लाल रंग
(Hairstyle Tips पारंपरिक ते स्टायलिश लुकसाठी करून पाहा बन हेअर स्टाइल)
लाल रंगाचा ड्रेस
जर तुम्हाला साडी नेसणं शक्य नसेल तर लाल रंगाचा एखादा ड्रेस परिधान करावा. हा ड्रेस देखील वजनामध्ये जड नसावा. लग्नानंतरचा तुमचा हा पहिलाच गणेशोत्सवाचा सण असेल तर मात्र तुम्ही खास वेशभूषा करावी. पण पोषाख तसंच वजनदार दागिन्यांमुळे कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी.
(Ganesh Chaturthi 2020 गणेशोत्सवामध्ये हटके दिसायचंय? जुन्या लुकला असा द्या नवा टच)
हिरवा रंग

हिरवा रंग देखील गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही स्वतःला स्टायलिश लुक देऊ शकता. काजोलच्या या हिरव्या साडीतील लुक तुम्हाला आवडला असेल, तर ही स्टाइल फॉलो करू शकता. आपल्या साडीवर एखादे कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज तुम्ही मॅच करता येईल किंवा हिरव्या रंगाच्या ब्लाउजसह एखादी ब्राइट रंगाची साडीही नेसता येऊ शकते.
कसा असावा पेहराव

गदड रंग पसंत नसल्यास तुम्ही फिकट हिरव्या रंगाची साडी नेसण्याचा विचार करू शकता. हेअर स्टाइल म्हणून तुम्ही हाय पोनी किंवा अंबाडा तसंच तुमच्या आवडीची एखादी स्टाइलही करू शकता. यावर मेसी बन हेअर स्टाइल देखील सुंदर दिसेल. साडीवर तुम्ही हलक्या स्वरुपातील दागिने किंवा वजनदार कानातलेही परिधान केली तरीही चालतील. तुम्ही तुमच्या आवडीची स्टाइल कशी करता, याचा विचार करावा.
(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)
पिवळा रंग

श्री गणेशाची पूजा करताना पिवळ्या रंगांची फुले आणि कपड्यांचाही वापर केला जातो. पिवळा रंग देखील शुभ असून गणपती बाप्पाला प्रिय असल्याचे मानले जाते. पूजेच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करू शकता किंवा मिक्स अँड मॅच हा पर्याय देखील तुम्ही फॉलो करू शकता. वेगळ्या रंगाचा ड्रेस किंवा ओढणीमुळेही तुम्हाला साधा आणि सुंदर लुक मिळेल.
(Hairstyles For Women या ५ सोप्या हेअर स्टाइलमुळे तुम्हाला मिळेल कूल लुक)
दागिने

नवीन कपडे खरेदी करणे शक्य नसल्यास तुम्ही पिवळ्या रंगातील (Yellow Colour) एखादा जुना लेहंगा किंवा ओढणीचाही वापर करू शकता. तुमच्याकडे एखादा जुना अनारकली ड्रेस असल्यास पूजेच्या दिवशी परिधान करू शकता. यावर तुम्ही सुंदर बांगड्या, ईअररिंग्सही मॅच करू शकता. यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट पारंपरिक लुक मिळेल.
(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)
Source link
Recent Comments