बाळाला ‘हा’ पदार्थ खाऊ घातल्यास बुद्धी होईल तल्लख!

Spread the love

आपले मुल हुशार असावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते आणि लहानपणापासूनच त्याची बुद्धी तल्लख असावी म्हणून ते त्याला निरनिराळे पौष्टिक पदार्थ खाऊ घालतात जेणेकरून त्यांची बुद्धी वाढावी. बाळाची बुद्धी लहानपणापासुनच तल्लख असेल तर बाळाचा विकास लवकर होतो. इतर मुलांमध्ये बाळ उठून दिसते. पुढे जाऊन त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम होते. कलागुणात तो निपुण होतो. यामुळेच लहानपणापासून बाळाला योग्य पदार्थ खाऊ घालणे आणि त्याच्या मेंदूची क्षमता वाढवणे गरजेचे असते.

मात्र अनेक पालकांना नेमके कोणते पदार्थ बाळाला खाऊ घातल्याने त्यांची बुद्धी वाढेल याबद्दल माहित नसते. पण आता काळजी करू नका कारण आम्ही या लेखातून त्या एका महत्त्वाच्या पदार्थाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जो बाळाला तुम्ही खाण्याची सवय लावली तर त्यातून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे बाळाची बुद्धी तल्लख होईल. तो पदार्थ म्हणजे ब्रोकोली (broccoli) होय. बाजारात सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ बाळाच्या बौद्धिक वाढीत महत्त्वपूर्ण योगदान देतो.

ब्रोकोली मधील पोषक तत्‍वे

100 ग्राम ब्रोकली मध्ये 34 कॅलरी, 0.37 ग्रॅम फॅट, 2.8 ग्रॅम प्रोटीन, डायट्री फायबर 2.7, व्हिटॅमिन अ 623 आययू, व्हिटॅमिन क 89.2 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन क 101.6 मायक्रोग्रॅम, व्हिटॅमिन ब 6 0.18 ग्रॅम, फोलेट 63 मायक्रोग्रॅम, कॅल्शियम 47 मिलीग्रॅम, लोह 0.73 मिलीग्रॅम, मॅग्‍नीशियम 21 मिलीग्रॅम इतकी पोषक तत्वे असतात. यामुळेच बाळाला ब्रोकोली खाऊ घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे केवळ मेंदूलाच पोषण मिळत नाही तर आरोग्याचे अनेक फायदे होतात. म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून आपल्या बाळाला ब्रोकोली खाऊ घालायला हवी.

(वाचा :- शिस्त लागावी म्हणून मुलांवर हात उचलताय? मग परिणाम जाणून घ्याच!)

बुद्धी वाढते

सर्वप्रथम आपण ब्रोकोलीचा बुद्धी वाढवण्याचा फायद जाणून घेऊ आणि त्यानंतर अन्य फायदे जाणून घेऊ. तर मंडळी ब्रोकोलीमध्ये अल्‍फा लिनोलेनिक अ‍ॅसिड असते जे बाळाच्या मेंदुंच्या विकासात हातभार लावते. हे तत्व फार कमी भाज्यांमध्ये आढळते आणि ब्रोकोली त्यापैकीच एक आहे म्हणून लहान मुलांच्या आहारासाठी जगभरात ब्रोकोलीला मोठी मागणी आहे. हे अ‍सिड म्हणजे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा प्रकार आहे. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हे आरोग्यवर्धक म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण ब्रोकोलीमुळे बाळाला मिळणारे इतर फायदे जाणून घेऊया.

(वाचा :- या कारणासाठी बाळाला ड्राय फ्रुट पावडर खाऊ घालाच!)

दृष्टी वाढते

ब्रोकलीमध्ये बीटा कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन अ चाच एक प्रकार आहे. डोळ्यांची निगा राखण्यासाठी व्हिटॅमिन अ अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. याशिवाय ब्रोकोली मध्ये फॉस्फरस, जीएक्सेंथिन, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्‍प्‍लेक्‍स सुद्धा असते. ही सर्व पोषक तत्वे डोळ्यांच्या विकासासाठी आणि दृष्टी वाढवण्यासाठी उत्तम समजली जातात. शिवाय रेडीयेशनमुळे डोळ्यांना होणारी हानी रोखतात. बाळाच्या डोळ्यांचे आरोग्य अतिशय उत्तम राहवे अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच ब्रोकलीचा त्याच्या आहारात समावेश करा.

(वाचा :- मुलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोहा अली खान फॉलो करते ‘हा’ डायट प्लान!)

हाडे आणि दात मजबूत बनतात

ब्रोकलीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन असते जे की हाडांच्या विकासासाठी खूप गरजेचे असते. ब्रोकलीमध्ये व्हिटॅनिम क, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस असते. ही तत्वे दात मजबूत ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हाडांच्या मिनरल डेंसिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी तसेच ऑस्टिओकॅल्सिनच्या निर्माणासाठी व्हिटॅमिन महत्त्वाचे असते. या सर्व तत्वांमुळे हाडांवर आणि दातांवर होणारे परिणाम हे दीर्घकालीन असतात. याचाच अर्थ आयुष्यभरासाठी बाळाला हे फायदे मिळतात.

(वाचा :- ही पोषक तत्वे करतात लहान मुलांची हाडे मजबूत!)

बाळाला ब्रोकली कशी खाऊ घालावी?

बाळाला ब्रोकली खाऊ घालताना काही विशेष गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला ब्रोकली खाऊ घालू नये. पाहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाचीच गरज असते. त्यामुळे बाळाला आईचेच दुध द्यावे. सहा महिने उलटून गेल्यावर सातव्या महिन्यापासून तुम्ही बाळाला ब्रोकली खाऊ घालू शकता कारण तोवर बाळाची पचन यंत्रणा थोड आहार पचवण्या इतपत सक्षम झालेली असते. तुम्ही बाळाला सुरुवातीला ब्रोकलीचे सूप, प्युरी बनवून देऊ शकता. त्यांच्या विविध रेसिपीज तुम्हाला इंटरनेटवर सहज उपलब्ध होतील. तुम्ही अन्य भाज्यांचा वापर करुनही बाळाला ब्रोकली डिश खाऊ घालू शकता. यामुळे बाळाला अन्य भाज्यांतील पोषण सुद्धा मिळेल.

(वाचा :- बहुतांश वेळा नवजात बाळाच्या रडण्यामागे ‘ही’ कारणं असतात!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *