फेस मास्कमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या

Spread the love

करोना विषाणूला हरवण्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. कोव्हिड १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय करणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून गरजेचं आहे. पण मास्कच्या अति वापरामुळे चेहऱ्यावर लालसर डाग, मुरुम आणि कानाच्या त्वचेवर ताण येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्वचेशी संबंधित या समस्यांपासून सहजरित्या सुटका मिळवली जाऊ शकते. याबाबत डॉ. रितिका ढींगरा (संस्थापक, द लक्स क्लिनिक) यांनी काही सल्ले दिलेत आहेत, ज्यामुळे त्वचेचं संरक्षण करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

त्वचेच्या प्रकारानुसार देखभाल करा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी न विसरता त्वचेची नियमित देखभाल करणं आवश्यक आहे. मास्कचा उपयोग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चराइझर देखील लावा. चेहरा स्वच्छ धुताना सौम्य आणि सुगंधविरहित क्लींझरचा उपयोग करावा. नॉन-कॉमेडोजेनिक असे लेबल असलेल्या उत्पादनांची निवड करावी.
(रात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे चेहऱ्याचा ‘या’ नैसर्गिक तेलाने करा मसाज, त्वचेमध्ये दिसतील असे बदल)

​त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइझर

आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइझरची निवड करावी. त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइझरचा वापर केल्यास मुरुमांची समस्या निर्माण होणार नाही. मॉइश्चराइझरची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ त्वचा तेलकट असल्यास जेल मॉइश्चराइझरचा वापर करावा, सामान्य किंवा संमिश्र त्वचेसाठी लोशन आणि कोरड्या त्वचेसाठी क्रीमचा उपयोग करावा.

(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)

​मेकअप प्रोडक्‍टपासून राहा दूर

त्वचेवर जळजळ होईल किंवा त्वचेचं नुकसान होईल अशा ब्युटी प्रोडक्ट, औषधे आणि मेकअप प्रोडक्टपासून दूर राहा. मेकअपमुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे त्वचेवर मुरुम येऊ शकतात. मेकअप करणं आवश्यक असल्यास नॉन-कॉमेडोजेनिक किंवा रोमछिद्रे बंद होणार नाहीत, अशा प्रोडक्टचा वापर करावा.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​झिंक ऑक्साइडचा करा वापर

  • मास्कमुळे त्वचेवर होणारे घर्षण रोखण्यासाठी झिंक ऑक्साइडचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे त्वचेवर होणारी जळजळ शांत होण्यास मदत मिळेल. झिंक ऑक्साइड हे एक स्किन गार्ड आहे.
  • डायपरमुळे येणारे पुरळ किंवा गंभीर स्वरुपात रूक्ष झालेल्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे तुम्ही नाकाच्या शेंड्यावर किंवा कानांच्या मागे लावू शकता.
  • त्वचेवरील मुरुम कमी करण्यासाठी अँटी-बायोटिक मलम लावा आणि मुरम व मास्कच्या यांच्यादरम्यान त्वचेचं संरक्षण होण्यासाठी झिंक ऑक्साइडच्या पातळी पट्टीचा वापर करावा.

(हिना खानने शेअर केलं ब्युटी सीक्रेट, चमकदार त्वचेसाठी लावते स्‍ट्रॉबेरी फेस पॅक)

​दर ४ तासांमध्ये १५ मिनिटांसाठी मास्क ब्रेक घ्या

डॉक्‍टरांच्या माहितीनुसार, दर चार तासांमध्ये १५ मिनिटांसाठी मास्क ब्रेक घेतल्यास आपली त्वचा निरोगी राहण्यास मत मिळते. पण सार्वजनिक ठिकाणी असताना चेहऱ्यावरील मास्क काढू नका. घरी पोहोचल्यानंतरच मास्क काढणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल.

(स्ट्रॉबेरी लेग्समुळे मुलींचे पाय दिसतात खराब, ही समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय)

​स्वच्छ कपड्यांचा मास्क वापरा

आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ-मातीचे कण तसंच श्वासोच्छवासाद्वारे बाहेर फेकले जाणारे कण इत्यादी मास्कवर जमा होतात. यामुळे आपल्या त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वापरलेले मास्क आपण मशीनमध्ये किंवा हाताने धुवू शकता. केवळ मास्क स्वच्छ पद्धतीने धुण्याच्या सूचनांचं पालन करावं. मास्क धुण्यासाठी सुगंधविरहित, हायपो- अ‍ॅलर्जेनिक डिटर्जंट्स वापर करावा.

(फेस स्टीमरने पोअर्समधील दुर्गंध काढणं आहे सोपं, चेहऱ्यावर येतो नॅचरल ग्लो)

​मास्कची निवड अशी करावी

कापडाच्या कमीतकमी दोन घड्या असणाऱ्या, वापरण्यासाठी आरामदायक आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत, अशा मास्कची निवड करावी. अधिक घट्ट किंवा अधिक सैल मास्क वापरू नये. सिंथेटिक कपडे उदाहरणार्थ नायलॅान किंवा पॉलिस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले मास्क वापरू नये. मुरुम आणि त्वचेवर जळजळ होईल, अशा मास्कचा वापर करणं कटाक्षाने टाळावं.

(Skin Care या बियांच्या तेलामध्ये आहे नॅचरल अँटी-एजिंंग फार्म्युला, त्वचेला मिळतात ‘हे’ लाभ)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *