बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे आहात त्रस्त? दोन्ही समस्यांपासून या ड्रायफ्रुटमुळे मिळेल आराम

Spread the love

बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही जण बद्धकोष्ठता तर काही जुलाब होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात. जुलाब होण्याच्या समस्येमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी चारोळीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.

चारोळी आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. कित्येक गोड पदार्थांमध्ये चारोळीचा वापर केला जातो. या छोट्याशा पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वांचा साठा असतो. ज्यामुळे आपल्याला भरपूर आरोग्यवर्धक लाभ मिळतात. चारोळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे घटक आहेत. चारोळीच्या तेलामध्ये अमिनो अ‍ॅसि‍ड आणि स्टीएरिक अ‍ॅसि‍ड ही पोषक तत्त्वही आहेत. पण या ड्रायफ्रुटचे किती प्रमाणात आणि कधी सेवन करावे, याबाबतची योग्य माहिती असणंही आवश्यक आहे.
(OCD ओसीडी म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे)

​बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी

आकाराने लहान असलेल्या चारोळीमुळे आरोग्यास मिळणारे लाभ मोठे आहेत. चारोळीमध्ये पोषण तत्त्व आणि नैसर्गिक स्वरुपात भरपूर तेल असते. यामुळे चारोळी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. या छोट्याशा सुकामेवामुळे आपल्या पचन संस्थेमध्ये जमा झालेली दुर्गंध आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. या प्रक्रियेमुळे आपल्या आतड्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चारोळीचा आपल्या आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)

अतिसाराचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक

बद्धकोष्ठता प्रमाणेच वारंवार होणाऱ्या अतिसाराचा त्रास देखील चारोळीच्या सेवनामुळे कमी होऊ शकतो. अतिसाराच्या (Diarrhea) समस्येवर चारोळीच्या तेलाचा वापर करणं हा एक प्रभावी उपाय मानले जाते. आहारामध्ये बदल झाल्यास काही जणांना अतिसाराचा त्रास होऊ लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्वयंपाकामध्ये चारोळीच्या तेलाचा उपयोग करून पाहा. खिचडी, दलिया, ओट्स इत्यादी पदार्थांमध्ये चारोळीच्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे अतिसाराची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. अशक्तपणा देखील जाणवणार नाही.

(तुमच्यातही विसराळूपणा वाढतोय का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ सोपे उपाय)

​चारोळीच्या सेवनाचे लाभ

ऑफिसचा ताण, खासगी आयुष्यातील समस्या इत्यादी असंख्य कारणांमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. चारोळीचे सेवन केल्याने चिंता, ताणतणाव कमी होण्यासही मदत मिळते, असे म्हणतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आपल्या आहारामध्ये चारोळीचा समावेश करू शकता. चारोळी मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दुधामध्ये मिक्स करून प्या. ओट्स, दलिया, खीर किंवा भाज्यांमध्येही याचा वापर केला जाऊ शकतो.

(Poha And Nutritions नाश्त्यामध्ये कांदे पोहे खाल्ल्यास मिळतील हे ६ फायदे)

​जीवनसत्त्वांचा खजिना

चारोळीमध्ये व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन सी यासारख्या पोषक घटकांचा साठा आहे. या जीवनसत्त्वांमुळे आपल्या शरीराच्या मज्जातंतू मजबूत होण्यास, रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास तसंच रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. चारोळीतील औषधी घटकामुळे मधुमेहाचा त्रास नियंत्रणात आणण्यास मदत मिळू शकते.

(नियमित या वेळेस हळदीचं पाणी प्या, मिळतील भरपूर आरोग्यदायी लाभ)

​चारोळीचे अन्य फायदे

कित्येक प्रकारच्या मिठाईमध्ये चारोळीचा आवर्जून वापर केला जातो. विशेषतः वेगवेगळ्या खीर रेसिपीमध्ये चारोळीचा महत्त्वाच्या सामग्रीत समावेश असतो. तसंच चारोळीच्या तेलाचा स्वयंपाकामध्येही उपयोग केला जातो.

Note : आपल्या आहारामध्ये चारोळीचा किंवा अन्य कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका.

(Work From Home वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय? करा या ५ महत्त्वाच्या गोष्टी)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *