फेस स्टीमरने पोअर्समधील दुर्गंध काढणं आहे सोपं, चेहऱ्यावर येतो नॅचरल ग्लो

Spread the love

चेहऱ्याची त्वचा स्वच्छ, सुंदर आणि नितळ राहावी, यासाठी त्वचेवरील रोमछिद्रे स्वच्छ करणं अतिशय आवश्यक आहे. पोअर्सची खोलवर स्वच्छता करण्यासाठी फेस स्‍टीमचा उपयोग करणं सर्वोत्तम उपाय मानला जातो. प्रत्येक ब्युटी पार्लरमध्येही ‘फेस स्‍टीमर’चा एक आवश्यक टुल प्रमाणे वापर केला जातो. याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला चेहरा चमकदार होतो तसंच त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळते.

फेस स्टीमरचा नियमित उपयोग केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरुमांची समस्या दूर होते. याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला केवळ स्वच्छ पाण्याची आवश्यकता आहे. हा उपाय अत्यंत सोयीस्कर आहे आणि महत्त्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तुम्ही हे ब्युटी टुल विकत घेण्याचा विचार करत आहात का? तर चला जाणून घेऊया फेस स्टीमरचा कसा वापर करायचा आणि यामुळे त्वचेला नेमके कोणते लाभ मिळतात.
(Foot Care ‘या’ दगडच्या मदतीने दूर करा टाचांच्या भेगा व दुर्गंध, जाणून घ्या योग्य पद्धत)

​चेहऱ्यासाठी फेस स्‍टीमरचे फायदे

  • फेस स्टीमरमुळे त्वचेवरील रोमछिद्रे खुली होण्यास आणि त्वचेवरील सर्व प्रकारची दुर्गंध स्वच्छ करण्यास मोठी मदत मिळते.
  • चेहऱ्यावर मुरुमांची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियाही समूळ नष्ट होतात.
  • फेस स्टीमरमुळे ब्लॅकहेड्स देखील सहजरित्या काढण्यास मदत मिळते.
  • आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर नैसर्गिक तेलाचा (सीबम) स्त्राव होतो. अति प्रमाणात सीबमचा स्त्राव झाल्यास मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते. पण फेस स्टीमरमुळे सीबमचा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात येऊ शकतो.

(ब्राह्मीमध्ये आहे अँटी-एजिंगचा फॉर्म्युला, औषधी वनस्पतीपासून तयार केलेल्या Cica Creamचे ‘हे’ आहेत फायदे)

​रक्तप्रवाह वाढतो

  • चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे ऑक्सिजन त्वचेच्या पेशींपर्यंत सहज पोहोचते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते.
  • फेस स्टीमरमुळे कोलेजनचे उत्पादन सुद्धा वाढते आणि आपली त्वचा सैलही पडत नाही. याचा नियमित उपयोग केल्यास त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होतील.
  • हे टुल तुमच्या त्वचेच्या आवश्यकतांची काळजी घेईलच शिवाय त्वचेचं हिवाळा आणि उन्हाळ्यातही संरक्षण करेल. यासाठी तुम्हाला केवळ काही मिनिटांसाठी चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे.

(Foot Care ‘या’ दगडच्या मदतीने दूर करा टाचांच्या भेगा व दुर्गंध, जाणून घ्या योग्य पद्धत)

​डेड स्किनपासून मिळते सुटका

चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर डेड स्किनची समस्या दूर होते. तसंच त्वचेवर जमा झालेले धूळ, मातीचे कण, दुर्गंध देखील स्वच्छ होते. खोलवर स्वच्छता झाल्यानंतर त्वचा चमकदार आणि नितळ दिसू लागते.

(Natural Skin Care नितळ व सुंदर कांतीसाठी वापरा ८ आयुर्वेदिक तेल, मेकअपची भासणार नाही गरज)

थकवा दूर होतो

तास-न्-तास कम्प्युटरसमोर बसून काम करणाऱ्यांनी चेहऱ्यावरील थकवा दूर करण्यासाठी फेस स्टीमरचा वापर करावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला आराम मिळतो. गरम पाण्याची वाफ घेतल्यानं त्वचा संसर्गांपासून संरक्षण होते.

(हिना खानने शेअर केलं ब्युटी सीक्रेट, चमकदार त्वचेसाठी लावते स्‍ट्रॉबेरी फेस पॅक)

​स्‍टीमरची निवड कशी करावी ?

  • जुन्या काळामध्ये आकाराने मोठ्या असलेल्या स्टीमरचा उपयोग केला जात असते. पण आता बाजारात स्टीमर छोट्या-मोठ्या आकारांमध्येही उपलब्ध असतात. तसंच या टुलची किंमत देखील खिशाला परवडणारी असते. काही स्टीमरमध्ये पाणी गरम करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढवण्यात आली आहे.
  • फेस स्टीमर तुम्हाला ऑनलाइन स्टोअरमध्येही सहजरित्या मिळेल. ही वस्तू आपण प्रवासादरम्यानही घेऊन जाऊ शकता. केवळ १५ मिनिटे किंवा त्याहून कमी वेळासाठी फेस स्टीमरचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेऊ शकता.

(स्ट्रॉबेरी लेग्समुळे मुलींचे पाय दिसतात खराब, ही समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय)

NOTE : त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *