बाळाच्या शरीरावर पुरळ आल्यास करा ‘हे’ साधेसोपे घरगुती उपाय!

Spread the love

लहान बाळाची जितकी काळजी घ्या तेवढी कमी आहे. कधीही कशानेही बाळाला त्रास सुरु होऊ शकतो. म्हणूनच म्हणतात ना एका लहान जीवाला सांभाळणे हे अतिशय कठीण काम आहे. कारण जर एखादा त्रास सुरु झाला तर बाळाला त्याला तो सहन होत नाही आणि त्याचा त्रास पाहून आपल्यालाही त्रास होतो. लहान बाळांमध्ये दिसणारी अशीच एक त्रासदायक समस्या म्हणजे बाळाच्या अंगावर येणारे पुरळ (Acne) होय. हे पुरळ किंवा फोड्या कधी कधी खूप वेदना सुद्धा देऊ शकतात.

त्यामुळे साहजिक हसतं खेळतं बाळ मलूल होऊन जातं. हे पुरळ संक्रमणामुळे होतात. यामुळे तो भाग लाल पडू लागतो. चार ते सात दिवसांनी या फोड्यांमध्ये पू होऊ शकतो आणि त्याचा अधिक त्रास बाळाला होतो. त्याला साधा स्पर्श झाला तरी वेदना होतात. खास करून चेहरा, मान, काखेत, खांदे आणि कुल्हे यांवर या फोडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आज या लेखातून आपण यावर काय घरगुती उपचार करता येतात ते जाणून घेऊया.

पुरळ येण्यामागची कारणे?

काही ठराविक कारणांमुळे बाळाच्या अंगावर पुरळ येऊ शकतात. उदाहरणार्थ शारीरिक स्वच्छता न ठेवणं, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे, शरीरातील पोषकता कमी होणे, एनीमियाची लक्षणे किंवा शरीरात लोहाची कमतरता! या शिवाय अधिक केमिकलचे पदार्थ त्वचेवर वापरणे आणि जळजळ व ऋतू बदलल्याने सुद्धा या पुरळ निर्माण होऊ शकतात. या शिवाय सुद्धा फोडी निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत पण ही काही मुख्य कारणे आहेत असे आपण म्हणू शकतो.

(वाचा :- लहान मुलांची सुस्ती व हिमोग्लोबिनची समस्या दूर करते स्वादिष्ट व पौष्टिक पालक सूप, जाणून घ्या रेसिपी!)

पुरळ येण्याची लक्षणे?

पुरळ येण्याची कारणे तर आपण जाणून घेतली पण आता त्याची लक्षणे सुद्धा जाणून घेऊया. ती माहित असणे गरजेचे आहे कारण त्या लक्षणांवरून बाळाला पुरळांचा त्रास सुरु झाल्याचे आपण समजू शकतो. ज्या जागी पुरळ आले आहेत तो भाग लाल होतो आणि त्यावर सूज येते. काही प्रकरणात तर बाळाला ताप सुद्धा आल्याची उदाहरणे आहेत. ज्या जागी पहिली पुरळ येतात त्याच्या आसपास संक्रमणामुळे अजून असंख्य पुरळ येण्यास सुरुवात होते. पुरळांच्या आसपास लसिका ग्रंथीं मध्ये सूज निर्माण होऊ शकते.

(वाचा :- आराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार!)

किती दिवस राहतात पुरळ?

पुरळ आल्यावर त्वचावर येते अर्थात ती फुगीर होते आणि त्या फुगलेल्या भागालाच आपण फोड्या किंवा पुरळ असे म्हणतो. हे पुरळ एका विशिष्ट आकारापर्यंत वाढू लागतात. एक आठवड्याच्या आत यामध्ये पू जमा होऊ लागतो. पुरळच्या समस्याची जास्त चिंता करण्याची गरज नसते कारण शरीर स्वत:च काही काळाने ते पुरळ घालवते आणि हे पुरळ स्वत:च नष्ट होतात. तुम्ही दोन आठवड्यापर्यंत हे पुरळ जाण्याची वाट पाहू शकता. पण त्यानंतर सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि बाळावर योग्य ते उपचार करावेत.

(वाचा :- लहान मुलांसाठी असं बनवा सफरचंद व केळीचं दलिया किंवा लापसी!)

घरगुती उपाय

पुरळांवर काही घरगुती उपाय उपलब्ध आहेत जे अतिशय रामबाण ठरू शकतात. त्यावर मध लावल्याने आराम मिळू शकतो. मध हे नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करते. जर पुरळांमध्ये जळजळ होत असेल तर जेष्ठमधाचा वापर करावा. हळद सुद्धा फोडीवर लावल्याने आराम मिळू शकतो. हळदीमध्ये सुद्धा अँटीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात. जर फोडी फुटू लागल्या आणि त्यातून पू बाहेर येऊ लागला तर त्यावर कांदे आणि लसणाचा रस लावावा. यामुळे विषाणू नष्ट होतात आणि त्वचा ठीक होऊ लागते. अतिशय सोप्पा उपाय म्हणून तुम्ही नारळाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता.

(वाचा :- मुलांसाठी नाश्त्यात बनवा ‘हा’ पौष्टिक पदार्थ, आहे पचण्यास हलका व आरोग्यास लाभदायी!)

डॉक्टरांना कधी दाखवावे?

जर बाळाला पुरळ आल्यावर ताप येत असेल आणि पुरळ सतत वाढत असतील तर त्यात वेदना होऊ शकतात आणि बाळाला वेदना होत असतील आणि फोडी येऊन दोन आठवडे पूर्ण झाले असतील तर आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सामान्यत: प्रत्येक बाळामध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे त्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. सहसा 2 आठवड्यांच्या आत हे पुरळ नष्ट होतात. मंडळी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ओळखीच्या लोकांसोबत सुद्धा शेअर करा कारण प्रत्येक घरात एक तरी लहान बाळ असतंच आणि त्याला अशा फोडी आल्यास वेळीच त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.

(वाचा :- प्रत्येक नवजात बाळाच्या केसांत फरक असण्यामागील कारणं? बाळाच्या केसांची कशी निगा राखावी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *