख

आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आपली पत्नी जेनेलियावर किती प्रेम करतो हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. त्या दोघांचे प्रेम आणि त्यांच्या मुलावर असलेले प्रेम ते सतत सोशल मीडीयाच्या माध्यमातून जगापुढे मांडत असतात. याच प्रेमामुळे आणि काळजीमुळे रीतेशने जेव्हा जेनेलियाला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तेव्हापासून ती पूर्ण बरी होईपर्यंत पॅटर्निटी लिव्ह घेतली आणि हातातील सगळी कामे थांबवली. एका मुलाखतीमध्ये जेनेलियाने सांगितले की, “रितेश एक क्षण सुद्धा माझ्यापासून या काळात दूर गेला नाही.”

(वाचा :- कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करतानाही सोनाली बेंद्रेने असा केला आपल्या मुलाचा सांभाळ!)

कुणाल खेमू

एक आदर्श पिता आणि पती म्हणून कुणाल खेमूला संपूर्ण बॉलीवूड ओळखतं आणि एका पित्याची व पतीची काय कर्तव्ये आहेत हे स्वत:हून तो अनेकदा सार्वजनिकरित्या सांगत असतो. त्याने सुद्धा सोहा अली खान गरोदर असताना जास्तीत जास्त वेळ तिला दिला आणि आपल्या बिझी शेड्युल मधून मोठी पॅटर्नीटी लिव घेतली. हा एक असा काळ असतो जेव्हा पती जवळ असावा असे प्रत्येक पत्नीला वाटत असते. त्यामुळे या काळात पुरुषांनी काहीही करून काही दिवसांची पॅटर्नीटी लिव अवश्य घ्यावी असे कुणाल सांगतो.

(वाचा :- लहान मुलांसाठी अत्यंत लाभदायक असतं ‘हे’ खास तेल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत!)

का गरजेची आहे पॅटर्निटी लिव्ह?

गरोदरपणा आणि डिलिव्हरीचा काळ हा कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत क्लेशदायक असतो. या काळात होणाऱ्या हार्मोन्स असंतुलनाचा परिणाम स्त्रीवर मोठ्या प्रमाणावर होतो व ती खूप विचित्र सुद्धा वागू शकते. अशावेळी आपला पती आपल्या सोबत आहे ही भावना तिच्यासाठी सर्वात मोठा मानसिक आधार असते. आपण एकटे नाही, काही झालं तरी आपला जोडीदार आपल्या पाठीशी आहे ही जाणीव तिला या काळावर संयमाने मात करण्यास मदत करते. म्हणूनच जगभरात पॅटर्निटी लिव्हची महत्त्व वाढत आहे. पुरुष स्वत:हून पुढाकार घेत आहेत. आपल्या भारतात सुद्धा असा बदल नक्की दिसेल अशी आपण अशा करुया.

(वाचा :- तुषार कपूरला मुलासाठी बनावं लागलं ‘आई’, ‘ही’ असतात एका सिंगल फादरची आव्हानं!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *