बनारसी स्टाइल बटाटा चण्याची लज्जतदार भाजी

Spread the love

How to make: बनारसी स्टाइल बटाटा चण्याची लज्जतदार भाजी

Step 1: बनारसी स्टाइल बटाटा- चणा भाजी

एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हिंग आणि जिरे मिक्स करा. जिऱ्याला चॉकलेटी रंग आल्यानंतर कढईमध्ये टोमॅटोची पेस्ट टाका. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यावी.

Step 2: टोमॅटो पेस्टमध्ये हळद, धणे पावडर मिक्स करा

आता यात अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा धणे पावडर आणि लाल तिखट मिक्स करा. चवीनुसार मीठ देखील घाला. सर्व सामग्री तीन ते चार मिनिटांसाठी शिजू द्या.

टोमॅटो पेस्ट

Step 3: उकडलेले बटाटे आणि चणे

सर्व सामग्री शिजल्यानंतर त्यात दोन उकडलेले बटाटे आणि एक कप उकडलेले चणे घालावे. कढईतील सर्व पदार्थ एकजीव करून घ्या. आवश्यकता असल्यास त्यात थोडेसे पाणी मिक्स करा.

चणे

Step 4: तयार झाली आहे खमंग भाजी

भाजीची घट्ट चटणी तयार होण्यासाठी चमच्याच्या मदतीने बटाटे मॅश करा. आता त्यात गरम मसाला आणि कसुरी मेथीची पावडर सुद्धा मिक्स करा. तयार झाली आपली बनारसी स्टाइल बटाटा आणि चण्याची खमंग भाजी.

खमंग भाजी

Step 5: बनारसी स्टाइल बटाटा-चण्याची स्वादिष्ट भाजी : पाककृतीचा व्हिडीओ

बनारसी स्पेशल बटाटा चण्याची खमंग भाजी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *