बहुतांश लोकांना माहितच नाही पेरूच्या पानांचा वापर करण्याची ‘ही’ योग्य पद्धत!

Spread the love

खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे किंवा नकळत काहीतरी चुकीचा पदार्थ पोटात गेल्यामुळे मळमळणं (Nausea), उलटी होणं (vomiting) अशा समस्या एकदम सामान्य आहेत. पण प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांवर ताबडतोब मेडिकल मधील औषधं घेणं किंवा डॉक्टरकडे जाणं शक्य नसतं. तसंच सतत औषधं खाणं आरोग्यासाठीही घातक असतं. कारण ही औषधं बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या सॉल्ट्सचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. पण आयुर्वेदिक औषधे (ayurvedic treatments) व घरगुती उपचार (home remedies) हे पूर्णत: नैसर्गिकतेवर अवलंबून असतात.

यामुळे आरोग्यास कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. पेरुच्या पानांमध्ये तारुण्य प्रदान करण्यास आवश्यक असणारे गुणधर्म असतात. पेरुत (guava) मोठ्या प्रमाणात कॅल्शियमही असते. यासोबतच दिर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पेरुची पाने अतिशय उपयुक्त असतात. त्वचेच्या देखभालीपासून (guava leaves) ते पोटाच्या समस्येपर्यंत (remedies for Stomach problems) अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून पेरुच्या पानांचा उपयोग होतो. पाहूया पेरुच्या पानांचे इतर लाभ!

पेरूची पाने चावण्याची पद्धत

हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पेरुच्या पानांचे गोळे चावल्याने आपली मळमळ, उलटी, आंबट ढेकर आणि पोटदुखी यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पेरुची मुलायम व ताजी पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. आता या धुतलेल्या पानांवर एक ते दोन चिमटी सैंधव मीठ किंवा काळं मीठ घेऊन हळू हळू चावायला सुरुवात करा. आता त्यातून येणारा रस गिळा. तुम्हाला या पानाचं सेवन पान खातो तसं करायचं आहे.

(वाचा :- कोणत्याही वयातील व्यक्तीचा गुडघ्याचा आजार एकपाद सुप्तवज्रासन करतं ठणठणीत बरा!)

पेरुच्या पानांतील गुणधर्म

पेरुच्या पानांमध्ये अ‍ॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हेच कारण आहे की पेरुच्या पानांचे सेवन केल्यास आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला जेवल्या नंतर किंवा दूरचा प्रवास केल्यानंतर मळमळ किंवा उलटीची समस्या होत असेल तर पेरुची पाने घेऊन त्यावर २ ते ३ चिमटी काळं मीठ घालून चघळा. याचा चांगला परिणाम तुम्हाला लगेचच दिसून येईल. मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी पेरुच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर (blood sugar) कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी होतो. तसंच वजन कमी करण्यासाठीही पेरुची पाने उपयुक्त असतात. शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरुची पाने खाल्ल्यास फायदा होतो. शरीरावरील गाठींवर उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो. दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास सूज कमी होण्यासही मदत होते.

(वाचा :- खास हिवाळ्यात खा ‘हे’ ६ प्रकारचे भजी, चटपटीत असण्यासोबतच पचनक्रियाही करतात सुरुळीत!)

दातदुखी दूर करण्यासाठी

पेरुची पाने दातदुखीवरही फायदेशीर ठरतात. दातदुखी थांबवण्यासाठी पेरुची ५ ते ६ पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. पुढे ही पाने स्वच्छ पाण्यात उकळवून घ्या. १० मिनिटे पाणी चांगलं उकळवून घेतल्यानंतर गाळणीच्या माध्यमातून ते गाळून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा. या दरम्यान ते पाणी काही काळासाठी तोंडात धरुनही ठेवा. यामुळे दात शेकले जातील आणि ब-याच प्रमाणात आराम मिळेल.

(वाचा :- गुडघेदुखीेने त्रस्त आहात? मग करा योगथेरपिस्टने सांगितलेले ‘हे’ साधेसोपे व्यायाम!)

अ‍ॅंटीअ‍ॅलर्जिक गुणधर्म

तुम्हाला माहित आहे का अ‍ॅंटीबॅक्टेरियल गुणधर्मांसोबतच पेरुच्या पानांमध्ये अ‍ॅंटीअ‍ॅंलर्जिक गुणधर्मही आढळून येतात. त्वचेवर खाज, रॅशेज किंवा फोड्या आल्यास पेरुच्या पानांची पेस्ट करुन त्यावर लावा. पण दोन ते तीन वेळा ही पेस्ट लावल्यासच तुम्हाला फरक दिसून येईल. पण हे लक्षात ठेवा की, दोन ते तीन वेळा पेस्ट लावून देखील फरक पडत नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. कारण ब-याचदा संसर्ग खूप गंभीर असतो जो औषधांच्या माध्यमातून किंवा ट्रिटमेंटनेच बरा केला जाऊ शकतो. पेरुच्या पानांची पेस्ट बनवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून मिक्सर किंवा खलबत्त्यात ती वाटून घ्या. तयार पेस्टमध्ये दोन थेंब मोहरीचे व दोन थेंब खोबरेल तेलाचे मिक्स करा. ही पेस्ट संक्रमित जागी लावा.

(वाचा :- ६६ वर्षीय रेखाच्या मनमोहक सौंदर्य व फिटनेसचे ‘हे’ आहे रहस्य!)

पेरूचे इतर लाभ

पेरूमध्ये रिच फायबर कंटेंट व लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्याने हे मधुमेहापासून (diabetes) वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला रोखण्याचं काम करतं. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेग्युलेट होत राहते. तसंच पेरू मेटाबॉलिज्म वाढवतो व वजन कमी करण्यास मदत करतो. पेरू खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. पेरूंमध्ये जीवनसत्व ‘क’ मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर येणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यावर तो लाभदायक ठरतो. पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा (moisture) कायम ठेवण्यात मदत करते.

(वाचा :- ‘या’ ५ खास कारणांमुळे हिवाळ्यात केले जाते शेंगदाण्यांचे अधिक प्रमाणात सेवन!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *